AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बहुमत आहे तर घाबरता का? विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन फडणवीसांचं मविआला चॅलेंज

महाराष्ट्राच्या 60 वर्षांच्या काळात हे कधीही घडलं नव्हतं. यांचा ना एकमेकांवर विश्वास आहे, ना आमदारांवर, अशी टीकाही विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

बहुमत आहे तर घाबरता का? विधानसभा अध्यक्ष निवडीवरुन फडणवीसांचं मविआला चॅलेंज
Devendra Fadnavis
| Edited By: | Updated on: Jul 15, 2021 | 12:30 PM
Share

मुंबई : “विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलावे लागणार आहेत, ही बैठक अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व्हावी लागते. पण अध्यक्षच नाहीत. तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का?” असा सवाल विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी विचारला आहे. “हात वर करुन का? घ्या मतदान, पाहूया ताकद. महाराष्ट्राच्या 60 वर्षांच्या काळात हे कधीही घडलं नव्हतं. यांचा ना एकमेकांवर विश्वास आहे, ना आमदारांवर” अशी टीकाही फडणवीसांनी केली. अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी नुकतीच देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा केली. त्यानंतर फडणवीस बोलत होते.

देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

इम्पेरिकल डाटा संबंधात छगन भुजबळ यांनी भेट घेतली. मराठा आरक्षणावेळी आम्ही डेटा कसा गोळा केला, हे मी त्यांना सांगितलं आणि सुप्रीम कोर्टाने तो कसा व्हॅलिड ठरवला, तेही सांगितलं. तुम्ही पुढाकार घ्यावा, एजन्सी नेमाव्या, मी पर्सनली नोट तयार करुन देईन, मी तुमच्या सोबत काम करेन, सत्तारुढ नेत्यांना नेतृत्त्व करावं लागतं. मी पूर्ण करेन, असं फडणवीसांनी सांगितलं.

सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला आदेश दिले आहेत. आता निवडणुका पुढे ढकलल्या आहेत, पण फेब्रुवारीत मेजर निवडणुका येतील. त्यापूर्वी हे करणं आवश्यक आहे, असंही फडणवीस म्हणाले.

“घाबरताय का? पाहूया ताकद”

विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी नियम बदलावे लागणार आहेत, ही बैठक अध्यक्षांच्या अध्यक्षतेखाली व्हावी लागते. पण अध्यक्षच नाहीत. तुमच्याकडे मेजॉरिटी आहे, मग घाबरताय का? हात वर करुन का? घ्या मतदान, पाहूया ताकद. महाराष्ट्राच्या 60 वर्षांच्या काळात हे कधीही घडलं नव्हतं. यांचा ना एकमेकांवर विश्वास आहे, ना आमदारांवर, अशी टीकाही फडणवीसांनी केली.

नाना पटोले बोलतात, मग पवार साहेब मत व्यक्त करतात, मग काही लोक नाना पटोलेंना न घेता पवारांना भेटतात. त्यातून सर्व काही कळतं, असा टोलाही फडणवीसांनी लगावला. पंकजा मुंडे यांचं भाषण ऐकण्याचा प्रश्न नाही, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी खुलासा केला आहे, त्यावर मी बोलण्यात अर्थ नाही, असंही फडणवीस म्हणाले.

“त्या दिवशी पर्यायी सरकार देऊ”

आम्ही सक्षम विरोधी पक्षनेते आहोत. लोकांसाठी आम्ही काम करणार आहोत, हे सरकार आपल्या वजनाने कोसळेल, आज-उद्या कोसळेल हे मी कधी सांगितलं नाही, पण ज्या दिवशी कोसळेल, त्या दिवशी पर्यायी सरकार देऊ, असा विश्वासही फडणवीसांनी व्यक्त केला.

पेट्रोल दरांवर फडणवीस काय म्हणाले?

पेट्रोल एकूण तीस रुपये थेट राज्याला मिळतात, केंद्राला जे पैसे मिळतात त्यातील बारा रुपये परत राज्याला मिळतात. यातील अभ्यास सुधीरभाऊंना आहे. हे राज्य सरकारचं नाटक आहे. गेल्या वर्षी पेट्रोल-डिझेलवर राज्याला 24 हजार कोटी रुपये मिळाले. आता हजार-दीड हजार कोटी कमी केले तरी तेवढेच मिळतील, त्यामुळे राज्याला जर मनात असेल तर ते निर्णय घेऊ शकतात, असंही फडणवीस म्हणाले.

निवडणूक आवाजी पद्धतीने घेण्यासाठी नियमांमध्ये बदल

दरम्यान, विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत (Maharashtra Assembly Speaker Election) महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सावध पवित्रा घेताना दिसत आहे. विरोधकांकडून कोणताही दगाफटका होऊ नये, म्हणून आवाजी पद्धतीने मतदान घेण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. राज्य विधिमंडळाच्या नियमानुसार विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यासाठी गुप्त पद्धतीने मतदान घेण्यात येते. मात्र ही निवडणूक आवाजी पद्धतीने घेण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहेत. तशा प्रकारचा प्रस्ताव विधिमंडळ नियम समितीमध्ये पारित झाला आहे. प्रस्ताव सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात येणार असून या संदर्भात ड्राफ्ट तयार करण्याचे काम सुरु आहे. या समितीमध्ये राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना आणि भाजप या चारही प्रमुख पक्षांचे प्रत्येकी दोन सदस्य आहेत.

संबंधित बातम्या:

भुजबळसाहेब पुढाकार घ्या, मी पर्सनली नोट तयार करुन देतो : देवेंद्र फडणवीस

पंकजा म्हणाल्या, ‘माझे नेते मोदी-शाहा’, आता फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी सावध पवित्रा, नियम बदलण्याच्या महाविकास आघाडीच्या हालचाली

आधी म्हणाले ओबीसींचं नेतृत्व तुम्ही करा, आता छगन भुजबळ थेट फडणवीसांच्या भेटीला

(Devendra Fadnavis talks on Maharashtra Vidhansabha Assembly Speaker Election)

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.