OBC reservation : भुजबळसाहेब पुढाकार घ्या, मी पर्सनली नोट तयार करुन देतो : देवेंद्र फडणवीस

छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणाप्रश्नी मला भेटले. मी त्यांना पुढाकार घेण्यास सांगितलं, आवश्यक ती सर्व मदत करेनच, शिवाय मी पर्सनली नोट तयार करुन देईन ", असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

OBC reservation : भुजबळसाहेब पुढाकार घ्या, मी पर्सनली नोट तयार करुन देतो : देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis Chhagan Bhujbal
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 12:24 PM

मुंबई : “राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ हे ओबीसी आरक्षणाप्रश्नी मला भेटले. मी त्यांना पुढाकार घेण्यास सांगितलं, आवश्यक ती सर्व मदत करेनच, शिवाय मी पर्सनली नोट तयार करुन देईन “, असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते मुंबईत पत्रकारांशी बोलत होते. छगन भुजबळ आणि माजी खासदार समीर भुजबळ यांनी आज सकाळी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन, इम्पिरिकल डाटाबाबत केंद्राकडे पाठपुराव करण्यासाठी चर्चा केली. (Chhagan Bhujbal saheb take the initiative, I will personally prepare the note regarding OBC reservation said Devendra Fadnavis)

ओबीसी राजकीय आरक्षण संबंधी छगन भुजबळ यांनी आज सकाळी माझी सागर निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. मी या प्रश्नात संपूर्ण मदत करेन, असे सांगितले. आम्ही मराठा आरक्षणावेळी राज्यात एम्पिरिकल डाटा गोळा केला होता. तो सुप्रीम कोर्टानेही मान्य केला. त्यामुळे एम्पिरिकल डाटा कसा गोळा करता येईल, यासंदर्भातील आम्ही चर्चा केली. आमच्यासाठी हा राजकीय प्रश्न नाही. मी एक स्वतंत्र नोट तयार करून देतो. या प्रश्नात भुजबळ यांनी पुढाकार घ्यावा. त्यांच्यासोबत मिळून काम करण्यास आम्ही तयार आहोत, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फेब्रुवारीपर्यंत प्रश्न सोडवणं आवश्यक

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जरी पुढे ढकलल्या असल्या, तरी येत्या फेब्रुवारीमध्ये मोठ्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. त्यापूर्वी ओबीसी आरक्षणाचा प्रश्न सोडवणे आवश्यक आहे. ते शक्यही आहे असे मी त्यांना सांगितले. हा प्रश्न राज्यातच सुटण्यासारखा आहे. शेवटी नेतृत्व सरकारलाच करायचे असते, त्यामुळे भुजबळांनी पुढाकार घ्यावा, मी पर्सनली नोट तयार करुन देईन, मी तुमच्या सोबत काम करेन, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

छगन भुजबळ देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी थेट विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. भुजबळांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या बंगल्यावर जाऊन ओबीसी आरक्षणाबाबत चर्चा केली. यावेळी माजी खासदार समीर भुजबळही उपस्थित होते.  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ओबीसींचं नेतृत्त्व करावं, अशी खुली ऑफर देत फडणवीसांनी केंद्र सरकारकडे जाऊन इम्पेरिकल डाटा मागावा” असं छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले होते. त्यानंतर आज भुजबळ थेट देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले.

संबंधित बातम्या   

आधी म्हणाले ओबीसींचं नेतृत्व तुम्ही करा, आता छगन भुजबळ थेट फडणवीसांच्या भेटीला  

तर ओबीसींचं नेतृत्व देवेंद्र फडणवीस यांनी करावं, छगन भुजबळ यांची खुली ऑफर

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.