AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जरांगेंची प्रकृती खालावली; बोलताही येईना, धनंजय देशमुखांकडून सरकारला अल्टिमेटम, म्हणाले उद्याच्या उद्या…

आता बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात सहभागी होणार आहेत.

जरांगेंची प्रकृती खालावली; बोलताही येईना, धनंजय देशमुखांकडून सरकारला अल्टिमेटम, म्हणाले उद्याच्या उद्या...
manoj jarange dhanajay deshmukh
| Updated on: Jan 27, 2025 | 10:23 PM
Share

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी शनिवारी २५ जानेवारी २०२५ पासून पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसलं आहे. मनोज जरांगे हे सातव्यांदा उपोषणासाठी बसले आहेत. त्यांनी आंतरवाली सराटीत उपोषण सुरु केले आहे. सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्या, ‘सगे सोयरे’ अंमलबजावणी तातडीने करा, शिंदे समितीला तातडीने मुदतवाढ द्या, कक्ष सुरू करा, वंशावळ समिती गठीत करा, शिंदे समिती मनुष्यबळ वाढवा, संख्याबळ द्या,नोंदी सापडलेल्या लोकांना प्रमाणपत्र द्या, अशा मागण्या त्यांनी सरकारपुढे ठेवल्या आहेत. त्यातच आता बीडच्या केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख हे मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात सहभागी होणार आहेत.

धनंजय देशमुख हे नुकतंच आंतरवाली सराटी गावात दाखल झाले आहेत. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. या भेटीनंतर धनंजय देशमुख यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. “मनोज जरांगेंची प्रकृती खूप खालावत आहे. त्यांना बळ द्यावा. सरकारने लवकरात लवकर त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात आणि मराठा समाजाला न्याय द्यावा, अशी मी विनंती करतो. सरकारने गांभीर्यपूर्वक याची दखल घेतली पाहिजे. उद्याच्या उद्या शिष्टमंडळाने येऊन या ठिकाणी भेट दिली पाहिजे. त्यांच्या मागण्या योग्य आहेत. त्यामुळे सरकारने त्या मान्य कराव्यात”, असे धनंजय देशमुख म्हणाले.

मस्साजोगचे ग्रामस्थही आंतरवाली सराटीत दाखल

धनंजय देशमुख हे उद्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणात सहभागी होणार आहेत. ते देखील मनोज जरांगेंसोबत उपोषणासाठी बसणार आहेत. धनंजय देशमुखांसोबत मस्साजोगचे ग्रामस्थही आंतरवाली सराटीत दाखल झाले आहेत. धनंजय देशमुख दाखल होताच मनोज जरांगे पाटील हे उठून बसले. मात्र त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना बोलता येत नाही.

जरांगे पाटील यांचे कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन

दरम्यान मनोज जरांगे पाटील यांनी काही तासांपूर्वी सर्व कार्यकर्त्यांना भावानिक आवाहन केले आहे. उपोषणाला बसणाऱ्यांनी उपोषण सोडावे. सर्वांनी या ठिकाणी बसून मला साथ द्या. उपोषणामुळे शरीराची चाळणी होते. माझे शरीर खराब झाले, तुमचे होऊ देऊ नका, असे भावनिक आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले. तर दुसरीकडे कार्यकर्त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना आवाहन केले आहे. जोपर्यंत जरांगे पाटील उपोषण सोडत नाहीत तो पर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही असे कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे जरांगेंसोबत उपोषणासाठी बसलेले उपोषणकर्ते हे उपोषणावर ठाम आहे. त्यांनी उपोषण सुरूच ठेवणार असल्याचा पावित्रा घेतला आहे.

Follow Us
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
पुण्यातील लक्ष्मी रोडवरील प्रमुख 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद, बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकरी
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर...
मराठा आंदोलनातून धक्कादायक दावा; ललित तारख यांचा जरांगेंवर गंभीर आरोप
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर...
जनतेची माफी मागा; एकनाथ शिंदेंचा राहुल गांधी आणि इंडिया आघाडीवर हल्लाबोल
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?