
मोठी बातमी समोर येत आहे. मंत्रिमंडळ विस्तार आणि मंत्र्यांच्या खाते वाटपानंतर नव्या पालकमंत्र्यांच्या नावाची कधी घोषणा होणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखरे पालकमंत्रिपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे. मंत्री धनंजय मुंडे यांना मोठा धक्का बसला आहे. धनंजय मुंडे यांचं नाव पालकमंत्रिपदाच्या यादीतून वगळण्यात आलं आहे. गेल्यावेळी धनंजय मुंडे यांच्याकडे बीडचं पालकमंत्रिपद होतं मात्र यावेळी त्यांना पालकमंत्रिपद मिळालं नसून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पालकमंत्री म्हणून बीडची सूत्रं आपल्या हातात घेतली आहेत. तर मंत्री पंकजा मुंडे यांना जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे.
धनंजय मुंडेंना धक्का
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून हत्या करण्यात आली, या घटनेनं बीडसह राज्यभरात खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रात वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची देखील मागणी होत आहे. हाच मुद्दा पकडून विरोधकांकडून सरकारच्या कोंडीचे प्रयत्न सुरू आहेत. नैतिकतेच्या आधारावर धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांना पुन्हा एकदा बीडचं पालकमंत्रिपद मिळणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. तसेच बीडचे नवे पालकमंत्री कोण असणार याबाबत देखील मोठी उत्सुकता होती.
अखेर पालकमंत्रिपदाची यादी जाहीर करण्यात आली आहे, या यादीमध्ये धनंजय मुंडे यांचं नावच नाहीये, म्हणजेच त्यांना बीडच नाही तर कोणत्याही जिल्ह्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलेलं नाहीये. तर दुसरीकडे बीडचं पालकमंत्रिपद हे पंकजा मुंडे यांना न देता ते अजित पवार यांनी स्वत:कडे ठेवलं आहे. पकंजा मुंडे यांना जालन्याचं पालकमंत्रिपद देण्यात आलं आहे. अजित पवार यांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्याव अशी मागणी देखील करण्यात येत होती, अखेर आता अजित पवार बीडचे नवे पालकमंत्री झाले आहेत. त्यामुळे आता बीड जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध कामांना ते कसा आळा घालणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
पालकमंत्र्यांची यादी