उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस परळीत विविध विकास कामांच्या शुभारंभाने साजरा

परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकास कामांचा शुभारंभ आज पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत हा कार्यक्रम पार पडला.

उपमुख्यमंत्री अजित पवारांचा वाढदिवस परळीत विविध विकास कामांच्या शुभारंभाने साजरा
धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळीत विविध विकासकामांचा शुभारंभ

परळी : बारा जोतिर्लिंगापैकी एक परळीतील वैद्यनाथ मंदिर परिसरातील यात्री निवासासह विविध विकास कामांचा शुभारंभ आज पालकमंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते करण्यात आला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत हा कार्यक्रम पार पडला. ज्योतिर्लिंगाची सेवा आम्ही पिढ्यानपिढ्या करत आलो आहोत व पुढेही सुरूच राहील. श्रावण महिन्यात गंगेतील पाणी घेऊन येणारी कावड आम्ही कधी चुकू दिली नाही, तशाच पद्धतीने आता विकासाची ‘कावड’ वाहू, अशी प्रतिक्रिया यावेळी धनंजय मुंडे यांनी दिलीय. (Dhananjay Munde inaugurates various development works including Yatri Niwas in Parali)

तीर्थक्षेत्र विकास योजनेतून शहरातील जुन्या तहसीलच्या भागात बांधण्यात येत असलेल्या भव्य यात्री (भक्त) निवासासाठी 14 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या कामाचं आज भूमिपूजन करण्यात आलं. परळी शहरात सुरू असलेल्या विकासकामांमुळे काही प्रमाणात नागरिकांना त्रास होत आहे. मात्र, कमीत कमी वेळेत ही कामे पूर्ण करून देण्यात येतील, असं आश्वासन यावेळी मुंडे यांनी परळीकरांना दिलं. तसंच रस्त्यावरील कचरा व धूळ शोषून घेण्यासाठी आणलेल्या अत्याधुनिक स्वीपर (व्हॅक्युम मशीन) मशीनचीही मुंडेंनी पाहणी केली आणि अशा मशिन्स आणण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.

33/11 केव्ही उपकेंद्राचे भूमिपूजन

तत्पूर्वी धनंजय मुंडे यांच्या हस्ते परळी शहरातील व्हीआयपी सर्किट हाऊस परिसरात महावितरण मार्फत उभारण्यात येत असलेल्या 33/11 केव्ही उपकेंद्राच्या कामाचे भूमीपूजन संपन्न झालं. यावेळी ना. मुंडे यांनी उपकेंद्र उभारणी, साईड ट्रॅक आदी संदर्भातील सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.

शहरातील दोन महत्त्वाच्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन

परळी शहरातील संत भगवानबाबा चौक ते तहसील कार्यालय व दोस्ती टी हाऊस ते अग्रवाल आईस फॅक्टरी या दोन सिमेंट रस्त्यांच्या कामांचंही धनंजय मुंडे यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आलं. एका स्वागत कमान आणि नगरसेवक भाऊसाहेब कराड यांच्या संपर्क कार्यालयाचे यावेळी उदघाटन करण्यात आले. त्याचबरोबर परळी ते चांदापुर रस्त्यावरील घनशी नदीवर नगर परिषदेच्या वतीनं बांधण्यात आलेले साखळी बंधारे ओसंडून वाहत आहेत. या बंधाऱ्यावर मुंडे यांच्या हस्ते जलपूजन संपन्न झालं.

संबंधित बातम्या :

परळीत होऊ घातलेल्या भव्य यात्री निवासची पहिली झलक पाहिलात का? धनंजय मुंडेकडून फोटो ट्वीट

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पंकजा मुंडेंच्या भेटीला, मुंडेंची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न?

Dhananjay Munde inaugurates various development works including Yatri Niwas in Parali

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI