पंकजा मुंडेंची निवडणुकीतून माघार, धनंजय मुंडे म्हणतात…

भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी डिसीसी बँकेच्या (Beed District Central Co-operative Bank) निवडणुकीतून माघार घेतली आहे

पंकजा मुंडेंची निवडणुकीतून माघार, धनंजय मुंडे म्हणतात...

बीड : भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी डिसीसी बँकेच्या (Beed District Central Co-operative Bank) निवडणुकीतून माघार घेतली आहे. यावरुन राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पंकजा यांना टोला लगावला. एखाद्या राजकीय पक्षाने ऐनवेळी निवडणूक प्रक्रियेतून माघार घेणे म्हणजे त्यांना विजयाबद्दल तीळ मात्र विश्वास नसल्याचे लक्षण आहे, अशी भूमिका धनंजय मुंडे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’सोबत बोलताना मांडली.

धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

“विरोधी पक्षाने मतदानाच्या काही तासाअगोदर माघार घेतली आहे. मतदारांवरच माजी मंत्र्यांचा विश्वास राहिला नाही. कोणी निवडणुकीतून माघार घेतल्याने प्रक्रियेला फरक पडत नाही. लढण्यापूर्वीच भाजपने आत्मविश्वास गमावला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, काँग्रेस आणि मित्रपक्ष मिळून शेतकरी विकास पॅनल अंतर्गत जिल्हा बँकेच्या 6 जागा लढवत असून सर्वची सर्व उमेदवार प्रचंड बहुमतानी विजयी होणार”, असा विश्वास धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

‘कुणी माघार घेतली तरीही…’

“कोणी निवडणुकीवर बहिष्कार घातला, कुणाला मागील कारभाराचा पश्चाताप झाला किंवा कुणी माघार घेतली तरीही निवडणुकीला शंभर टक्के क्षमतेने सामोरे जाऊन मतदान प्रक्रिया पार पाडावी”, असे आवाहन मुंडे यांनी केलं.

बीड जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर उद्या (20 मार्च) मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. प्रत्येक केंद्रावर मतदान शांततेत, नियमाप्रमाणे पार पाडावे, असे आवाहन धनंजय मुंडे आणि महाविकास आघाडीच्या स्थानिक प्रमुख नेत्यांनी केलं आहे.

धनंजय मुंडेंची जय्यत तयारी

दरम्यान, महाविकास आघाडी पुरस्कृत शेतकरी विकास पॅनलचे सहा उमेदवार बीड जिल्हा बँकेच्या निवडणूक रिंगणात आहेत. 20 मार्च रोजी निवडणूक होऊ घातली आहे. याच पार्श्वभूमीवर पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सर्व संचालक उमेदवारांची काल बैठक घेतली. महाविकास आघाडीमार्फत शेतकरी विकास पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढत असलेल्या उमेदवारांचा परिचय आघाडीतील सर्व तालुक्यातील प्रमुखांशी करून देण्यात आला. बीडमधील राष्ट्रवादी भवन येथे ही बैठक पार पडली.

संबंधित बातमी : बीड जिल्हा बँक बरखास्त करण्याचे सत्ताधाऱ्यांचे कारस्थान; पंकजा मुंडेंची थेट राज्यपालांकडे तक्रार

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI