AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठ्या हालचाली, सुरेश धस-धनंजय मुंडे यांची भेट, भेटीबाबत धस म्हणाले…

Dhananjay Munde Suresh Dhas Meeting: आमदार सुरेश धस म्हणाले, माझी आणि धनंजय मुंडे यांची परवा त्यांच्या निवासस्थान भेट झाली. त्यांची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे त्यांच्या तब्बेतेची विचारपूस करण्यासाठी मी गेलो होतो. त्यात काही गैर नाही. या विषयात गजब करण्यासारखे काहीच नाही.

मोठ्या हालचाली, सुरेश धस-धनंजय मुंडे यांची भेट, भेटीबाबत धस म्हणाले...
सुरेश धस, धनंजय मुंडे
| Updated on: Feb 15, 2025 | 9:07 AM
Share

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया, भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह काही जणांनी लावून धरले आहे. हत्या प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मिक कराड याच्यासोबत मंत्री धनंजय मुंडे यांचे संबंध आहे. यामुळे धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. आता या प्रकरणात धनंजय मुंडे यांची भाजप आमदार सुरेश धस यांनी भेट घेतली. त्यानंतर मोठ्या प्रमाणावर राजकीय चर्चा सुरु झाली आहे. याबाबत सुरेश धस यांनी भेट झाल्याचे मान्य करत स्पष्टीकरण दिले आहे.

काय म्हणाले सुरेश धस

आमदार सुरेश धस म्हणाले, माझी आणि धनंजय मुंडे यांची परवा त्यांच्या निवासस्थान भेट झाली. त्यांची शस्त्रक्रिया झाली आहे. त्यामुळे त्यांच्या तब्बेतेची विचारपूस करण्यासाठी मी गेलो होतो. त्यात काही गैर नाही. या विषयात गजब करण्यासारखे काहीच नाही. त्यांचे ऑपरेशन झाले. त्यामुळे परवा भेटलो. कोणाच्या तब्बेतेची चौकशी करणे यामध्ये काही गैर नाही. आमचा लढा सुरुच राहणार आहे. पुढच्या एक-दोन दिवसांत अजून काही नवीन घडामोडी होणार आहे. त्यानंतर मी सर्व काही सांगणार आहे.

भरणे मामा यांनी धनंजय मुंडे यांना रुग्णालयात नेले होते म्हणून मी त्यांची तब्येत कशी आहे याची चौकशी करण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी जाऊन दोन दिवसांपूर्वी भेट घेतल्याचा दावा भाजपाचे आमदार सुरेश धस यांनी केला आहे.

धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितल्याच्या प्रश्नावर सुरेश धस म्हणाले, मी त्यांचा राजीनामा मागितला नाही. त्यांच्या पक्षाचे लोकच त्यांचा राजीनामा मागे मागत आहे. त्यांचा राजीनामा घेणे, न घेणे हे अजित पवार यांच्या हातात आहे. पुढील एक दिवसांत आणखी काही नवीन मी सांगणार आहे. त्यावेळी तुम्हाला आणखी काही कळेल, असे धस यांनी म्हटले.

दरम्यान, या भेटीनंतर मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरु झाली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या भेटीवर प्रतिक्रिया दिली आहे. धनंजय मुंडे आणि सुरेश धस यांच्यात मतभेद आहेत, मनभेद नाही, असे बावनकुळे यांनी म्हटले आहे.

अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय,प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा
माझ्या कार्यकर्त्याकडे कोणी वाकडी मान.....सत्यजीत कदम यांचा इशारा.
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
सटोगे तो बचोगे वरना बटोगे तो पिटोगे , शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी.
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
अमोल कोल्हे-अजित पवारांची भेट, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण.