धनंजय मुंडेंनी जगमित्र कारखाना लुटला, सोमय्यांचा आरोप; मृत शेतकऱ्यांच्या नावावर 83 कोटी लाटल्याचा दावा

धनंजय मुंडेंच्या कुटुंबांवर मला बोलायचे नाही. मात्र, अनिल देशमुख यांच्या ऑर्थर रोड खोली नंबर एकशेजारी आता खोली नंबर दोन बुक करून ठेवल्याचा इशारा किरीट सोमय्यांनी दिला.

धनंजय मुंडेंनी जगमित्र कारखाना लुटला, सोमय्यांचा आरोप; मृत शेतकऱ्यांच्या नावावर 83 कोटी लाटल्याचा दावा
धनंजय मुंडे, मंत्री.
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 1:17 PM

बीडः रेमडिसिव्हीरमागे उद्धव ठाकरे यांना 1 हजार रुपये मिळायचे. अजित दादांनी जरंडेश्वर लुटला आणि धनजंय मुंडे यांनी जगमित्र कारखाना लुटला. तब्बल 83 कोटी रुपये शेतकऱ्यांकडून घेतले, असा आरोप गुरुवारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अंबाजागोई येथे बोलताना केला. सोमय्या म्हणाले, काल मी ईडीकडे तकार केली आहे. मृत माणसांच्या नावावर पैसे लुटले. पोलिसांचा उपयोग माफियासारखा करत आहेत. मी बर्दापूर पोलीस ठाण्याला जावून पोलिसांना विनंती करणार आहे. फसवणूक केली असेल तर मी सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

मुंडेच्या किती बायका माहित नाही…

सोमय्या म्हणाले की, मला धमकी देणारा शोधतोय. मात्र, अद्याप मिळाला नाही. धनंजय मुंडेंच्या बायका आणि लेकरे किती आहेत माहीत नाही. मी घोटाळे काढले की, मला मुर्दाबाद म्हणतात. इथे मात्र मिरचीची धमकी देण्यात आली. मी घोटाळा काढला. आता, तुझे मिरची लगे तो मै क्या करू, असे म्हणत त्यांनी टोलेबाजी केली. शिवाय हे सरकार म्हणजे चोर मचाये शोर, असल्याचा आरोप केला.

मुख्यमंत्र्यांना इशारा…

सोमय्या यांनी यावेळी संजय राऊत यांच्यावरही टीका केली. राऊत यांना मी प्रश्न विचारला की, ईडीच्या कार्यालयात पाठीमागून 55 लाख रुपये घेऊन कोण गेले? संजय राऊत यांनी ईडीची नोटीस फाडली. मग कारवाईला भिऊन 55 लाख रुपयांचा चेक दिला. हे काय समजतात, मला माहित नाही. महाराष्ट्रात ज्यांनी-ज्यांनी घोटाळे केले त्यांची चौकशी होणार आहे. उद्धव ठाकरे यांनी रश्मी ठाकरे यांच्या नावावर अलिबाग येथे 19 बंगले बांधले. चोरी का माल वापस करणे से चोरी की सजा माफ नहीं होती, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

ईडीकडे तक्रार केली

किरीट सोमय्या म्हणाले की, उपमुख्यमंत्र्यांची हजारो कोटींची संपत्ती सापडली आहे. अजित दादांनी जरेंडश्वर कारखाना लुटला आणि धनंजय मुंडेंनी जगमित्र लुटला. 83 कोटी रुपये शेतकऱ्यांकडून घेतले. काल मी ईडीकडे तकार केली आहे. मृत माणसांच्या नावावर पैसे लुटले. पोलिसांचा उपयोग माफियासारखा करत आहेत. मी बर्दापूर पोलीस ठाण्याला जावून पोलिसांना विनंती करणार आहे. फसवणूक केली असेल तर मी सोडणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. धनंजय मुंडेंच्या कुटुंबांवर मला बोलायचे नाही. मात्र, अनिल देशमुख यांच्या ऑर्थर रोड खोली नंबर एकशेजारी आता खोली नंबर दोन बुक करून ठेवल्याचा इशारा त्यांनी दिला.

घोटाळेबाजांनी राऊतांकडून शिकावे…

सोमय्या म्हणाले की, भावना गवळींनी 100 कोटींचा घोटाळा केला. त्याला आईचे नाव दिले. तुम्ही केलेल्या पापांची सजा आईला दिली. अजित पवारांची सजा ताई आणि माईला मिळणार. पैशाची लूट करताना पैसे कुठेही ठेवा. मात्र, आई, ताई आणि माईच्या नावाने फसवू नका, असे आवाहन त्यांनी केले. एसटी संपकरी सांगतात अनिल परब भेटत नाही. त्यांना महिन्याला 100 कोटींच्या वसुलीमुळे वेळ मिळत नाही. सारेच खालच्या पातळीवर जात आहेत. सर्व घोटाळे बाजांनी संजय राऊत यांच्याकडून शिकावे, असे आवाहनही त्यांनी केले.

इतर बातम्याः

दरेकरांनी चक्क 60 दिवस केली मजुरी, 25 हजार 750 रुपयांचा मिळाला मेहनताना; सहकार विभागाच्या नोटीसमधून फुटले बिंग

कदम समर्थकांना बाहेरचा रस्ता, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर; रामदास कदम यांना धक्का

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.