AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दरेकरांनी चक्क 60 दिवस केली मजुरी, 25 हजार 750 रुपयांचा मिळाला मेहनताना; सहकार विभागाच्या नोटीसमधून फुटले बिंग

निवडणुकीवेळी प्रवीण दरेकर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता 2 कोटी 9 लाख असल्याचे म्हटले आहे. शिवाय आमदार म्हणूनही त्यांना दरमहा अडीच कोटी मिळतात.

दरेकरांनी चक्क 60 दिवस केली मजुरी, 25 हजार 750 रुपयांचा मिळाला मेहनताना; सहकार विभागाच्या नोटीसमधून फुटले बिंग
प्रवीण दरेकर, भाजप नेते
| Edited By: | Updated on: Dec 16, 2021 | 11:35 AM
Share

मुंबईः राजकारणात काहीही होऊ शकते. हे आपण सदासर्वकाळ अनुभवत असतो. आता त्यातच चक्क विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (Praveen Darekar) यांनी तब्बल 60 दिवस मुजरी केल्याचे उघड झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. विशेष म्हणजे या मोबदल्यात दरेकर यांना 25 हजार 750 रुपयांचा मेहनताना मिळाला आहे. त्यातही कडी म्हणजे हा सारा प्रकार सहकार विभागाने दरेकर यांना पाठवलेल्या नोटीसमधून समोर आला आहे. आश्चर्य आहे की नाही, आता तुम्हीच ठरवा.

नेमके प्रकरण काय?

सध्या मुंबई बँकेची निवडणूक सुरू आहे. या निवडणुकीसाठी प्रवीण दरेकर यांनी अर्ज भरला आहे. त्यात त्यांनी मजूर प्रतिनिधी म्हणून हा अर्ज दाखल केलाय. विशेष म्हणजे यापूर्वीही ते मजूर संस्थेच प्रतिनिधी म्हणून निवडून आलेत. ते बँकेचे अध्यक्षही होते. आता या निवडणुकीत मात्र, कुठे माशी शिंकली माहित नाही. सहकार विभागाचे मुंबई सहनिबंधक केदारी जाधव यांनी नोटीस पाठवली.

नोटीसमध्ये काय म्हटले?

सहकार विभागाने त्यांच्याकडे आलेल्या तक्रारीनुसार 12 डिसेंबर रोजी तपासणी केली. त्यांना प्रतिज्ञा मजूर संस्थेची कामवाटप वही सापडली. त्यात सभासदांचा हजेरीपट नोंदवलेला होता. तिथे दरेकरांचेही नाव आढळले. त्यांनी मजुरीपोटी रोख रक्कम घेतल्याची नोंद आहे. त्यावर सुपरवायझरच्या सह्या आहेत. मात्र, दरेकर यांना मजुरीचे काम करताना पाहिले नाही, असेही नोटीसमध्ये म्हटले आहे.

अशी घेतली मुजरी

सहभाग विभागाने बजावलेल्या नोटीसनुसार दरेकर यांनी एप्रिल 2017 मध्ये 30 दिवस मुजरीचे काम केले. त्यांना प्रतिदिन 450 रुपयांप्रमाणे एकूण 13500 रुपयांचा मेहनताना मिळाला. नोव्हेंबर 2017 मध्ये दरेकर यांनी 20 दिवस मजुरीचे काम केले. त्यांना प्रतिदिन 450 रुपयांप्रमाणे एकूण 9000 हजार रुपयांचा मोबदला मिळला.दरेकर यांनी डिसेंबर 2017 मध्ये 10 दिवस मजुरीचे काम केले. त्यांना प्रतिदिन प्रतिदिन 325 रुपयांप्रमाणे एकूण 3250 रुपयांचा मेहनताना मिळाला.

दरकेरांची मालमत्ता

निवडणुकीवेळी प्रवीण दरेकर यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांच्या कुटुंबाची स्थावर मालमत्ता 2 कोटी 9 लाख असल्याचे म्हटले आहे. शिवाय आमदार म्हणूनही त्यांना दरमहा अडीच कोटी मिळतात. त्यामुळे हे पाहता आपण मजूर आहात असे वाटत नाही. त्यामुळे तुम्ही 21 डिसेंबरपर्यंत सहनिबंधक कार्यालयात बाजू मांडा, असे नोटीसमध्ये सांगण्यात आले आहे.

दरेकर देणार उत्तर

प्रवीण दरेकर स्वतः विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि आमदार आहेत. शिवाय आपण सारेच ते कशा-कशा आलिशान गाड्यांमधून फिरतात हे पाहतोच. त्यामुळे कुणाच्या मनात प्रश्न निर्माण होणारच की, प्रवीण दरेकरांना अशी मजुरी करण्याची वेळ आलीच का? दरेकर यांनी मात्र, आपल्याला अशी नोटीस मिळाली नाही. कदाचित ती बँकेत आली असेल, तर योग्य ठिकाणी योग्य ते उत्तर देऊ, असे म्हटले आहे. आता दरेकर काय उत्तर देणार, याचीच उत्सुकता आहे.

इतर बातम्याः

Marriage Age Of Women: आता 18 व्या नव्हे, 21 व्या वर्षी वाजवा रे वाजवा!, मुलीच्या लग्नाचे वय वाढवले; प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी

कदम समर्थकांना बाहेरचा रस्ता, शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या नव्या नियुक्त्या जाहीर; रामदास कदम यांना धक्का

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.