Marriage Age Of Women: आता 18 व्या नव्हे, 21 व्या वर्षी वाजवा रे वाजवा!, मुलीच्या लग्नाचे वय वाढवले; प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी

मुलींच्या लग्नाचं वय 18 वरून 21 वर्ष करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरीही दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्याबाबतच्या कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे.

Marriage Age Of Women: आता 18 व्या नव्हे, 21 व्या वर्षी वाजवा रे वाजवा!, मुलीच्या लग्नाचे वय वाढवले; प्रस्तावाला कॅबिनेटची मंजुरी
Marriage
Follow us
| Updated on: Dec 16, 2021 | 10:31 AM

नवी दिल्ली: मुलींच्या लग्नाचं वय 18 वरून 21 वर्ष करण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने त्याबाबतच्या प्रस्तावाला मंजुरीही दिल्याचं सूत्रांनी सांगितलं. मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्याबाबतच्या कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुलगी 21 वर्षाची झाल्याशिवाय कोणत्याही पालकांना तिचं लग्न लावून देता येणार नाही.

15 ऑगस्ट 2020 रोजी लालकिल्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांशी संवाद साधला होता. यावेळी त्यांनी मुलींच्या लग्नाचं वय वाढवण्याचा उल्लेख केला होता. मुलींचा कुपोषणापासून बचाव करण्यासाठी त्यांचा विवाह योग्यवेळी होण्याची आवश्यकता असल्याचं मोदी म्हणाले होते.

सध्या वयाची अट काय?

विद्यमान कायद्यानुसार मुलीच्या लग्नाची वय 18 वर्ष ठरवण्यात आलं आहे. आता हे वय 18 वरून 21 वर्ष करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. तसा प्रस्तावही कॅबिनेटमध्ये प्रस्ताव मंजूर केला आहे. आता बालविवाह प्रतिबंधक कायदा, स्पेशल मॅरेज अॅक्ट कायदा आणि हिंदू मॅरेज अॅक्ट कायद्यात दुरुस्ती करण्यात येणार आहे.

टास्क फोर्सची शिफारस

नीती आयोगामध्ये जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली निर्माण करण्यात आलेल्या टास्क फोर्सने मुलीच्या लग्नाचं वय वाढवण्याची शिफारस केली होती. निती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉलही या टास्क फोर्सचे सदस्य होते. त्याशिवाय आरोग्य आणि कुटुंब कल्याण, महिला आणि बाल विकास, उच्च शिक्षण, शालेय शिक्षण, साक्षरता मिशन, तसेच न्याय व विधी मंत्रालयाच्या विधेयक विभागाचे सचिव या टास्क फोर्सचे सदस्य होते.

टास्क फोर्सची शिफारस काय?

गेल्या वर्षी जूनमध्ये या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती. गेल्या वर्षी डिसेंबरमध्येच टास्क फोर्सने आपला अहवाल सादर केला होता. पहिल्या मुलाला जन्म देण्याच्यावेळी मुलीचं वय 21 असावं, अशी शिफारस टास्क फोर्सने केली होती. तसेच लग्नाला होत असलेल्या विलंबामुळे कुटुंब, महिला, मुलं आणि समाजाच्या आर्थिक, सामाजिक आणि आरोग्यावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो, असंही टास्क फोर्सने अहवालात नमूद केलं होतं.

संबंधित बातम्या:

Vijay Diwas | 13 दिवसांच्या युद्धानंतर जनरल नियाजीने टेकवलेले गुडघे, पाकिस्तानवरील भारताच्या विजयाची गाथा

आजच्याच दिवशी जेव्हा भारतानं जगाचा नकाशा बदलला, राष्ट्रपती ढाक्यात, पंतप्रधान वॉर मेमोरीयलवर जाणार

बोगस मतदारांना बसणार चाप ! निवडणुकीत हेराफेरीची कुंडली जुळणार; मतदान कार्ड लवकरच होणार आधारशी लिंक

Non Stop LIVE Update
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.