AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उचलीचे पैसे परत दे, नाहीतर…; बीडच्या चौघांकडून 16 वर्षांच्या मुलाचं अपहरण, आईला फोन करून धमकी

धाराशिवात एका 16 वर्षांच्या मुलाचं अपहण झाल्याची घटना घडली आहे. आरोपी बीडचे असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

उचलीचे पैसे परत दे, नाहीतर...; बीडच्या चौघांकडून 16 वर्षांच्या मुलाचं अपहरण, आईला फोन करून धमकी
| Updated on: Jul 26, 2026 | 9:07 AM
Share

धाराशिवमधून धक्कादायक प्रकार समोर आला आहे. धाराशिवमध्ये ऊसतोडीच्या उचलीच्या पैशांवरून अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. धाराशिवच्या तालुक्यातील पळसपमध्ये ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बीडच्या 4 जणांनी अल्पवयीन मुलाचा अपरहण केल्याचा दावा केला जात आहे. त्यानंतर या प्रकरणी बीड जिल्ह्यातील चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेने संपूर्ण धाराशिवमध्ये खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव तालुक्यातील पळसप येथे ऊसतोडीच्या उचलीच्या पैशांवरून १६ वर्षीय मुलाचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. ‘उचलीचे पैसे परत दे, नाहीतर कामावर ये’ असा तगादा लावत मुलाला मारहाण करून बळजबरीने पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. अपहरणानंतर आरोपींनी मुलाच्या आईला फोन करून ‘पैसे दे आणि मुलाला घेऊन जा, नाहीतर मुलाला सोडणार नाही’, अशी धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. या प्रकरणी मुकादमासह बीड जिल्ह्यातील चौघांविरोधात ढोकी पोलिस ठाण्यात अपहरणासह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ऊसतोड मजुरांच्या उचलीच्या पैशांवरून अल्पवयीन मुलाचे अपहरण झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.

पुणे पोलिसांची मोठी कारवाई

पुणे पोलिसांनी शनिवारी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एपीएस वेल्थ व्हेंचर्स एलएलपी कंपनीचा संचालक अविनाश अर्जुन राठोडला अटक केली. त्याने गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून 88 कोटी रुपयांची फसवणूक केली होती. त्याच्या विरोधात एप्रिल 2023 मध्ये पुण्यातील चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी गुन्ह्याचा तपास आर्थिक व गुन्हे शाखेकडे सोपवण्यात आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर मोठी कारवाई केली.  अविनाश राठोड, त्याची पत्नी विशाखा राठोड आणि त्याच्या इतर साथीदारांनी गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आश्वासन देऊन गुंतवणूक करण्यास प्रवृत्त केल्याचे समोर आलंय. या फरार आरोपीला दुबईतून भारतात आणले आहे. पुणे पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर कोर्टाने त्याला 10 दिवसांची कोठडी सुनावली आहे.

Follow Us
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी
आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
Manoj Jarange | आम्ही आडमुठे नाही, सरकार आम्हाला फसवतंय! मनोज जरांगेंचा थेट आरोप
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
मनोज जरांगे पाटलांचा सरकारवर गंभीर आरोप, ईडी नोटीसांवरून...
गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना... तायवाडेंचा जरांगेंना संदेश
Babanrao Taywade | गणेशोत्सवात विघ्न नको, सर्वसामान्यांना त्रास होऊ नये! बबनराव तायवाडेंचा जरांगेंना थेट संदेश; ओबीसी आरक्षणावरही मोठं वक्तव्य
मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर
Manoj Jarange Hunger Strike | मनोज जरांगे आरक्षणाबाबत बोलताना भावुक; अश्रू अनावर