AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशी वेळ कुणावरही येऊ नये… बापाच्या डोळ्यासमोरच मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू; हृदयद्रावक घटनेने महाराष्ट्र हळहळला

Youth Drowned in Well : स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा अनुभव असलेल्या मात्र पहिल्यांदाच विहिरीच्या पाण्यात उतरलेल्या 19 वर्षीय तरुणाचा खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. धाराशिवमध्ये ही घटना घडली आहे.

अशी वेळ कुणावरही येऊ नये... बापाच्या डोळ्यासमोरच मुलाचा विहिरीत बुडून मृत्यू; हृदयद्रावक घटनेने महाराष्ट्र हळहळला
youth drowned in wellImage Credit source: TV 9 Marathi
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: May 10, 2026 | 4:02 PM
Share

धाराशिवच्या परांडा तालुक्यात हृदयद्रावक घटना घडली आहे. स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा अनुभव असलेल्या मात्र पहिल्यांदाच विहिरीच्या पाण्यात उतरलेल्या 19 वर्षीय तरुणाचा खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून दुर्दैवी मृत्यू झाला. वडिलांच्या आणि बहिणीच्या डोळ्यांसमोर ही थरारक व हृदयद्रावक परंडा तालुक्यातील भोंजा येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. कुंभेजा गावातील शुभम नागेश ननवरे असे मृत तरुणाचे नाव आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

मिळालेल्या माहितीनुसार, ननवरे कुटुंब हे मूळचे कुंभेजा येथील असून, ते कामानिमित्त आणि मुलांच्या शिक्षणासाठी पुणे येथे स्थायिक होते. गावी आयोजित जागरण गोंधळाच्या कार्यक्रमासाठी तसेच उन्हाळ्याच्या सुट्टया असल्याने शुभम आपल्या कुटुंबासह गावी आला होता. शुभम ननवरे हा त्याचे वडील नागेश ननवरे, बहीण शुभांगी ननवरे (15), चुलते सतीश ननवरे आणि मामाचा मुलगा ओंकार हनुमंत जाधव (16) यांच्यासोबत घराशेजारीलच भोंजा शिवारातील नाना ननवरे यांच्या विहिरीवर पोहोण्यासाठी गेला होता.

विहिरीच्या पाण्याचा अंदाज न आल्याने गेला जीव

यावेळी शुभम, शुभांगी आणि ओंकार हे तिथे विहिरीत पोहण्यासाठी उतरले. मात्र, विहिरीतील पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही अचानक बुद्ध लागले. घाबरलेल्या तिघांनीही पाण्यात एकमेकांचे हात घट्ट पकडले. मुलांचा जीव धोक्यात आल्याचे पाहून काठावर उभे असलेले वडील नागेश आणि चुलते सतीश ननवरे यांनी जीवाची पर्वा न करता तात्काळ पाण्यात उड्या घेऊन त्यांना वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला.

काही वेळाने आढळला मृतदेह

दोघांनी शुभांगी आणि ओंकार या दोघांना सुखरूप पाण्यातून बाहेर काढले, मात्र दुर्दैवाने त्याच वेळी शुभमचा हात ओंकारच्या हातातून सुटला आणि तो वडिलांच्या व बहिणीच्या डोळ्यांदेखत खोल पाण्यात बुडाला. घटनेनंतर नातेवाइकांनी केलेल्या आरडाओरडामुळे कुंभेजा व भोंजा परिसरातील ग्रामस्थांनी विहिरीकडे धाव घेतली. अनेक स्थानिक तरुणांनी शुभमचा शोध घेण्यासाठी तात्काळ विहिरीत उड्या घेतल्या. मात्र, विहिरीत पाणी जास्त असल्याने शोध कार्यात अडथळा येत होता. अखेर विहिरीवर एकाच वेळी तीन पाण्याचे पंप (मोटारी) लावून पाण्याचा उपसा करण्यात आला. त्यानंतर दुपारी शुभमचा मृतदेह आढळून आला.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?