नवा नवा संसार, बायको विहिरीत पडली, तिला वाचण्यासाठी त्यानेही उडी मारली, पुढं जे घडलं त्यानं महाराष्ट्र हळहळला

विहिरीत पाण्याची पातळी जास्त असल्याने दोघेही जण तळाला गेल्याने नव दाम्पत्याचा पाण्यात बुडून दुर्दैवाने मृत्यू झाला.

नवा नवा संसार, बायको विहिरीत पडली, तिला वाचण्यासाठी त्यानेही उडी मारली, पुढं जे घडलं त्यानं महाराष्ट्र हळहळला
Follow us
| Updated on: Jan 07, 2021 | 1:22 PM

धुळे : विहिरीत पाय घसरल्याने नवविवाहितेचा मृत्यू झाला. तर, पत्नीला वाचवितांना पतीनेही प्राण गमावले (Husband Wife Drowned In Well). बळसाणे येथे या नव दाम्पत्याचा बुडून मृत्यू झाला आहे (Husband Wife Drowned In Well).

रब्बी हंगाम सुरु असल्याने शेतकरी लक्ष्मण पंढरीनाथ रत्नपारखे (वय 27) हे पत्नी अंजूबाई लक्ष्मण रत्नपारखे (वय 22) यांच्या सह शेताची काम उरकत होते. यादरम्यान, पती लक्ष्मण यांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी पत्नी अंजू या विहिरीत पाणी आणण्यासाठी गेल्या. पाणी काढत असताना त्यांचा तोल गेला आणि त्या विहिरीत पडल्या. हे पहाताच लक्ष्मण यांनी पत्नी अंजूला वाचवण्यासाठी विहिरीत उडी मारली.

परंतु, विहिरीत पाण्याची पातळी जास्त असल्याने दोघेही जण तळाला गेल्याने नव दाम्पत्याचा पाण्यात बुडून दुर्दैवाने मृत्यू झाला. घटनेची माहिती गावात वाऱ्यासारखी पसरताच पोलिस प्रशासनाला माहिती देण्यात आली. येथील सरपंच दरबारसिंग राजपूत यांच्यासह गावकरी आणि पोलीस प्रशासनाच्या मदतीने विहिरीतून मृतदेह बाहेर काढण्यात आले.

नेमकं काय घडलं?

अंजू रत्नपारखे या बळसाणे गावातील शिवरात पिण्याचे पाणीसाठी गेल्या होत्या. बळसाणे शिवारातील विहिरीत पाय घसरुन पडल्यावर पती लक्ष्मण यांनी पत्नीला वाचवण्यासाठी विहिरीत उडी घेतली. परंतु, या घटनेत दोघांचा पाण्यात बुडून दुदैवी मृत्यू झाला (Husband Wife Drowned In Well).

जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. चित्तम यांनी या दोघांना मृत घोषित केले. याप्रकरणी देविदास अभिमन सुर्यवंशी यांनी दिलेल्या माहितीवरुन निजामपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास निजामपूर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई एस.एच. वसावे करत आहेत.

Husband Wife Drowned In Well

संबंधित बातम्या :

दापोलीत दोन पर्यटकांचा बुडून मृत्यू, पोहण्याचा मोह बेतला जिवावर

रात्री अंधारात मासे पकडण्यासाठी नदीवर, काका-पुतण्याचा बुडून मृत्यू

धक्कादायक! पोहायला गेलेल्या दोन बहिणींचा तलावात बुडून मृत्यू

Non Stop LIVE Update
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.