Dhule Janata Curfew | धुळ्यात चार दिवसाचा कडकडीत जनता कर्फ्यू, 14 ते 17 मार्चपर्यंत सर्व व्यवहार बंद

जिल्ह्यात जिल्ह्यात रविवारी (14 मार्च) सायंकाळी सहा वाजेपासून ते बुधवारी (17 मार्च) (Dhule District Four Days Janata Curfew) पहाटे सहा वाजेपर्यंत असा एकूण 4 दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे.

Dhule Janata Curfew | धुळ्यात चार दिवसाचा कडकडीत जनता कर्फ्यू, 14 ते 17 मार्चपर्यंत सर्व व्यवहार बंद
Dhule Janata Curfew
Follow us
| Updated on: Mar 12, 2021 | 12:55 PM

धुळे : धुळे जिल्ह्यात रविवारी (14 मार्च) सायंकाळी सहा वाजेपासून ते बुधवारी (17 मार्च) (Dhule District Four Days Janata Curfew) पहाटे सहा वाजेपर्यंत असा एकूण 4 दिवसाचा जनता कर्फ्यू जाहीर करण्यात आला आहे. याकाळात अत्यावश्यक सेवा वगळ्यात सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी कोरोनाबाधितांची संख्या 300 पार आहे. तर, गुरुवारी 310 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. जिल्ह्यात धुळे शहर आणि तालुक्यासह आता ग्रामीण भागातही कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे (Dhule District Four Days Janata Curfew From 14 To 17 March To Prevent Spreading Of Corona Virus).

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कठोर निर्णय

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कठोर पाऊले उचलत रविवारपासून जनता कर्फ्यू जाहीर केला आहे. जिल्ह्याचे प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप जगदाळे यांनी गुरुवारी यासंदर्भात आदेश जारी केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरोधात भारतीय दंड संहिता 1860 (45) चे कलम 188 , आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 51 ते 60 चे फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 च्या तरतुदीनुसार शिक्षेस पात्र राहणार आहे. यासाठी संबंधित स्थानिक प्रशासन जबाबदारी निश्चित करणार असल्याचे आदेशात म्हटले आहे.

धुळे जिल्ह्यात महानगरपालिका क्षेत्रात व संपूर्ण ग्रामीण क्षेत्रात घोषित करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूची तंतोतत पालन होत आहे किंवा नाही याची जबाबदारी पोलीस विभाग महानगरपालिका, नगरपरिषद नगरपंचायत आणि त्या-त्या स्थानिक स्वराज्य संस्था यांची संयुक्ती राहणार आहे.

Dhule Municipal Corporation

Dhule Municipal Corporation

काय सुरु राहणार?

जिल्हा अंतर्गत प्रवासी वाहतूक, वृत्तपत्र टॅक्सी, रिक्षा (अत्यावश्यक व परीक्षेसाठी) दुचाकी वाहने केवळ वैद्यकीय सेवेसाठी आणि शासकीय औद्योगिक कर्मचारी आणि परीक्षार्थी विद्यार्थी, मेडिकल , हॉस्पीटल , दुध डेअरी, कृषी केंद्र, उद्योग, गरजू अत्यावश्यक सेवा.

काय बंद राहील

शाळा, महाविद्यालय, सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रम हॉटेल, रेस्टॉरंट (होम डिलेव्हरी, पार्सल वगळता) किरकोळ भाजीपाला, फळे विक्री, धार्मिक स्थळ, शासकीय/ खाजगी बांधकामे, गार्डन, चित्रपटगृह, पानटपरी, शॉपिंग मॉल्स, सलून, खाजगी कार्यालय, हातगाडया बंद राहातील. (Dhule District Four Days Janata Curfew From 14 To 17 March To Prevent Spreading Of Corona Virus )

आठवडे बाजार बंद

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी धुळे जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार 31 मार्चपर्यंत बंद राहतील, असे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा अध्यक्ष जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे दिलीप जगदाळे यांनी दिले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणारी व्यक्ती, संस्था अथवा संघटना महाराष्ट्र (कोव्हिड-19) उपाययोजना नियम 2020 च्या नियम 11 नुसार भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 मधील तरतुदीनुसार दंडनीय तसेच कायदेशीर कारवाईस पात्र राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Dhule District Four Days Janata Curfew From 14 To 17 March To Prevent Spreading Of Corona Virus

संबंधित बातम्या :

Corona Update | कोरोना फोफावतोय, जळगावात शुक्रवार ते रविवार जनता कर्फ्यू, औरंगाबादेत रस्ते ओसाड

उस्मानाबादमध्ये प्रतिबंधात्मक आदेश; दर रविवारी जनता कर्फ्यू; धार्मिक स्थळे आणि आठवडी बाजार बंद

Maharashtra corona report today : जळगावात जनता कर्फ्यू, नाशिकमध्ये बाजारपेठा पूर्णपणे बंद, बुलडाण्यात टाळेबंदी

Non Stop LIVE Update
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?
शिंदेंची पत्रकार परिषद, लोकसभा उमेदवारांची घोषणा? संभाव्य यादीत कोण?.
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच
महायुतीत छत्रपती संभाजीनगर जागेवरून पेच कायम, शिवसेना-भाजपात रस्सीखेच.
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?
दिलीप वळसे पाटलांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, काय घडलं? कशीये प्रकृती?.
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती
डॉक्टर, नर्सेस यांची इलेक्शन ड्युटी रद्द ; निवडणूक अधिकाऱ्यांची माहिती.
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा
तटकरे पडणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ, शेकापचे जयंत पाटीलांचा दावा.
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?
शिंदेंनी शब्द दिला म्हणून गुवाहाटीला, नाहीतर... बच्चू कडू काय म्हणाले?.
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन
मस्तीत आलेल्यांना... आमदार बच्चू कडू यांचं भाजप कार्यकर्त्यांना आवाहन.
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?
लोकसभेच्या 16 लढती फिक्स, कुठं कोणासोबत होणार थेट फाईट?.
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले
धैर्यशील माने यांना हातकणंगलेतून पुन्हा तिकीट मिळणार का? काय म्हणाले.