‘सुधीर मुनगंटीवार बहीण-भावाच्या पवित्र नात्याला बदनाम करतायत’, उद्धव ठाकरेंची सडकून टीका

"तुम्ही एकतर महिलांचं रक्षण करत नाहीत. सुधीर मुनगंटीवार एवढे बिभत्सपणाने बोलले आहेत, बहीण-भावाच्या नात्यावर बोलले आहेत. एवढ्या बिभत्सपणाने सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री म्हणून बसले आहेत. हे सांस्कृतिक मंत्री?" असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

'सुधीर मुनगंटीवार बहीण-भावाच्या पवित्र नात्याला बदनाम करतायत', उद्धव ठाकरेंची सडकून टीका
उद्धव ठाकरे आणि सुधीर मुनगंटीवार
Follow us
| Updated on: May 07, 2024 | 8:00 PM

महाविकास आघाडीची आज धुळ्यात सभा पार पडली. या सभेत शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांच्यावर निशाणा साधला. तसेच उद्धव ठाकरेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवरही सडकून टीका केली. “महाराष्ट्रात येणारे सर्व उद्योग हे सगळे ते गुजरातला घेऊन गेले. तुम्ही त्यांना (धुळ्याचे विद्यमान खासदार सुभाष भामरे) दोन वेळा खासदार म्हणून निवडून दिलं आहे. त्यांना एकदा विचारा की, इथली एमआयडीसी ओस का पडलेली आहे? उद्योगधंदे का आले नाहीत? तुम्ही एकतर महिलांचं रक्षण करत नाहीत. सुधीर मुनगंटीवार एवढे बिभत्सपणाने बोलले आहेत, बहीण-भावाच्या नात्यावर बोलले आहेत. एवढ्या बिभत्सपणाने सुधीर मुनगंटीवार हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री म्हणून बसले आहेत. हे सांस्कृतिक मंत्री?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

“मुद्दामून तुम्ही पाहा ते बहीण-भावाच्या नात्यावर काय बोलले आहेत ते. बहीण-भावाच्या पवित्र नात्याला बदनाम करता, अरे तुम्ही आम्हाला हिंदुत्व काय शिकवता, तुम्हाला बहीण-भावाचं नातं माहिती नाही. तुमच्याकडून आम्ही हिंदुत्व शिकायचं? मोदींच्या हातात म्हणे, देश सुरक्षित नाही. अहो देशातल्या महिला सुरक्षित नाहीत. तिथल्या त्या महिला क्रीडापटू तिथे आंदोलनाला बसल्या होत्या. त्यांच्याकडे बघायला तुम्हाला वेळ नाही. मणिपूरमधील महिलांची धींड काढल्यानंतर ना गृहमंत्री तिथे जात, ना पंतप्रधान तिकडे जात, आता काल-परवा तिकडे कर्नाटकात घडलेली घटना. प्रज्वल रेवन्ना. मोदींनी जाहीर भाषणात वक्तव्य केलं की, रेवन्नाला मत म्हणजे मला मत. मग त्याने केलेले गुन्हे तुमच्या माथी मारायचे की नाही?”, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

‘कार्यकर्त्यांच्या घरी तुम्ही रात्र-अपरात्री पोलीस पाठवता…’

“तो रेवन्ना आज फरार झालाय. साध्या शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या घरी तुम्ही रात्र-अपरात्री पोलीस पाठवता. अजूनही दमदाटी सुरु आहे. एकतर भाजपात ये, मिंध्यांकडे जा नाहीतर तुरुंगात जा. 4 जून पर्यंत जरा थांबा. 5 जून उजाळेल तेव्हा आमचं सरकार दिल्लीत असेल. मग तुम्ही कोणत्याही बिळात लपा. अगदी सुरतच्या बिळामध्येही लपलात तरी ती बिळं काढून, तुमच्या शेपट्या धरुन तुम्हाला आम्ही उलटं लटकवल्याशिवाय राहणार नाही. पण तो प्रज्वल रेवन्ना आज पळून गेलेला आहे”, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

“मोदी सरकार तर आज येत नाही. हे बुरसटलेलं सरकार परत येणार नाही. परत येऊ द्यायचं नाही. पण हे सरकार पुन्हा आलं तर जो प्रज्वल रेवन्ना आज पळून गेला आहे. त्याला हे सन्मानाने बोलवतील, सत्कार करतील आणि त्यांना केंद्रात महिला आणि बाल कल्याण विभागाचा मंत्री बनवतील . आपलं सरकार आल्यानंतर हा प्रज्वल रेवन्ना जिथे असेल तिथून खेचत आणून मोदीजी तुमच्या गळ्यामध्ये त्याची जबाबदारी बांधल्याशिवाय राहणार नाही. कारण तुम्ही त्याला मत म्हणजे तुम्हाला मत असं सांगितलेलं आहे”, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी केली.

Non Stop LIVE Update
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका
मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास..योगींच्या वक्तव्यावरून ठाकरे गटाची टीका.
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण
लोकसभेचा निकाल अन् त्याच दिवशी जरांगे पाटलांचं पुन्हा एकदा उपोषण.
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल
नवा परळी पॅटर्न म्हणत रोहित पवारांचं ट्विट अन निवडणूक आयोगावर हल्लाबोल.
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा
तेव्हा राष्ट्रवादीकडे CM पदासाठी योग्य नेता नव्हता,शरद पवारांचा खुलासा.
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
'त्यांना' शिंदे मुख्यमंत्री म्हणून नको होते, राऊतांचा मोठा गौप्यस्फोट.
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
आता सरकारच्या दोऱ्या माझ्या हातात, एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?.
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?
तसाच गेम शिंदेंसोबत, नारायण राणेंबद्दल फडणवीसांचा मोठा गौप्यस्फोट काय?.
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार
मुंबईत कुणाचा किती टक्का? मराठी मताचं विभाजन होणार? कोण किंगमेकर ठरणार.
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट
बीड मतदाससंघात बोगस मतदान? 'ते' 5 व्हिडीओ रोहित पवारांकडून टि्वट.
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा
कोटेचांवर पैसे वाटल्याचा आरोप, शिवसैनिकांवर कारवाई अन् ठाकरेंचा इशारा.