मृत मुलीवर दोन दिवस उपचार, चौकशीसाठी दफन मृतदेह बाहेर काढला!

चेतन व्यास, टीव्ही 9 मराठी, वर्धा: काँग्रेसचे माजी खासदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले दत्ता मेघे यांचं वर्ध्याच्या सावंगीतील आचार्य विनोबा भावे रुग्णालय पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं आहे. काही दिवसांपूर्वी कॉमेडियन सुनील पालने रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे आपल्या बहिणीचा जीव गेल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता एका चिमुकलीवर तिच्या मृत्यूनंतरही दोन दिवस उपचार केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला …

मृत मुलीवर दोन दिवस उपचार, चौकशीसाठी दफन मृतदेह बाहेर काढला!

चेतन व्यास, टीव्ही 9 मराठी, वर्धा: काँग्रेसचे माजी खासदार आणि सध्या भाजपमध्ये असलेले दत्ता मेघे यांचं वर्ध्याच्या सावंगीतील आचार्य विनोबा भावे रुग्णालय पुन्हा एकदा आरोपीच्या पिंजऱ्यात उभं आहे. काही दिवसांपूर्वी कॉमेडियन सुनील पालने रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे आपल्या बहिणीचा जीव गेल्याचा आरोप केला होता. त्यानंतर आता एका चिमुकलीवर तिच्या मृत्यूनंतरही दोन दिवस उपचार केल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे.  यामुळे रुग्णालयं पैसे उकळण्याचा अड्डा बनत चालली आहेत की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे.  सात वर्षाच्या मुलीवर मृत्यूनंतरही दोन दिवस उपचार सुरु होते, असा आरोप होत आहे. सावंगी मेघे रुग्णालयात हा प्रकार घडल्याचा आरोप आहे. मृत मुलीच्या वडिलांनी रुग्णालयावर हा धक्कादायक आरोप केला आहे. या आरोपानंतर दफन केलेल्या मुलीचा मृतदेह बाहेर काढून, पुन्हा शवविच्छेदन करण्यात येणार आहे

याप्रकरणी वर्ध्याचे डॉक्टर स्वप्नील तळवेकरसह चौघांवर आरोप आहे. मृत मुलीच्या वडिलांनी सावंगी पोलिसात याबाबतची तक्रार दाखल केली आहे. डॉक्टर स्वप्नील तळवेकरने आधी उपचार केले होते, त्यानंतर त्याने सावंगी रुग्णालयात पाठवल्याचा आरोप आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

वेदांती बारस्कर या सात वर्षीय मुलीचा मृत्यू झाला. मात्र सावंगी रुगणालयाने आपल्या मुलीचा मृत्यू झाल्यानंतरही दोन दिवस रुग्णालयातच ठेवून तिच्यावर उपचार होत असल्याचं नाटक केलं, असा आरोप तिच्या वडिलांनी केला.

वडिलांच्या तक्रारीनंतर बोरगाव मेघे येथील स्मशानभूमीतून पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात येणार असून, शवविच्छेदन केलं जाणार आहे. त्यासाठी फॉरेन्सिक विभागाचा चमू दाखल झाला आहे.

या घटनेतील सत्य तपासअंती समोर येईल, पण मृतदेहावर जर उपचार सुरु असतील तर ते अतिशय भयानक असेल.

सुनील पालचा आरोप

हास्यसम्राट सुनील पाल यांनी काही दिवसांपूर्वीच वर्ध्यातील भाजप नेते दत्ता मेघे सावंगी येथील रुग्णालयाविरोधात एक व्हिडीओ जारी केला होता. या रुग्णालयाच्या बेजबाबदारपणामुळे आपल्या बहिणीचा जीव गेला असा त्यांचा आरोप आहे. बहिणीवर अंत्यंस्कार केल्यानंतर त्यांनी आणखी एक व्हिडीओ जारी करत या रुग्णालयातील भ्रष्टाचार चव्हाट्यावर आणण्याचा इशारा दिला. शिवाय यामुळे काही डॉक्टरांकडून मला धमक्या येत असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

संबंधित बातमी 

कॉमेडीयन सुनील पालला सोशल मीडियावरुन धमक्या, व्हिडीओ जारी

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *