विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची वळसे-पाटलांची घोषणा, कोणत्या गुन्ह्यांचा असणार समावेश?

विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्याची वळसे-पाटलांची घोषणा, कोणत्या गुन्ह्यांचा असणार समावेश?
दिलीप वळसे पाटील
Image Credit source: tv9

विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने त्यांना नोकरीच्या वेळी येणाऱ्या अडचणी आणि इतर अडचणी लक्षात घेता गृहमंत्रालयाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज विद्यार्थ्यांसंबंधी एक मोठी घोषणा केलीय.

दादासाहेब कारंडे

|

Mar 29, 2022 | 4:33 PM

मुंबई : कोरोनाकाळात (Corona) लोकांनी बाहेर पडून नये आणि कोरोना वाढू नये यासाठी अनेक नियम लागू केले होते. जागोजात नाकाबंदी संचारबंदी (Curfew) लागू करण्यात आली होती. नाक्यानाक्यावर, चौका-चौकात पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. नियम मोडणाऱ्यांवर कडक कारवाई (Police Case) करण्यात येत होती. संचारबंदी आणि जमावबंदीचे नियम मोडल्याप्रकरणी अनेकांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. पोलीस अनेकांना काठ्यांचा प्रसाद देताना, उठाबशा काढून घेताना दिसून आले. यात अनेक विद्यार्थ्यांवरही गुन्हे दाखल करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल झाल्याने त्यांना नोकरीच्या वेळी येणाऱ्या अडचणी आणि इतर अडचणी लक्षात घेता गृहमंत्रालयाकडून एक मोठा निर्णय घेण्यात आलाय. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी आज विद्यार्थ्यांसंबंधी एक मोठी घोषणा केलीय.

वळसे-पाटलांची मोठी घोषणा

संचारबंदी मोडल्याचे गुन्हे मागे घेणार

कोरोनाकाळात विद्यार्थ्यांवर संचारबंदी मोडल्याचे गुन्हे हे मागे घेणार असल्याचे गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मोठी दिलासा मिळाला आहे. कोरोना संक्रमण काळात संचारबंदीचे नियम मोडणाऱ्या विद्यार्थ्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. या सर्व विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करून त्यांच्यावरील गुन्हे मागे घेण्याचा निर्णय गृह विभागाने तत्त्वतः घेतला असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी माध्यमांना दिली. या संदर्भात मंत्रिमंडळ बैठकीत प्रस्ताव मांडण्यात येईल. त्याद्वारे विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घेण्यावर विचार केला जाईल, जेणेकरून त्यांना भविष्यात वा परदेशी शिक्षणासाठी जाताना अडचणींचा सामना करावा लागू नये, हा आमचा प्रयत्न राहील, असे गृहमंत्री म्हणाले.

विद्यार्थ्यांना या निर्णयामुळे मोठा दिलासा

परदेशात शिक्षणासाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना या गुन्ह्यामुळे विशेष अडचणी निर्माण होत होत्या. पासपोर्ट काढण्यापासून ते पोलीस व्हेरिफिकेशनपर्यंत सर्व बाबींची पूर्ताता या विद्यार्थ्यांना करावी लागते. अशा वेळी संबंधित व्यक्तीवर गुन्हा दाखल असेल तर तसे नमून केले जाते. त्यामुळे विद्यार्थी अडचणीत सापडले होते. ही निर्णय फक्त कोरोनाकाळात दाखल झालेल्या गुन्ह्यांच्या बाबतीत घेण्यात आलेला आहे. इतर प्रकरणातील गुन्ह्यांना हा निर्णय लागू होणार नाही, हे मात्र लक्षात घ्यावं लागणार आहे. मात्र कोरोनाकाळातील किरकोळ गुन्ह्यांमुळे विद्यार्थ्यांची होणारी अडचण दूर झाल्याने मोठा दिलासा मिळाला आहे.

Ulhasnagar Crime : उल्हासनगरात चार महिन्यांपासून बेपत्ता मुलीची सुटका, पळवून नेणाऱ्या आरोपीला बेड्या

Sangli Crime : सांगलीत रस्ताच्या कडेला बेवारस स्त्री जातीचे बाळ सापडले

Nagpur Murders | नागपूर मार्चमध्ये रक्ताने माखले, महिनाभरात खुनाच्या 9 घटना; नातेवाईक, मित्रांनीच केला घात

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें