AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात वडिल सतीश सालियन यांचा मोठा निर्णय, आज ते नोटीस घेऊन स्वत: थेट..

Disha Salian Case : मागच्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात दिशा सालियन प्रकरणाची चर्चा आहे. उच्च न्यायालयाने हे प्रकरण सीबीआयकडे दिलं आहे. दिशाचे वडिल सतीश सालियन यांच्या जबानीनंतर सीबीआयने या प्रकरणी एफआयआर दाखल केला आहे.

Disha Salian Case : दिशा सालियन प्रकरणात वडिल सतीश सालियन यांचा मोठा निर्णय, आज ते नोटीस घेऊन स्वत: थेट..
Aaditya Thackeray-Disha Salian Case
| Updated on: Sep 19, 2026 | 8:57 AM
Share

मुंबई उच्च न्यायालयाने दिशा सालियन प्रकरणाचा तपास सीबीआयकडे दिल्यापासून पुन्हा हे प्रकरण पुन्ह चर्चेत आलं आहे. दिशाचे वडिल सतीश सालियन यांच्या जबानीनंतर सीबीआयने या प्रकरणी एफआयआर दाखल केला. त्या FIR मध्ये आदित्य ठाकरे यांचं नाव आहे. आज दिशाचे वडिल सतीश सालियन हे नोटीस देण्यासाठी मातोश्रीवर जाणार आहेत. दिशा संदर्भात आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांनी काही वक्तव्य केली. त्या संदर्भात दिशाच्या वडिलांनी आदित्य आणि अनिल देशमुख यांच्या विरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला आहे. याचीच नोटीस देण्यासाठी सतीश सालियन आज संध्याकाळी चार वाजता मातोश्रीवर जाणार आहेत. सतीश सालियन यांनी आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करताना 500 कोटींच्या भरपाईची मागणी केली आहे.

आदित्य ठाकरे आणि अनिल देशमुख यांनी आपली वक्तव्य मागे घ्यावीत तसच त्यांनी माफी मागावी अशी मागणी सतीश सालियन यांनी केली आहे. सात दिवसांच्या आत या मागण्या पूर्ण करा असं त्यांनी नोटीसमध्ये म्हटलं आहे. दिशा सालियन ही सेलिब्रटी मॅनेजर होती. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत सोबत तिने काम केलं होतं. “दिशाला मी कधीही भेटलो नाही. तिच्या मृत्यू प्रकरणाशी माझं नाव जोडणं हा चुकीच्या प्रचार मोहिमेचा भाग आहे” असं आदित्य ठाकरे बुधवारी म्हणाले. त्यानंतर ही नोटीस दिली आहे.

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

“मी दिशा सालियनला कधीही भेटलो नाही. माझा तिच्याशी काही संबंध नाही. मागच्या सहावर्षांपासून व्यक्तिगत शत्रूत्व आणि राजकीय हेतूने या प्रकरणात माझं नाव गोवलं जात आहे” असं आदित्य ठाकरे एक्सवरच्या पोस्टमध्ये म्हणाले. “काही लोक जाणीवपूर्वत मुद्दामून माझं नाव या प्रकरणाशी जोडत आहेत. या प्रकरणात माझ्याविरोधात कुठलाही पुरावा नाहीय” असं आदित्य ठाकरे म्हणाले. दिशा सालियन प्रकरणावरुन सध्या आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण रंगलं आहे. “दिशा सालियन प्रकरणात माझं नाव येणं दुर्देवी असून ही चुकीची प्रचार मोहिम सुरु आहे. कोणाचही चारित्र्यहनन न करता, कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय निपक्षपातीपणे अधिकृत यंत्रणेला तपास करु द्या” असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Follow Us
फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने..
Kalyan Nagar Highway | Rain | फक्त 10 मिनिटांच्या पावसाने कल्याण-नगर महामार्ग जलमय! वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल
दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या
Eknath Shinde : दुष्काळसदृश परिस्थितीवर मोठी घोषणा, 5 तारखेपासून पिकांच्या नुकसानीच्या पंचनाम्यांसाठी प्रशासनाला तयारीचे आदेश
मराठमोळ्या गोंधळ सिनेमाची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
Oscar2027 | मराठी सिनेमाची जगभरात दणदणीत एन्ट्री! गोंधळची ऑस्कर 2027 साठी भारताकडून अधिकृत निवड
आदित्य ठाकरेंना अटक करा, दिशा सालियन प्रकरणावर राणेंची थेट मागणी
Nitesh Rane | आदित्य ठाकरेंना अटक करा, चौकशी करा...दिशा सालियन प्रकरणावर नितेश राणेंची थेट मागणी; उद्धव ठाकरेंच्या आरोपांनाही  दिलं प्रत्युत्तर
ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा...
TMC | ममता बॅनर्जींच्या गटाला फुटबॉल, ऋतब्रत गटाला लिफाफा! तृणमूल काँग्रेसच्या दोन गटांना निवडणूक आयोगाकडून नवी नावं-नवी चिन्हं जाहीर
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम
Maharashtra Education | महाराष्ट्रात येणार 7 परदेशी विद्यापीठांचे, कॅम्पस फडणवीस म्हणाले...
ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक
Sunil Prabhu | ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभू यांच्या गाडीची पादचाऱ्याला धडक; 1 जण जखमी
सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन
Ravindra Chavan | सरकार 100 टक्के शेतकऱ्यांच्या पाठिशी! रवींद्र चव्हाणांचं मोठं आश्वासन; मराठवाडा-विदर्भातील पावसाच्या स्थितीवर दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्...
Yavatmal | खेळता खेळता कारमध्ये शिरला, दरवाजा बंद झाला अन्..; 4 वर्षाच्या चिमुकल्याचं आयुष्य संपलं
तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव अन्...
TMC : तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का! निवडणूक आयोगाने पक्षाचं नाव चिन्हच गोठवलं