AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ST News : एसटीच्या भाडेवाढीमुळे प्रवासी आणि वाहकात भांडणे, काय झाले नेमके ?

एसटी महामंडळाने शनिवारी मध्यरात्रीपासून मोठी भाडे वाढ जाहीर केली आहे. या भाडेवाढीमुळे ग्रामीण भागातील सर्वसामान्य प्रवाशांना मोठा फटका बसणार आहे. परंत या भाडे वाढीमुळे कंडक्टर आणि प्रवासी यांच्यात भांडण तंटे होत आहेत.

ST News : एसटीच्या भाडेवाढीमुळे प्रवासी आणि वाहकात भांडणे, काय झाले नेमके ?
| Updated on: Jan 25, 2025 | 8:22 PM
Share

एसटी महामंडळाने शनिवार मध्यरात्रीपासून १५  टक्के भाडेवाढ जाहीर केली आहे. त्यामुळे खेडोपाड्यातील सर्वसामान्य जनतेचा प्रवास महागला आहे. एसटीची भाडेवाढ करताना ती पाचच्या पटीत करायला हवी होती. परंतूही भाडेवाढ विषम प्रमाणात झाल्याने आता ग्रामीण भागातील जनतेला तिकीट काढताना सुट्टे पैसे देताना अडचण होत आहे. नवीन भाडेवाढ करताना ती सम प्रमाणात न झाल्याने सुट्टे पैसे जर प्रवाशांकडे नसतील तर कंडक्टर आणि प्रवाशांत वाद होत आहेत. त्यामुळे ही भाडे वाढ एसटी प्रवासी आणि कंडक्टर यांच्यात वाद करणारी ठरली आहे.

एसटी महामंडळाने भाडेवाढ करताना ती विषम संख्येत केलेली आहे. नव्या तिकीट दरानुसार आता फुल तिकीट ११, २१, ३१, ४१, ५१, ६१, ७१, ८१, ९१  या पटीत विषम संख्येत झाले आहे. तर हाफ तिकीट देखील ६, ११, १६, २१, २६, ३१, ३६, ४१, ४६, ५१,५६ असे विषम संख्येत झाले आहे. पूर्वी भाडेवाढ करताना पाच रुपयांच्या पटीत केली जात होती. परंतू नवीन भाडेवाढ मात्र एक रुपयांच्या पटीत केली आहे. त्यामुळे प्रवाशांना तिकीट काढताना एक रुपया अतिरिक्त बाळगावा लागणार आहे. प्रवाशांनी १०,१५,२५,५०  रुपये दिल्यानंतर प्रवाशांकडे एक रुपया नसल्यास कंडक्टर आणि प्रवाशांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. हे टाळण्यासाठी तिकीट दरात तात्काळ बदल करावा लागणार आहे. अन्यथा कंडक्टरच्या डोक्याला ताप होणार आहे.

तर सुट्ट्या पैशांवरुन तंटे होणार नाहीत

दिवाकर रावते परिवहन मंत्री असताना त्यांनी एसटी महामंडळाच्या भाड्यात सम प्रमाणाच्या पटीत भाडेवाढ केली होती. त्यामुळे प्रवाशांना सुट्टे पैसे देताना कंडक्टर आणि प्रवाशांत काही वाद झाले नाहीत. मोटार वाहन अधिनियम १९८८ मधील कलम ६८ ( २) तरतुदी नुसार भाडेवाढ करण्याचे अधिकार राज्य परिवहन प्राधिकरणाला आहेत. त्यांच्याकडे १४.९५ टक्के इतकी वाढ करावी असा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने दिला होता. पण त्याला मंजुरी देताना सम प्रमाणात भाडेवाढ करण्याऐवजी विषम प्रमाणात भाडेवाढ करण्यात आली आहे. तरी या संदर्भात प्राधिकरणाची पुन्हा बैठक घेऊन दुरुस्ती करण्यात यावी आणि सम प्रमाणात भाडेवाढ करावी, तरच वाहक आणि प्रवासी यांच्यात सुट्ट्या पैशांवरुन कोणतेही तंटे होणार नाहीत असे महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी म्हटले आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?