AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमच्या पक्षात लुडबुड करू नका, राष्ट्रवादीला बदनाम केल्यास… रोहित पवारांना गंभीर इशारा

Rohit Pawar : आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे काही नेते पक्ष ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. यावर राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी भाष्य केले आहे.

आमच्या पक्षात लुडबुड करू नका, राष्ट्रवादीला बदनाम केल्यास...  रोहित पवारांना गंभीर इशारा
Rohit Pawar Suraj ChavhanImage Credit source: Google
| Updated on: Mar 31, 2026 | 3:00 PM
Share

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी राष्ट्रवादीचे काही नेते पक्ष ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. यावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी रोहित पवार यांच्या आरोपांवर भाष्य करत त्यांनी इशारा दिला आहे. सूरज चव्हाण यांनी म्हटले की, आम्हाला अशी माहिती मिळाली आहे की रोहित पवार यांनी आमच्या पक्षात फूट पाडण्यासाठी आमच्या नेत्यांना बदनाम करण्यासाठी रोहित पवार यांनी एका एजन्सीला 5 कोटींचे पॅकेज दिले आहे.

रोहित पवार यांच्यावर गंभीर आरोप

रोहित पवार यांनी पक्षातील कार्यकर्तांना आमच्या पक्षावर खोटा आरोप करण्यासाठी आमच्या नेत्यांवर टीका करण्यासाठी नेमणूका केल्या आहेत. त्यांच्या पक्षाचे पदाधिकारी सातत्याने आमच्या पक्षाला सातत्याने बदनाम करण्याचे काम करत आहेत. राष्ट्रवादीमध्ये कशी फूट पडेल, कसी भांडणे लागतील, यासाठी सातत्याने प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या एका प्रवक्त्याने पक्षाच्या संविधानातून काही माहिती वगळण्याची अर्धवट माहिती माध्यमांना दिली. त्यांनी अशी माहिती दिली की सेवा दल, ओबीसी सेल फ्रन्टलमधून वगळले, मात्र हे सेल कधीही फ्रन्टलमध्ये नव्हते, ते सेल म्हणून पक्षात कार्यरत होते. पक्ष स्थापन झाला तेव्हापासून त्यांना फक्त सेलचा दर्जा होता.

आमच्या पक्षात लुडबूड करू नका, अन्यथा…

पुढे बोलताना सूरज चव्हाण यांनी म्हटले की, ‘जाणीवपूर्वक आमचा पक्ष कसा अडचणीत येईल, पक्षाची कशी बदनामी होईल यासाठी रोहित पवार यांच्या टीमकडून केला जात आहे. माझ त्या टीमला एवढच सांगणं आहे, जेवढं लक्ष तुम्ही आमच्या पक्षावर देता, तेवढं लक्ष तुम्ही तुमच्या आमदार-खासदारांवर द्या. मोहोळचे आमदार कोणत्या पक्षाचा बॅनर लावून कार्यक्रम घेतात ते पहा. आमच्या पक्षाला शिस्त लावण्यासाठी सुनेत्रा पवार सक्षम आहेत. आमच्या पक्षात लुडबूड करू नका. यापुढे जर राष्ट्रवादी पक्षावर टीका टिप्पणी केली तर जशास तसं उत्तर आमच्याकडून दिलं जाईल.’

सूरज चव्हाण यांनी खरात प्रकरणावर बोलताना म्हटले की, खरात प्रकरण खूप गंभीर आहे. त्याबाबत तपास चालू आहे तो योग्य पद्धतीने चालला आहे. त्यावर अधिक काही बोलावे असे मला वाटत नाही. तसेच रूपाली चाकणकर यांना समन्स आल्यानंतर त्या चौकशीला सामोऱ्या जातील.

Follow Us
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला
सुषमा अंधारे यांचा चित्रा वाघ यांना टोला: कार्यकाळ संपतोय म्हणून उसने अवसान?
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार
महाराष्ट्र आणि जर्मनीच्या हेसन राज्यात ऐतिहासिक सामंजस्य करार: गुंतवणूक आणि कौशल्य विकासाला बळ
स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
मुंबई एफडीएची मोठी कारवाई; स्टेटस रेस्टॉरंट, बॉम्बे रेडिओ क्लबसह 7 आस्थापनांचे परवाने निलंबित
झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर कारवाई करा, युवासेनेचा इशारा
मीरा-भाईंदरमध्ये झेप्टोच्या बेकायदेशीर वाहनांवर, अल्पवयीन चालकांवर कारवाईची युवासेनेची मागणी
अंतर्गत लोकशाही पक्षफुटीला प्रतिबंध करते- राहुल नार्वेकर
राहुल नार्वेकर: नेत्यांच्या भावना समजल्यास आणि अंतर्गत लोकशाहीमुळे पक्ष फुटणार नाहीत.
पुण्यात भाजप-राष्ट्रवादी संघर्ष तीव्र
Pune : पुण्यात भाजप-राष्ट्रवादी वाद चिघळला: चंद्रकांत पाटलांच्या विकासकामांच्या ऑडिटची मागणी नगरसेवकांना भोवली?
पॅलेट गन पीडिताच्या एका महिन्याच्या संघर्षानंतर अखेर FIR दाखल
Delhi : राहुल गांधींच्या मागणीनंतर पॅलेट गन प्रकरणी अखेर FIR दाखल
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना मंत्री दादा भुसेंचं विधान
अभिजीत दीपके राजीनाम्याची मागणी करत असताना शिक्षण मंत्री दादा भुसेंचं मोठं विधान, म्हणाले...
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या
मोठी बातमी! शिवसेनेतील जिल्हाप्रमुखांवर हल्ला... मंत्री सामंतांच्या दौऱ्याआधीच मोठा राडा!
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर...
मोठी बातमी! शिवसेनेतील महिला नेत्याला मोठं गिफ्ट; थेट या पदावर नियुक्ती