सोशल मीडियावर यूजीसीचं जे पत्र व्हायरल होतंय त्यावर विश्वास ठेवू नका – उदय सामंत

सोशल मीडियावर यूजीसीचं जे पत्र व्हायरल होतंय त्यावर विश्वास ठेवू नका - उदय सामंत
udya samanat

वसतिगृह सुरू करण्यासंदर्भात अध्यक्षीय समिती नेमली आहे. मात्र आम्ही 8 दिवसात जो व्हेरीयंट पसरतोय त्याची माहिती घेतोय.  तिसरी लाट येईल का ? तज्ञांकडून मतं मागवली आहेत. मात्र जर पुन्हा क्वारंटाईन सेंटरसाठी वसतिगृह लागली तर करणार काय? त्यामुळे शांतपणे आम्ही वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: प्राजक्ता ढेकळे

Dec 13, 2021 | 2:38 PM

पुणे – लसीचे दोन डोस ज्या विद्यार्थ्याचे झालेत त्यांना ऑफलाईन परीक्षा देता येईल, ज्या विद्यार्थ्यांचे झाले नसतील त्यांना ऑनलाईन परीक्षा देता येतील . दोन्ही पर्याय परीक्षेसाठी उपलब्ध आहेत..मात्र जे यूजीसीचं पत्र सोशल मीडीयवर व्हायरल होतंय ते खोटं आहे.त्या पत्रावर विश्वास ठेऊ नका ! दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत..ज्या त्या जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापन विभागानं निर्णय घेतलाय तशा परीक्षा होतील, कोल्हापूरातील केआयटी महाविद्यालयात जो गोंधळ झाला त्यात मला हस्तक्षेप करावा लागला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या ११९ व्या पदवी प्रदान समारंभ प्रसंगीसाठी ते पुण्यात उपस्थित होते. त्यावेळी त्यानी माध्यमांच्या प्रतिनिधींनी सोबत संवाद साधला.

वसतिगृह सुरु होणार का?

वसतिगृह सुरू करण्यासंदर्भात अध्यक्षीय समिती नेमली आहे. मात्र आम्ही 8 दिवसात जो व्हेरीयंट पसरतोय त्याची माहिती घेतोय.  तिसरी लाट येईल का ? तज्ञांकडून मतं मागवली आहेत. मात्र जर पुन्हा क्वारंटाईन सेंटरसाठी वसतिगृह लागली तर करणार काय? त्यामुळे शांतपणे आम्ही वसतिगृह सुरू करण्याचा निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

म्हाडाची परीक्षा रद्द झाली म्हाडा भरती परीक्षा पेपर फुटण्याचा प्रयत्न झाल्याने परीक्षा रद्द झाली. त्यामुळे परीक्षा पुढे ढकलावी लागली कारण त्याला बेस आहे, काही जणांना अटक केलीये, मात्र ज्या काही परीक्षा होतायेत त्या अतिशय पारदर्शक पणे व्हायला हव्यात यासाठी सरकार प्रयत्न करत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. संजय राऊत जे बोलले ते योग्यच आहे राजकीय भावनेतून हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. आणि नारायण राणे जे म्हणतात मुख्यमंत्री सक्षम नाहीत ते काय आता बोलत नाहीत ते आधीपासूनच बोलत आहेत. मात्र शेलारांनी काय वक्तव्य केलंल तुम्ही सगळ्यांनी पाहिलंय. त्यामुळे आता त्यावर काय बोलायचं? असेही सामंत म्हणाले आहेत.

छत्रपती शिवरायांच्या जन्मभूमीतील कौशल तांबे क्रिकेटचं मैदान गाजवणार; अंडर 19 टीम इंडियामध्ये निवड

Nagpur | ओमिक्रॉनमुळं मनपा प्रशासन अलर्ट; परदेशी जायचंय तर प्रतिज्ञापत्र भरून द्या

Nashik | गर्गे स्टुडिओ दरोडाप्रकरणी परप्रांतीय टोळीला बेड्या; 2 अल्पवयीन मुलांचा समावेश

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें