Nagpur | ओमिक्रॉनमुळं मनपा प्रशासन अलर्ट; परदेशातून येताना प्रतिज्ञापत्र भरून द्या

Nagpur | ओमिक्रॉनमुळं मनपा प्रशासन अलर्ट; परदेशातून येताना प्रतिज्ञापत्र भरून द्या
OMICRON

नागपुरातील ओमिक्रॅानचा पहिला रुग्णं ट्रेस करणं शक्य झालंय. ओमिक्रॅान बाधित रुग्णाला कुठलेही लक्षणं नाहीत. ओमिक्रॅान बाधित रुग्णाच्या संपर्कातील कुटुंबीय निगेटिव्ह आल्यानं मोठा दिलासा मिळालाय.

गजानन उमाटे

| Edited By: गोविंद हटवार, टीव्ही 9 मराठी डिजीटल

Dec 13, 2021 | 3:08 PM

नागपूर : नागपुरात देशांतर्गत विमान प्रवास करणाऱ्यांना प्रतिज्ञापत्र भरून देणं अनिवार्य करण्यात आलंय. प्रत्येक विमान प्रवाशाला प्रवासाची माहिती देणं बंधनकारक झालंय. ओमिक्रॅानच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका प्रशासनानं ही खबरदारी घेतलीय.

 

सहप्रवासी शोधण्याचं काम सुरू

नागपुरातील ओमिक्रॅानचा पहिला रुग्णंही याच प्रक्रियेतून ट्रेस करणं शक्य झालंय. ओमिक्रॅान बाधित रुग्णाला कुठलेही लक्षणं नाहीत. ओमिक्रॅान बाधित रुग्णाच्या संपर्कातील कुटुंबीय निगेटिव्ह आल्यानं मोठा दिलासा मिळालाय. ओमिक्रॅान बाधित रुग्णाचे विमानातील सहप्रवाशी शोधण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. रुग्णाला लक्षणं नसल्यानं इतरांना संसर्ग झाला नसल्याची मनपाची माहिती आहे.

ओमिक्रॉन बाधित रुग्णाचा प्रवास

ओमिक्रॉन बाधित रुग्ण तीन डिसेंबर रोजी ऑफ्रिकेतील बुकिना फासो शहरातून विमानमार्गे दिल्लीत आला. पाच डिसेंबर रोजी विमानानं नागपूर गाठलं. पाच डिसेंबर रोजीच नागपूर विमानतळावर आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. सहा डिसेंबर रोजी चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याला एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सात डिसेंबर रोजी जिनोम सिक्वेंसिंगसाठी नमुने पाठविण्यात आले. विषाणू विज्ञान संस्थेकडून बारा डिसेंबर रोजी ओमिक्रॉनची बाधा असल्याचा अहवाल आला.

दहा दिवसांनंतर पुन्हा तपासणी

ओमिक्रॉनबाधित रुग्णाची पुन्हा दहा दिवसांनंतर तपासणी करण्यात येईल. चाळीस वर्षीय रुग्णाला वेगळ्या खोलीत ठेवण्यात आलंय. त्याला विशेष लक्षणं नाहीत. ओमिक्रॉन बाधित रुग्णांसाठी वेगळा वॉर्ड तयार करण्यात येईल, अशी माहिती एम्सच्या संचालिका डॉ. विभा दत्ता यांनी दिली.

आरोग्य यंत्रणा अलर्ट

ओमिक्रॉनचा रुग्ण सापडल्यानं मेयो-मेडिकल प्रशासन अलर्ट झालंय. मेयोमध्ये सध्या कोरोना बाधित एकही रुग्ण नाही. परंतु, त्यांनी सहाशे खाटा कोरोना बाधितांसाठी ठेवण्याचं प्लानिंग केलेलं आहे. मेडिकलमध्ये फक्त चार रुग्ण कोरोना बाधित आहेत. मेडिकलमध्ये पाचशे खाटा कोरोना बाधितांसाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत. एम्समध्ये तेरा कोरोना बाधित रुग्ण आहेत. शिवाय दोनशे रुग्णांची आपातकालीन स्थितीसाठी व्यवस्था करण्यात आली आहे.

Yavatmal | विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसला पडणार खिंडार; डॉ. महेंद्र लोढा काँग्रेसच्या वाटेवर

Nagpur| आई तू सोडून का गेलीस? युवकाचा तलावात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न

Video – Nagpur | आता माघार नाही, एस कर्मचारी संपावर ठाम, जी कारवाई करायची ती करा!

 

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें