देशभक्ती पाहिजे, दारुभक्ती नको : डॉ. अभय बंग

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी देशभक्ती पाहिजे, दारुभक्ती नको, असं मत व्यक्त केलं आहे (Dr Abhay Bang on Alcohol Ban policy). ते सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

Dr Abhay Bang on Alcohol Ban policy, देशभक्ती पाहिजे, दारुभक्ती नको : डॉ. अभय बंग

वर्धा : ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी देशभक्ती पाहिजे, दारुभक्ती नको, असं मत व्यक्त केलं आहे (Dr Abhay Bang on Alcohol Ban policy). ते सेवाग्राम आश्रमात महात्मा गांधीजींच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी अभय बंग यांनी सरकारकडे दारूबंदीच्या प्रभावी अंमलबजावणीवर भर देण्याची मागणी केली (Dr Abhay Bang on Alcohol Ban policy).

डॉ. अभय बंग म्हणाले, “देशभक्ती पाहिजे, दारुभक्ती नको, स्त्री मुक्त हवी असेल तर समाज दारू मुक्त झाला पाहिजे. जोपर्यंत दारू आहे, तोपर्यंत स्त्री असुरक्षित आहे. प्रत्येक बाईची निर्भया होऊ शकते. महाराष्ट्र शासनाने दारूबंदी असलेल्या 3 जिल्ह्यांचा दारूमुक्त झोन तयार करावा. गडचिरोली पॅटर्नने मुक्तीपथ पॅटर्नने दारू, तंबाखू कमी करावी. जिथं दारुबंदी आहे, तिथं स्त्रियांवर अत्याचार कमी होतात. दारूबंदी हटवल्यास अत्याचार वाढतील. शासनानं दारूबंदीसाठी प्रयत्न करावेत.”


दारूबंदी हा गांधीजींच्या आवडत्या कार्यक्रमांपैकी एक कार्यक्रम होता. महाराष्ट्र शासनानं वर्धा जिल्ह्याला दारूबंदी जिल्हा केला आहे. शेजारच्या चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातही दारूबंदी आहे. दारूबंदीची दारूमुक्ती कशी होईल, हे आव्हान आहे. दारूबंदीची योग्य अंमलबजावणी आणि व्यापक जनसहयोग मिळाल्यास गावातील दारूबंद होऊ शकते, हे गडचिरोलीतील प्रयोगावरून सिद्ध झालंय. गडचिरोली जिल्ह्यातील 600 गावांमध्ये दारुबंदी झाली, असंही डॉ. अभय बंग यांनी नमूद केलं.

डॉ. अभय बंग यांनी चंद्रपूर जिल्यातील दारूबंदी उठवण्याचा कोणताही विचार नसल्याचं स्पष्ट केल्याबद्दल सरकारचं अभिनंदनही केलं.

व्हिडीओ : 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *