सरकारनं उत्पन्न चांगल्या मार्गाने वाढवावं, पापाचा कर नको : डॉ. अभय बंग

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी सरकारला उत्पन्न वाढवण्यासाठी चांगल्या मार्गांचा उपयोग करण्याचा सल्ला दिला आहे (Dr Abhay Bang on Chandrapur Alcohol Ban).

सरकारनं उत्पन्न चांगल्या मार्गाने वाढवावं, पापाचा कर नको : डॉ. अभय बंग
Follow us
| Updated on: Jan 16, 2020 | 1:48 AM

चंद्रपूर : सध्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकासआघाडी सरकारकडून कर उत्पन्न वाढवण्यासाठी चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी हटवण्याबाबत हालचाल सुरु असल्याची चर्चा सुरु आहे. यावर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पद्मश्री डॉ. अभय बंग यांनी सरकारला उत्पन्न वाढवण्यासाठी चांगल्या मार्गांचा उपयोग करण्याचा सल्ला दिला आहे (Dr Abhay Bang on Chandrapur Alcohol Ban). तसेच सरकारनं उत्पन्न वाढीसाठी पापाच्या कराचा आधार घेऊन हजारो कुटुंबं उद्ध्वस्त करु नयेत, असंही आवाहन केलं आहे. यावेळी डॉ. अभय बंग यांनी दारुबंदी हटवण्यासाठी केला जाणारा सर्व युक्तीवादही खोडून काढला (Dr Abhay Bang on Chandrapur Alcohol Ban).

डॉ. अभय बंग म्हणाले, “चंद्रपूरमध्ये 2015 मध्ये लागू झालेली दारूबंदी हटवण्याची चर्चा सुरू असल्याची बातमी समोर येत आहे. मला ही बातमी अविश्वसनीय वाटते. कारण चंद्रपूर जिल्ह्याच्या दारूबंदीसाठी डॉ. राणी बंग अजित पवार यांना भेटल्या तेव्हा त्यांनी स्वतः चंद्रपूरच्या दारूबंदीला पाठिंबा दिला होता. या सरकारने पूर्वीच्या शासनाचे घेतलेले चांगले निर्णय रद्द न करता उलट ती अपूर्ण कामं पूर्ण करावीत. एकीकडे कर्जमाफी, शिवभोजन अशी चांगली कामे केली जात आहेत. मात्र, दारुबंदी हटवून त्याच लोकांना दारू पाजली गेली, तर सरकारची चांगली कामही निरर्थक ठरतील.”

“दारूबंदीनंतर 1 वर्षात 90 कोटी रुपयांची दारू कमी”

सरकारने चांगल्या मार्गाने उत्पन्न वाढवावे. दारूमुळे रस्ते अपघात होतात. सिरोसिस आणि कॅन्सरसारखे रोग होतात. त्यामुळे दारूपासून मिळणारा पापाचा कर कोणत्याही शासनाने वाढवू नये. दारूमुळे अवैध दारू वाढली हा शब्दच्छल आहे. कारण दारूबंदीनंतर सर्वच दारू अवैध ठरते. वस्तुतः बंदीमुळे दारू कमी होते. चंद्रपूरमध्ये दारूबंदी लागू होण्यापूर्वी आम्ही जिल्ह्याचे नमूना सर्वेक्षण केले. त्यावेळी कायदेशीर, बेकायदेशीर अशी दोन्ही प्रकारे 192 कोटी रुपयांची दारू खपत होती. दारूबंदीनंतर 1 वर्षाने केलेल्या सर्वेक्षणात 90 कोटी रुपयांची दारू कमी झाली, असंही डॉ. बंग यांनी नमूद केलं.

“अजित पवार उत्तम प्रशासक, त्यांनी दारुबंदीची चांगली अंमलबजावणी करावी”

डॉ. अभय बंग म्हणाले, “दारुबंदीनंतर चंद्रपूरमध्ये 90 कोटी रुपयांची दारू कमी झाली आहे. उरलेली दारू कशी कमी करायची हा पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचा प्रशासकीय प्रश्न आहे. तिथे पूर्वीचे शासन कमी पडले. अजित पवार उत्तम प्रशासक मानले जातात. त्यांनी आपली क्षमता दारूबंदीच्या चांगल्या अंमलबजावणी वापरावी.”

“गडचिरोलीप्रमाणे चंद्रपूरमध्येही मुक्तीपथ पॅटर्न राबवा”

संपूर्ण दारुबंदी करण्यासाठी केवळ दारुबंदीची घोषणा करुन थांबता येत नाही असं सांगतानाच डॉ. अभय बंग यांनी यासाठी काही उपाययोजनाही सुचवल्या आहेत. ते म्हणाले, “दारूबंदीची चांगली अंमलबजावणी आणि सामाजिक जागृती व्हावी यासाठी गडचिरोली जिल्ह्यात मुक्तिपथ नावाचा प्रयोग गेली 3 वर्ष करण्यात आला. दारूबंदी आणि मुक्तिपथ या संयुक्त प्रयत्नाने गडचिरोलीची दारू 60 ते 65 टक्क्याने कमी झाली. हाच प्रयोग इतर ठिकाणी देखील लागू करण्याची गरज आहे. यासाठी शासनाने पुढाकार घ्यावा.”

“मृत्यू, रोग आणि अपंगत्व निर्माण करणार्‍या प्रमुख 7 कारणांमध्ये दारू”

जगभरात मृत्यू, रोग आणि अपंगत्व निर्माण करणार्‍या प्रमुख 7 कारणांमध्ये दारू हे एक कारण असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं आहे. त्यामुळे सरकारने दारू कमी करण्याचा विचार करावा. दारू पाजून रोग, अपघात आणि बलात्कार वाढवू नये, असं आवाहन डॉ. बंग यांनी महाराष्ट्र सरकारला केलं आहे.

“सरकार तरुण पिढीला व्यसनाधीनतेकडे घेऊन जाणार आहे का?”

ठाकरे सरकारकडून दारुबंदी हटवल्याच्या चर्चेवर भाजपचे नेते आणि विधान परिषद विरोधीपक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले, “हे सरकार आल्यापासून वेगवेगळ्या विषयांना थांबवणं आणि ज्या वाईट गोष्टी आहेत त्या चालू ठेवण्याचं काम करत आहे. हीच या सरकारची मानसिकता दिसते. दारूने अनेकांचे संसार उध्वस्त होतात. तरुण पिढी बरबाद होते. दारूसाठी हे सरकार आलं आहे का? हे सरकार तरुण पिढीला व्यसनाधीनतेकडे घेऊन जाणार आहे का? असाही सवाल दरेकर यांनी आघाडी सरकारला विचारला आहे.

दरम्यान, शेतकरी कर्जमाफी आणि शिवभोजनथाळी या योजना राबविण्यासाठी निधी आवश्यक असल्याचं म्हणत ठाकरे सरकार चंद्रपूर जिल्ह्यातील दारुबंदी हटवण्याची चर्चा सुरु आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी चंद्रपूरचा बुडणारा महसूल भरुन काढण्यासाठी दारुबंदी उठवण्याचा पर्याय चाचपून पाहिल्याचंही बोललं जात आहे. विशेष म्हणजे या प्रस्तावाला स्थानिक काँग्रेस खासदार बाळू धानोरकर यांनी अनुकूलता दर्शवली आहे.

“राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची दारू दुकाने सुरू करण्यासाठी हा प्रस्ताव”

यावर माजी पालकमंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सडकून टीका केली आहे. ते म्हणाले, “काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारच्या काळात बुडणारा रोजगार आणि महसूल सहन करून डान्सबार आणि गुटखाबंदी लागू करण्यात आली होती. केवळ राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची दारू दुकाने सुरू करण्यासाठी हा प्रस्ताव आणला जात आहे.”

व्हिडीओ पाहा:

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.