प्रारूप मतदारयादी जाहीर, नाशिक जिल्ह्यात 45 लाख 50 हजार मतदार; 5 जानेवारी रोजी अंतिम यादी होणार प्रसिद्ध

नाशिक जिल्ह्यासाठीची प्रारूप मतदारयादी निवडणूक शाखेने जाहीर केली आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 45 लाख 50 हजार मतदार असून, अंतिम यादी 5 जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

प्रारूप मतदारयादी जाहीर, नाशिक जिल्ह्यात 45 लाख 50 हजार मतदार; 5 जानेवारी रोजी अंतिम यादी होणार प्रसिद्ध
संग्रहित छायाचित्र.
Follow us
| Updated on: Nov 02, 2021 | 3:52 PM

नाशिकः नाशिक जिल्ह्यासाठीची प्रारूप मतदारयादी निवडणूक शाखेने जाहीर केली आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 45 लाख 50 हजार मतदार असून, अंतिम यादी 5 जानेवारी रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

महापालिका निवडणुकीपूर्वी मतदारयादी अद्ययावत आणि निर्दोष असण्यासाठी पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जात आहे. त्यात 1 जानेवारी ते 29 ऑक्टोबर दरम्यान 1 लाख 40 हजार अर्ज आले होते. त्यानुसार 53 हजार 133 नावे मतदारयादीत समाविष्ट करण्यात आली. 64 हजार 172 नावे वगळली. 19 हजार 74 नावांमध्ये दुरुस्ती करण्यात आली, तर 4 हजार 315 मतदारांनी आपला पत्ता बदलला आहे. दरम्यान आता पुन्हा एकदा 1 ते 30 नोव्हेंबर या काळात मतदारयादीमध्ये नाव नोंदणी करता येणार आहे. सोबतच 13, 14, 27, 28 नोव्हेंबर या तारखांना विशेष मोहीम राबवण्यात येणार आहे. निवडणूक शाखेने जाहीर केलेल्या प्रारूप मतदारयादीमध्ये एकूण 45 लाख 50 हजार 613 मतदार आहेत. यामध्ये पुरूष मतदारांची संख्या ही 23 लाख 80 हजार 392 इतकी आहे. स्त्री मतदारांची संख्या ही 21 लाख 70 हजार 191 आहे. अन्य 30 आहेत. सैन्यातील मतदारांची संख्या 9278 इतकी आहे. मतदान केंद्राची संख्या 4681 आहे.

मतदार याद्यांमध्ये घोळ उघड

नाशिकमध्ये ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मतदार याद्यांमधील दुबार नावाचा मुद्दा गाजतो आहे. नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम आणि नाशिक मध्य या तीन मतदार संघाच्या याद्यांमध्ये शे-दोनशे नव्हे, तर चक्क तब्बल 2 लाख 87 हजार नावे दुबार आढळल्याने खळबळ निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या दहा सदस्यांच्या पथकाने हा घोळ उघडकीस आणला आहे. त्यांनी तीन महिन्यांत मतदार यांद्याची अक्षरशः छाननी केली. तेव्हा नाशिक पश्चिम मतदारसंधात 1 लाख 22 हजार 242 मतदार दुबार आढले. नाशिक पूर्व मतदारसंघात 88 हजार 932 आणि नाशिक मध्य मतदारसंघामध्ये 76 हजार 319 मतदार दुबार आढळले आहेत. या साऱ्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी मतदार यादी शुद्धीकरण मोहीम सुरू केली आहे. त्याअनुषंगाने नागरिकांनी मतदार यादीत दुबार नाव असल्यास फॉर्म नंबर 7 भरून नाव कमी करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले होते. मतदार यादी शुद्धीकरण मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील सर्व 15 मतदार संघात मतदार नोंदणी अधिकारी यांच्यास्तरावर पडताळणीचे काम सुरू आहे. प्राप्त मतदार याद्यांमधील नावांची पडताळणी करण्यासाठी नागरिक, राजकीय पक्ष, अन्य नागरिक व स्वयंसेवी संस्था यांना खात्री करता यावी, यादृष्टीने दुबार मतदारांच्या याद्या www.nashikmitra.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येत आहेत. (Draft voter list announced, 45 lakh 50 thousand voters in Nashik district; The final list will be released on January 5)

इतर बातम्याः

कोणताही शत्रू शुद्र नसतो, पंकजांचे नाशिकमध्ये सूचक वक्तव्य, त्यांच्या मनात सल आहे तरी काय?

Nashik weather: उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका दिवाळीनंतरच; दक्षिण महाराष्ट्रात मात्र ऐन दिवाळीत धारानृत्य!

Non Stop LIVE Update
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?
मतदार निघाले मतदान करायला पण EVM मशीनच बंद, कुठं घडला प्रकार?.
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान
लोकसभेच्या मतदानाचा आज दुसरा टप्पा, महाराष्ट्रात या 8 मतदारसंघात मतदान.
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात
नो खैरे ओन्ली भूमरे...शिंदेंचं आवाहन, फडणवीसांनी काढली विरोधकांची औकात.
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार
भरसभेत पवारांनी लावला मोदींचा व्हिडीओ, तर शिंदे-फडणवीसांकडून पलटवार.