AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राज्यात दुष्काळ जाहीर, मात्र शेतकऱ्यांचा संताप, थेट रस्त्यावर उतरले अन्..

मोठी बातमी समोर येत आहे, अखेर राज्यात दुष्काळ जाहीर झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली आहे. मात्र तरी देखील शेतकऱ्यांमध्ये संताप दिसून येत आहे. शेतकरी रस्त्यावर उतरल्याचं पहायला मिळत आहे.

राज्यात दुष्काळ जाहीर, मात्र शेतकऱ्यांचा संताप, थेट रस्त्यावर उतरले अन्..
शेतकऱ्यांचं आंदोलन Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 26, 2026 | 3:38 PM
Share

यंदा महाराष्ट्रासह संपूर्ण देशावरच ऐल निनोचं मोठं संकट आहे. एल निनोचा परिणाम म्हणून राज्यात पावसाने चांगलीच ओढ दिली. संपूर्ण ऑगस्ट महिना आणि सप्टेंबर महिन्याचे दोन आठवडे राज्यात पाऊसच न झाल्यामुळे खरीप हंगाम हातचा गेला. शेतकरी मोठ्या संकटात सापडले होते. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. शेतकऱ्यांचे डोळे शासनाच्या मदतीकडे लागले होते. आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे राज्यात आज दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. सरकारने राज्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर झाल्याची घोषणा केली आहे.

मात्र एकीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर केला असला तरी देखील दुसरीकडे अजूनही शेतकरी नाराजच आहेत. आज अमरावती जिल्ह्यातल्या गुरुकुंज मोझरी येथे बस स्थानकासमोर शेतकऱ्यांच्या वतीने सरकारच्या दुष्काळाच्या शासन निर्णयाची होळी करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी वाळलेल्या सोयाबीसोबत दुष्काळाचा शासन निर्णय जाळला आहे. सरसकट सर्व पिक उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी १ लाख रुपयांची मदत देण्यात यावी अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली आहे.

265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर

दरम्यान सरकारने शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. राज्यातील 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. राज्यातील 358 तालुक्यांपैकी 265 तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे, याचाच अर्थ जवळपास  75 टक्के महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर झाला आहे. दुष्काळ निवारणासाठी आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आता शासनस्थरावर विविध उपाय योजना करण्यात येणार आहेत. ज्यामध्ये शेतीशी निगडीत कर्ज वसुलीला स्थगिती, जमीन महुसात सूट, विद्यार्थ्यांना फी माफी, कृषी वीजबिलामध्ये सूट, धान्याचं वाटप अशा विविध उपाय योजनांचा समावेश यामध्ये करण्यात आला आहे. दरम्यान आता दयेत्या 5 ऑक्टोबरपासून पंचनामे करण्यात येणार आहेत. या पंचनाम्याची कार्यवाही तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश देखील सर्व जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. दुष्काळ जाहीर झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

Follow Us
हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट
Parbhani : पहाटे 4 वाजता उठायचं, 2.5 किमी... हंडाभर पाण्यासाठी महिलांचा रोजचा संघर्ष; परभणीत दुष्काळाचं गडद सावट, Video व्हायरल
स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज... शायना एन.सी. यांचा राऊतांवर पलटवार
Shaina NC : स्क्रिप्ट रायटर, समुपदेशनाची गरज म्हणत... शायना एन.सी. यांचा संजय राऊतांवर पलटवार
Pune : लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
Video: पुण्यात 28 तासांपासून तुफान गर्दी, डान्स अन् गाणं सुरूच...लांबलेल्या गणेश विसर्जन मिरवणुकांमध्ये काय घडतंय?
आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला...
Jalna : आम्ही मरावं की जगावं... दुष्काळी परिस्थितीबाबत सांगताना शेतकऱ्याला अश्रू अनावर
बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून...
Ganpati Visarjan 2026 : बाप्पा विसर्जनाच्या प्रतीक्षेत ताटकळला; उपनगरचा राजा काल सकाळपासून मढ जेटीवरच, प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह
राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
Maharashtra Drought Issue : राज्यात दुष्काळ जाहीर; दत्ता भरणे नेमकं काय म्हणाले?
राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला दोघांमध्ये नेमकी काय चर्चा?
Sanjay Raut Meet Raj Thackeray : संजय राऊत अचानक राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर! दोघांमध्ये नेमकी काय चर्चा? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत