12 ठिकाणे, 18 तास छापेमारी… हार्ड डिस्क, डॉक्युमेंट्स आणि… पैसे कुठे लपवले? अनिल पवारांच्या घरी ईडीला काय काय सापडले?
वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर ईडीकडून थेट कारवाई करण्यात आली. या कारवाईनंतर मोठी खळबळ उडाली. ईडीकडून अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आली. यानंतर संजय राऊत यांनी थेट मंत्री दादा भुसे यांच्यावर आरोप केली.

वसई : तब्बल 18 तासानंतर वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांची ईडी चौकशी पूर्ण झाली, ज्यानंतर मोठी खळबळ उडाली. सकाळी सात ते रात्री दीड वाजेपर्यंत ईडी अधिकारी यांनी माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांची चाैकशी केली. या कारवाईत ईडीने कुणालाही ताब्यात घेतले नसून,काही कागदपत्र, हार्ड डिस्कमधील डाटा जमा करून घेतला आहे. रात्री दीड वाजता अधिकारी आयुक्त निवास्थानातून बाहेर पडले, त्यावेळी त्यांनी माध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
या चौकशीत नेमके काय सापडले, कुणाचे धागेदोरे ईडी अधिकाऱ्यांचा हाताला लागले. हे मात्र, ईडीच्या अधिकृत माहिती नंतर समोर येणार आहे. तब्बल 18 तास वसई विरार महापालिकेचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांची ईडी चौकशी पूर्ण झाली. वसई विरारमध्ये कालपासून सुरू असलेल्या छापेमारीत मोठी कारवाई झाली. वसई विरार पालिका आयुक्त अनिलकुमार पवार यांच्या नातेवाईकांच्या घरी तब्बल एक कोटी 25 लाख रोख रक्कम सापडली.
अनिलकुमार पवार यांन्या नातेवाईकांच्या घरी लपवलेली रोख रक्कम जप्त केली. ईडीने काल 12 ठिकाणी शोधमोहीम राबवली. सक्तवसुली संचालनालय (ED) कडून नाशिकमधील आणि इतर ठिकाणच्या मालमत्तांची चौकशी सुरू असून, या कारवाईने प्रशासनात खळबळ उडाली आहे. ईडीच्या पथकाने पांडवलेणीच्या पायथ्याशी असलेल्या पाथर्डी परिसरात अनिल पवार यांच्या मालकीच्या 413 चौरस मीटरच्या प्लॉटची पाहणी केली.
सदर भूखंड निसर्गरम्य ठिकाणी असून, याआधीच ईडीने त्याची कागदोपत्री जप्ती केल्याची सूत्रांची माहिती आहे. ईडीच्या प्राथमिक तपासात, पवार यांनी प्रशासकीय पदावर असताना कायद्याच्या पळवाटा शोधून सदर प्लॉट आपल्या नावे केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भात कागदपत्रांची आणि व्यवहारांची बारकाईने तपासणी केली जात आहे.
पांडवलेणी परिसरातील पाहणीनंतर सटाणा (जि. नाशिक) येथील अनिल पवार यांच्या इतर मालमत्तांचीही चौकशी केली. संबंधित मालमत्तांबाबत अनियमितता असल्याचा संशय असून, त्यासंबंधी अधिक तपशील गोळा केला जात आहे. ही कारवाई आर्थिक गैरव्यवहारांशी संबंधित असून, लवकरच आणखी काही मालमत्तांवर कारवाई होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे. ईडीच्या या हालचालींमुळे प्रशासकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.
