AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ईडीच्या चौकशीत प्रतिभा चाकणकर यांचा खळबळजनक दावा, धार्मिक कार्यासाठी…

रुपाली चाकणकर यांची बहिण प्रतिभा चाकणकर यांची 8 तास ईडीने कसून चौकशी केली. या चौकशीमध्ये धक्कादायक खुलासे झाले. त्यानंतर ईडीने प्रतिभा यांचा मुलगा तनमय चाकणकरला देखील समन्स बजावले आहे.

ईडीच्या चौकशीत प्रतिभा चाकणकर यांचा खळबळजनक दावा, धार्मिक कार्यासाठी...
Pratibha ChakankarImage Credit source: Tv9 Network
| Updated on: May 05, 2026 | 8:28 AM
Share

नाशिकमधीस भोंदूबाबा अशोक खरात दिवसेंदिवस चांगलाच अडकत चालला आहे. खरातवर अनेक गंभीर गुन्हे दाखल झाले आहेत. त्यानंतर खरातचे आर्थिक व्यवहार देखील तपासले गेले. दरम्यान, रुपाली चाकणकरांची बहिण प्रतिभा चाकणकर आणि अशोक खरात यांच्यामध्ये 230 कॉल्स झाल्याची माहिती समोर आली. त्यानंतर ईडीने प्रतिभा चाकणकर यांना समन्स बजावले होते. आता प्रतिभा यांनी चौकशीमध्ये खळबळजनक दावा केला आहे.

८ तास कसून चौकशी

नाशिकमधील समता नागरी सहकारी पतसंस्थेतील संशयास्पद व्यवहार आणि बोगस बँक खात्यांच्या प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ED) आपली पकड घट्ट केली आहे. या तपासादरम्यान प्रतिभा चाकणकर यांची सुमारे ८ तास कसून चौकशी करण्यात आली असून या चौकशीत त्यांनी केलेले दावे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहेत.

प्रतिभा चाकणकर काय म्हणाल्या?

चौकशीदरम्यान प्रतिभा चाकणकर यांनी अत्यंत धक्कादायक माहिती दिली आहे. त्यांनी असा दावा केला की, त्यांनी स्वतःचे आणि त्यांचा मुलगा तनमय चाकणकर याचे आधार आणि पॅन कार्डचे तपशील कॅप्टन खरात यांना दिले होते. हे तपशील केवळ धार्मिक कामासाठी वापरले जातील, असे आश्वासन त्यांना खरात यांच्याकडून देण्यात आले होते. मात्र, खरात यांनी या विश्वासाचा गैरवापर करून त्यांच्या कागदपत्रांच्या आधारे बेकायदेशीररीत्या बोगस बँक खाती उघडल्याचा आरोप प्रतिभा चाकणकर यांनी केला आहे.

या प्रकरणातील तपासात काही अत्यंत महत्त्वाचे धागेदोरे ईडीच्या हाती लागले आहेत. २०२५ ते २०२६ या कालावधीत प्रतिभा चाकणकर आणि कॅप्टन खरात यांच्यामध्ये २३० कॉल्स आणि २०० पेक्षा अधिक मेसेजेसची देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर आली असून, या मोठ्या प्रमाणावरील संवादाची सध्या ईडीकडून सखोल पडताळणी सुरू आहे. विशेष म्हणजे, उघडण्यात आलेल्या या संशयास्पद खात्यांमध्ये कॅप्टन खरात याचे नाव ‘नामनिर्देशित’ (Nominee) म्हणून नोंदवण्यात आले होते आणि खाते उघडताना खरातचाच मोबाईल नंबर वापरल्याचा प्राथमिक संशय आहे.

आर्थिक व्यवहारांच्या बाबतीतही ईडीला मोठा संशय आहे. २०२१ मध्ये जमा झालेले सुमारे २६ लाख रुपये एका विशेष खात्यात वळवून २०२४ पर्यंत ठेवण्यात आले होते, ज्यावर सुमारे ४० लाख रुपयांचा परतावा मिळाल्याचे तपासात दिसून येत आहे. या आर्थिक नफ्याचे नेमके स्त्रोत काय होते, याचा शोध आता घेतला जात आहे. नाशिकच्या समता नागरी सहकारी पतसंस्थेत प्रतिभा आणि त्यांच्या मुलाच्या नावावर आढळलेली चार खाती ही एकूण १३४ संशयित ‘बोगस’ खात्यांच्या जाळ्याचा भाग असल्याचा संशय बळावला आहे.

या संपूर्ण प्रकरणात ईडीने आता त्यांचा मुलगा तनमय चाकणकर यालाही समन्स बजावले आहे. प्रतिभा चाकणकर यांची ८ तासांच्या प्रदीर्घ चौकशीनंतर त्या दिवशी सुटका करण्यात आली असली, तरी तपासातील विसंगती आणि नव्याने समोर येणारी माहिती पाहता त्यांना पुन्हा एकदा चौकशीसाठी पाचारण केले जाण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे. या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जाईल, तसतसे आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे.

Follow Us
मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची..
मोठी बातमी! मराठा विद्यार्थ्यांनो खुशखबर! भरलेली शैक्षणिक फी परत मिळणार; सरकारची मोठी घोषणा
भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण... ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
Omraje Nimbalkar | भावनिकदृष्ट्या चुकीचा, पण राजकीयदृष्ट्या योग्य! ठाकरे गट सोडण्यावर ओमराजेंचा मोठा खुलासा
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक....
तुम्ही खात असलेली मिठाई अशी बनते? मैदा पायाने तुडवल्याचा धक्कादायक VIDEO व्हायरल!
रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
Prasad Lad | रोहित पवार म्हणजे छोटा संजय राऊत; म्हणत प्रसाद लाडांनी उडवली खिल्ली
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले
आमचे खासदार फुटले नाहीत; स्वतःला बाजारात विकायला उभे राहिले –राऊतांचा संतापजनक दावा
50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut On Shiv Sena Crisis | 50 कोटी घेऊन केलेलं बंड म्हणजे क्रांती नाही!; शिवसेना वर्धापन दिनी संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत
Best Bus Employee Strike | मुंबई थांबली! BEST कर्मचाऱ्यांच्या संपामुळे लाखो प्रवासी अडचणीत, बस सेवा पूर्ण ठप्प
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला
ना ठाकरे... ना शिंदे! बाळासाहेबांचा फोटो टाकून त्या खासदारांनी वाढवला मोठा सस्पेन्स
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; ठाकरे-शिंदे काय बोलणार?
वारसा विचारांचा, हीरक महोत्सव शिवसेनेचा; वर्धापन दिनी ठाकरे-शिंदे काय बोलणार?
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो
आता आणखी काय घडणार? पुन्हा शिंदे गटातील नेत्याने दिली हिंट... यह तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है