AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नीरव मोदी, मेहुल चोक्सी.. हाय प्रोफाइल केसेस हाताळणाऱ्या ईडीच्या मोठ्या अधिकाऱ्याची स्वेच्छानिवृत्ती

ईडीच्या विशेष संचालकांनी स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली आहे. सेवेची 11 वर्षे शिल्लक असतानाच त्यांनी असा का निर्णय घेतला, असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुंबईत त्यांनी अनेक हाय प्रोफाइल प्रकरणं हाताळली होती.

नीरव मोदी, मेहुल चोक्सी.. हाय प्रोफाइल केसेस हाताळणाऱ्या ईडीच्या मोठ्या अधिकाऱ्याची स्वेच्छानिवृत्ती
ED Special Director Satyavrat Kumar Image Credit source: Instagram
| Updated on: May 31, 2026 | 11:12 AM
Share

ईडीचे विशेष डायरेक्टर सत्यव्रत कुमार यांनी 11 वर्षे शिल्लक असताना स्वेच्छानिवृत्ती जाहीर केली आहे. सत्यव्रत कुमार यांनी मुंबईत असताना अनेक महत्वाची प्रकरणं हाताळली होती. नीरव मोदी, पंजाब नॅशनल बँक घोटाळा, मेहुल चोक्सी तसंच नवाब मलिक यांची अटक, अनिल देशमुख आणि संजय राऊत यांच्या प्रकरणातही ते मुंबईत जॉइंट डायरेक्टर होते. अनेक महत्वाच्या आणि हाय प्रोफाइल केसेस हाताळण्यात सत्यव्रत कुमार यांचं नाव चर्चेत होतं. सध्या ते सिलीगुरीमध्ये पोस्टिंगला होते. मात्र त्यांनी अचानक स्वेच्छानिवृत्ती का घेतली, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. सत्यव्रत कुमार हे मुंबईत जवळपास 11 वर्षे काम पाहत होते.

भारतीय महसूल सेवेच्या (सीमा शुल्क आणि अप्रत्यक्ष कर) 2004 च्या तुकडीचे अधिकारी असलेले सत्यव्रत कुमार यांची सप्टेंबर 2024 मध्ये अंमलबजावणी विभागाचे विशेष संचालक (एसडीई) म्हणून कोलकाता इथं बदली करण्यात आली होती. त्यापूर्वी ते मुंबईत कार्यरत होते. कुमार 2013 मध्ये मुंबईत सहसंचालक म्हणून ईडीमध्ये रुजू झाले आणि मुंबई युनिटचे प्रमुख असताना त्यांनी अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणं हाताळली होती. त्यांना 2022 मध्ये ऑक्टोबर 2026 पर्यंत या केंद्रीय संस्थेत काम करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली होती.

सत्यव्रत कुमार यांच्या देखरेखीखाली ईडीने तपासलेल्या काही हाय प्रोफाइल प्रकरणांमध्ये हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सीशी संबंधि 12,500 कोटी रुपयांचं पंजाब नॅशनल बँक (पीएनबी) प्रकरण, तसंच फरार व्यावसायिक विजय मल्ल्याच्या बंद पडलेल्या किंगफिशर एअरलाइन्स लिमिटेड या विमान कंपनीशी संबंधित 9200 कोटी रुपयांच्या कथित बँक कर्ज घोटाळा प्रकरणाचा समावेश होता.

याशिवाय सत्यव्रत कुमार हे ड्रग्ज तस्कर मेमन इक्बाल मोहम्मद उर्फ इक्बाल मिर्चीवरील दहशतवादी वित्तपुरवठा प्रकरण, येस बँक-दिवाण हाऊसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (DHFL) व्यवहारात आरोपी असलेल्या येस बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्यावरील PMLA प्रकरणात आणि दहा लाख डॉलर्सपेक्षा जास्त रकमेच्या महादेव ऑनलाइन बुक या अवैध ऑनलाइन सट्टेबाजी, जुगार प्रकरणाशी संबंधित एजन्सीच्या PMLA तपासातही सामील होते. 2025 मध्ये मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने सत्यव्रत कुमार यांचा कार्यकाळ कमी करत त्यांना त्यांच्या मूळ संवर्गात म्हणजेच केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळात परत पाठवलं होतं.

Follow Us
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
अपघाताच्या चौकशीबाबत सरकारकडून माहिती नाही; सुप्रिया सुळे यांचा संताप
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ
लक्ष्मण हाके यांचा सरकारला इशारा; ओबीसी काय करेल, हे आम्ही दाखवून देऊ...
शिवसेना पक्षचिन्हावर उद्या सुनावणी; एकनाथ शिंदे दिल्लीत दाखल
शिवसेना चिन्हाच्या सुनावणीपूर्वी एकनाथ शिंदे दिल्लीत; म्हणाले, धनुष्यबाण गोठवणे दुर्दैवी
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
अनावश्यक सोने खरेदी आणि परदेशी प्रवास टाळा, पंतप्रधान मोदींचे आवाहन
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री
नवी मुंबईत एक्सपायरी डेट बदलून खाद्यपदार्थांची विक्री; एफडीए आणि गुन्हे शाखेची मोठी कारवाई
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट
महाराष्ट्रात पावसाचा ब्रेक! नगरमध्ये 80%, बीडमध्ये 86% तूट; सप्टेंबरमध्येही कमी पावसाचा अंदाज
हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते?
Krushnaraj Mahadik On MNS | हल्ला केला, काचेच्या बाटल्या फेकल्या, चेनही खेचल्या! पोलीस कुठे होते? म्हणत कृष्णराज महाडिक आक्रमक
मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी...
Manoj Jarange | मनोज जरांगेंच्या भेटीसाठी सरकारचं शिष्टमंडळ सज्ज; तोडग्यासाठी हालचालींना वेग!
आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम
Praveen Swami | आम्ही 100% उद्धव ठाकरेंसोबतच!; आमदार फुटीच्या चर्चेला पूर्णविराम, प्रवीण स्वामी थेट म्हणाले...
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी..
तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाला सरकारचा ब्रेक; सुट्टे तेल विक्रीसाठी व्यापाऱ्यांना आणखी 1 वर्षाची दिली मुभा