एका मुलीने यावं आणि माझा बलात्कार झाला सांगावं ना? जर कुणाची… नाथाभाऊ काय काय म्हणाले?
एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर यांच्यावर अत्यंत गंभीर आरोप करण्यात आली. सध्या खेवलकर हे न्यायालयीन कोठडीत आहेत. रूपाली चाकणकर यांनी काही मोठे दावे खेवलकरबद्दल केली आहेत. त्यावर स्पष्ट बोलताना खडसे हे दिसले आहेत.

पुण्यातील खराडी भागात रेव्ह पार्टी सुरू असताना पुणे पोलिसांनी छापेमारी केली आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरला अटक केली. या अटकेनंतर खडसे यांनी आपली बाजू मांडली. प्रांजल खेवलकर प्रकरणात सतत आरोप होत असताना आता उघडपणे बोलताना एकनाथ खडसे हे दिसले आहेत. एकनाथ खडसे यांनी मोठे आरोप करत काही प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केली आहेत.
एकनाथ खडसे यांनी साधला जोरदार निशाना
एकनाथ खडसे म्हणाले की, रूपालीताई चाकणकर सतत आरोप करत आहेत, पण त्याला काहीतरी आधार पाहिजे ना…? जर मुलींवर जबरदस्ती लैगिंक अत्याचार, छळ झाला किंवा बलात्कार झाला, फोटो काढले तर एखाद्या मुलीने तरी पुढे येऊन तक्रार करायला पाहिजे ना…संमतीने झालं असेल तर तुम्ही त्यामध्ये काय सांगू शकता? कोणी एकही मुलगी पुढे आली नसल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले.
जावयाबद्दल अगदी स्पष्ट बोलताना दिसले खडसे
संमतीने झाले असले तरीही मी त्याचे समर्थन करणार नसल्याचे एकनाथ खडसे यांनी म्हटले. मागील काही दिवसांपासून एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरवर गंभीर आरोप केली जात आहेत. खेवलकरच्या मोबाईलमध्ये काय काय मिळाले, याचा पाढाच थेट राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी वाचून दाखवला आहे. अनेक अश्लील फोटो आणि व्हिडीओ खेवलकरच्या मोबाईलमध्ये आढळल्याचा दावा त्यांनी केला.
नाथाभाऊंना बदमान करण्यासाठी फक्त हे षडयंत्र
रूपाची चाकणकर यांनी केलेल्या धक्कादायक खुलासांनंतर रोहिणी खडसे या काय बोलणार याकडे सर्वांच्या नजरा होत्या. मात्र, या गोष्टींवर भाष्य करणे रोहिणी खडसेंची टाळल्याचे दिसतंय. मात्र, एकनाथ खडसे यांनी या आरोपांवर आपली भूमिका अगदी स्पष्ट केली आहे. एकनाथ खडसेंनी स्पष्ट म्हटले की, नाथाभाऊंनी जावयाला म्हटले नाही की, तू असे बाहेर जाऊन कर. उगाच नाथाभाऊंना बदनाम केले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. एकनाथ खडसे यांच्याविरोधात जोरदार आंदोलन भाजपाकडून करण्यात आलंय.
