एकनाथ खडसेंचे पोलिसांवर गंभीर आरोप, पुणे पोलिस बाहुल्यांप्रमाणे काम करतात, माझ्या जावयावर…
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी करताना पुणे पोलिसांनी रंगेहात पकडले. आता एकनाथ खडसेनी थेट पोलिसांवर गंभीर आरोप केली आहेत.

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना रेव्ह पार्टी करताना पुणे पोलिसांनी रंगेहात पकडले. यावरून आता जोरदार राजकारण रंगताना दिसत आहे. एकनाथ खडसे यांनी पत्रकार परिषद करत मोठे खुलासे केले आहेत. एकनाथ खडसे म्हणाले की, अमली पदार्थ एका मुलीच्या पर्समध्ये सापडला आहे आणि तो कसा आला हे तिला पण माहिती नाही. तिला आरोपी नंबर एक बनवले पाहिजे होते आणि इतरांना साक्षीदार पण तसे झाले नाही. प्रांजल खेवलकरांकडे कोणताही अमली पदार्थ सापडला नाही.
माझ्या जावयाने मला सांगितले की, माझी पाळत ठेवली जात होती. सिव्हिल कपड्यांमध्ये पोलिस पाळत ठेवत असल्याचाही गंभीर आरोप खडसे यांनी म्हटले. कशापद्धतीनेही खडसे बदनाम झाले पाहिजे, यासाठी प्लॅन केला गेला. पोलिसांनी पाळत ठेवत असल्याचा व्हिडीओ आहे. पोलिसांबद्दल माझ्या मनात काही प्रश्न आहेत. माझ्या जावयाचा मोबाईल तुम्ही जप्त केला. चार वर्षांपूर्वींचा लॅपटॉप जप्त केला.
पोलिस बाहुल्यांसारखे काम करून राहिलेले आहेत. संशयांना अनेक ठिकाणी जागा आहे. जिथे शेकडो माणसे असतात ती रेव्ह पार्टी असते. विनाकारण खडसेंना बदनाम करण्यासाठी हे सुरू आहे. यांना कसे बदनाम करायचे आणि यांचे तोंड कसे बंद करायचे, यासाठी हे सुरू आहे. पोलिसांनी फोटो आणि व्हिडीओ काढले आणि लगेचच मिडियात आले.
जावयाच्या मोबाईलमधील खासगी फोटो व्हायरल करण्याचा अधिकार पोलिसांनी कोणी दिला, असाही मोठा प्रश्न यावेळी एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. काहीही झाले तरीही या प्रकरणातील सत्य बाहेर येईल. नाचगाण्याचा कार्यक्रम नाही, लेझर नाही मग ही रेव्ह पार्टी कशी? वैद्यकीय अहवाल माध्यमांकडे कसा आला?. मी आज कोणत्याही मंत्र्यावर आरोप करत नाही, माझा पोलिसांवर संशय आहे.
प्रांजल खेवलकर याच्याकडे कोणताही अमली पदार्थ सापडला नाहीये. व्हिडीओमध्ये तो बाजूला उभा स्पष्टपणे दिसत आहे. काहीही झालं तरीही या प्रकरणातील सत्य बाहेर येईल. हे सर्व ठरवून केल्याचे म्हणण्यास वाव आहे. रेव्ह पार्टी म्हणून बदनाम करण्याचा का प्रयत्न केला जात आहे?, असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.
