AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानाची ड्रोनच्या माध्यमातून रेकी, खडसेंची पोलिसात धाव

जळगावमधून मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानाची ड्रोनच्या माध्यमातून रेकी झाल्याचा संशय आहे. याबाबत खुद्द एकनाथ खडसे यांनीच संशय व्यक्त केला आहे.

एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानाची ड्रोनच्या माध्यमातून रेकी, खडसेंची पोलिसात धाव
eknath khadseImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 03, 2026 | 7:17 PM
Share

जळगावमधून मोठी बातमी समोर येत आहे. एकनाथ खडसे यांच्या निवासस्थानाची ड्रोनच्या माध्यमातून रेकी झाल्याचा संशय आहे. याबाबत खुद्द एकनाथ खडसे यांनीच संशय व्यक्त केला आहे. या संदर्भात आता एकनाथ खडसे यांनी या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी करावी अशी मागणी केली आहे. दरम्यान यापूर्वी देखील आपला कॉल रेकॉर्ड होत असल्याचा संशय एकनाथ खडसे यांनी व्यक्त केला होता. माझ्या विरूद्ध फार मोठं षडयंत्र रचलं जात आहे, असा आरोपही यावेळी एकनाथ खडसे यांच्याकडून करण्यात आला आहे.

नेमकं काय म्हणाले खडसे?

28 सप्टेंबरला रात्री आठ ते आठ वाजून पंधरा मिनिट या कालावधीमध्ये ड्रोनने माझ्या फॉर्म हाऊसची रेकी करण्यात आली. या रेकी करणाऱ्या ड्रोनचं चित्रिकरण देखील करण्यात आलं आहे. आमच्या वाचमनने या ड्रोनचं चित्रिकरण केलं आहे. एकंदरीत संशयास्पद स्थितीमध्ये एक ड्रोन आपल्या फॉर्म हाऊस परसिरात फिरत होतं. या संदर्भात मी पोलीस ठाण्यात तक्रार केलेली आहे. त्यानंतर पोलिसांनी मला कळवलं आहे, की या प्रकरणात ते लक्ष घालत आहेत. पुढील कारवाई केली जात आहे, परंतु प्रत्यक्षात हे प्रकरण स्थानिक पोलीसांच्या कक्षेच्या बाहेर आहे. त्यामुळे आता या प्रकरणाची विशेष चौकशी झाली पाहिजे.

कारण एवढ्या वेळ एखाद्या ठिकाणी ड्रोन फिरणं हे सगळं संशयास्पद वाटतं. यापूर्वी देखील रश्मी शुल्का यांनी माझा फोन 65 दिवस टॅप केला होता. माझी परवानगी नसताना देखील माझ्या फोनमधील सर्व संभाषण हे रेकॉर्ड करण्यात आलं होतं. त्या संदर्भात देखील मी तक्रार दाखल केली होती. मात्र त्यानंतर चौकशीमध्ये नेमकं काय घडलं, हे मला अजूनपर्यंत तरी कळालेलं नाहीये. हा मला छळण्याचा प्रकार असू शकतो, परंतु या मागे जे काही असेल ते पोलिसांनी शोधून काढावं अशी माजी मागणी आहे, असं यावेळी खडसे यांनी म्हटलं आहे. दरम्यान यापूर्वी खडसे यांच्या घरी एकदा  चोरी देखील झाली होती.

Follow Us
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण;
महायुतीत खलबतं? पुणे शिक्षक मतदारसंघाच्या उमेदवारीवरून राजकारण; शिंदेंच्या नेत्यांना तातडीच्या सूचना
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे
महायुतीच्या जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक मतदारसंघ भाजपकडे, मंगेश चिवटेंना धक्का!
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालयातच...
चंद्रपुरात दुष्काळामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना नो लीव्ह, मुख्यालय सोडण्यास मनाई
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल
ठाकरे बंधूंच्या गर्जना मोर्चासाठी मनसेची मोठी तयारी; 150 जणांची स्पेशल टीम तैनात?
केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी
Video : केंद्राकडे खर्गे यांची 3,705 कोटी रुपयांच्या मदतीची मागणी... पंतप्रधान मोदी, अमित शहा यांना 11 पानी पत्र
बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; बावनकुळेंनी जाणून घेतल्या समस्या
Chandrashekhar Bawankule : बांधावर बसले, शेतकऱ्यांसोबत जेवले; चंद्रशेखर बावनकुळेंनी जाणून घेतल्या दुष्काळग्रस्तांच्या समस्या
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणी प्रत्युत्तर
शंभूराज देसाईंचा हर्षवर्धन सपकाळच्या ड्रग्ज प्रकरणावरील आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर
नायरा एनर्जीचा ग्राहकांना झटका; पेट्रोल, डिझेल एवढ्या रुपयांनी महागलं
Nayara Energy : नायरा एनर्जीचा ग्राहकांना मोठा झटका; पेट्रोल, डिझेल तब्बल एवढ्या रुपयांनी महागलं
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
Video : शरद पवार, शेकापचा ठाकरे बंधूंच्या मोर्चाला जाहीर पाठिंबा
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...
दिशा सालियान प्रकरणी सुषमा अंधारेंचं अखेर मोठं विधान; थेट म्हणाल्या...