AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रायगडावर काय घडले? ऐनवेळी शिंदेंना संधी पण अजित पवार यांना डावलले…फडणवीस यांच्या…

Eknath Shinde and Ajit Pawar: अमित शाह यांची कार्यक्रम पत्रिका जाहीर झाली होती. त्यानुसार राज्य सरकारमधून रायगडावर फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण होणार होते. परंतु ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संधी दिली. परंतु अजित पवार यांना संधी दिली गेली. त्याची चर्चा सुरू झाली आहे.

रायगडावर काय घडले? ऐनवेळी शिंदेंना संधी पण अजित पवार यांना डावलले...फडणवीस यांच्या...
eknath shinde ajit pawarImage Credit source: TV 9 Marathi
| Updated on: Apr 13, 2025 | 7:55 AM
Share

Eknath Shinde and Ajit Pawar: रायगड किल्ल्यावर श्री छत्रपती शिवाजीमहाराजांची ३४५वी पुण्यतिथीनिमित्त अभिवादन कार्यक्रम झाला. शिवपुण्यतिथीनिमित्ताने झालेल्या या कार्यक्रमास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आले होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार उपस्थित होते. अमित शाह यांच्या बरोबर पुण्यावरुन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री रायगडावर पोहचले. किल्ले रायगडावर छत्रपतींना अभिवादन करण्यासाठी शिवप्रेमी आले होते. यावेळी एकनाथ शिंदे यांना अचानक भाषणाची संधी मिळाली पण अजित पवार यांचे भाषण झालेच नाही.

नेमके काय घडले?

आयोजकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव भाषणासाठी पुकारले. परंतु देवेंद्र फडणवीस यांनी शिंदे साहेब सांगत एकनाथ शिंदे यांना भाषण करण्याची संधी दिली. ऐनवेळी एकनाथ शिंदे यांनी भाषण केले. परंतु अजित पवार यांचे भाषण झाले नाही. या सोहळ्यात मोजकीच भाषणे होती. त्यात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नावे नव्हती. परंतु एकनाथ शिंदे यांना ऐनवेळी संधी मिळाल्याने त्याची राजकीय चर्चा सुरु झाली आहे. कार्यक्रमात उदयनराजे भोसले यांचेही भाषण झाले.

अमित शाह यांची कार्यक्रम पत्रिका जाहीर झाली होती. त्यानुसार राज्य सरकारमधून रायगडावर फक्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण होणार होते. परंतु ऐनवेळी देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संधी दिली. परंतु अजित पवार यांना संधी दिली गेली. त्याची चर्चा सुरू झाली आहे.

एकनाथ शिंदे काय म्हणाले?

एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात अमित शाह यांचे कौतूक केले. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी ३०७ कलम हटवले. देशाच्या सीमेवर उपद्रव करणाऱ्यांना वठणीवर आले. आता ते सर्व बिळात बसले आहेत. देशात हिंसाचार फैलावणारे जे लोक होते, मग त्यात नक्षलवादी असो की अतिरेकी त्यांचा बंदोबस्त गृहमंत्री करत आहेत. तहव्वूर राणा यालाही भारतात आणले. त्याला मुंबईसुद्धा आणले जाईल. त्याला फाशी देण्यात येईल, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.