AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘डूब गये अहंकार मे सारे, अब तो सुधर जावो प्यारे…’, एकनाथ शिंदेंची यवतमाळमध्ये जोरदार फटकेबाजी

यवतमाळमध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी जोरदार फटकेबाजी केल्याचं पाहायला मिळालं, त्यांनी पुन्हा एकदा नाव न घेता उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.

'डूब गये अहंकार मे सारे, अब तो सुधर जावो प्यारे...', एकनाथ शिंदेंची यवतमाळमध्ये जोरदार फटकेबाजी
| Updated on: Apr 03, 2025 | 9:38 PM
Share

यवतमाळमध्ये बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना खोचक टोला लगावला आहे. हे तुमचं सरकार आहे, आमचं सरकार म्हणजे नो रिजन ऑन द स्पोट डिसिजन आहे. प्रत्येक कामाला रिजन देणाऱ्यांचा सिझन आता संपला आहे. लोकसभा निवडणुकीत फेक नरेटिव्ह केला. विधानसभेत आता आपलंच सरकार येईल म्हणून फाईव्ह स्टार हॉटेलचं बुकिंग केलं. याला जेल मध्ये टाकू हे करू बर्फावर झोपून मारू असे म्हणत होते, मात्र त्यांचे हॉटेल बुकिंग लाडक्या बहिणींनी रद्द केले. डूब गये अहंकार मे सारे, अब तो सुधार जावो प्यारे, असा खोचक टोला यावेळी एकनाथ शिंदे यांनी नाव न घेता लगावला आहे.

दरम्यान पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत देखील मोठं वक्तव्य केलं आहे. लाडक्या बहिणींना पायावर उभे करायचे आहे, लखपती बनवायचे आहे.  आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, पण आम्हाला सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस आणायचे आहेत. आज शंभर दिवस झाले, सरकार वेगानं पळत आहे. माझ्या लाडक्या बहिणींसाठी दीड हजार कुटुंबाला आधार झाले आहेत. सर्व अर्थव्यवस्थेमध्ये लाडकी बहीण एक नंबरवर आहे. कर्ज घेतात एकही रुपया बुडवीत नाहीत, असं एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे.

मी दिलेलं या हाताचे या हाताला कळत नाही. मला तुकाराम महाराज पुरस्कार प्रदान केला. तुमचा आशीर्वाद व शुभेच्छांमुळे हे सर्व शक्य झालं. तुम्ही आहात म्हणून सगळे पुरस्कार आहेत. सर्वसामान्य लोकांसाठी मी एक कार्यकर्ता आहे. मी रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत सर्वसामान्य लोकांची सेवा करेल, सत्ता येते, जाते, पद येते जाते. पण मला लाडका भाऊ ही ओळख मिळाली,  हे माझ्यासाठी सगळ्यात मोठं पद आणि मान आहे, असं एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटलं आहे.

Follow Us
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
भाऊबीजेला उद्धव आणि राज ठाकरे एकत्र, कौटुंबिक फोटोंनी लक्ष वेधलं!
पंकजा मुंडेंच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
Dhananjay Munde : पंकजा मुंडे यांच्या रामटेक बंगल्यावर धनंजय मुंडेंची भाऊबीज; पाहा खास क्षण
ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू एकत्र
Thackeray Brothers : ठाकरे बंधूंचा कौटुंबिक स्नेह! भाऊबीजेच्या निमित्ताने ठाकरे बंधू पुन्हा एकत्र
दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
Chandrashekhar Bawankule : दोन्ही NCP विलिनीकरणाबाबत राऊतांचं मोठं वक्तव्य; बावनकुळे काय म्हणाले?
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्र...
अजितदादांचा अपघात की घातपात? उमेश पाटलांच्या विधानाने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ!
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले
रोहित पवारांकडून सोनिया गांधींच्या आत्मचरित्राचं भरभरून कौतुक; म्हणाले, जीवनप्रवास प्रेरणादायी!
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी...
राजकारणापलीकडचं बहीण-भावाचं नातं! प्रसाद लाड आणि चित्रा वाघ यांनी साजरी केली भाऊबीज
विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय...
Sunetra Pawar : विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांची एका वाक्यात प्रतिक्रिया; नेमकं काय म्हणाल्या?
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे...
अमित शाह रविवारी पुणे दौऱ्यावर; तीन कार्यक्रमांसह राजकीय बैठकांकडे सर्वांचे लक्ष!
नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभा
Nagpur : नागपुरात दिवाळीत आगीच्या 40 हून अधिक घटना; आता 106 फायर हायड्रंट्स उभारणार!