Eknath Shinde : विरोधकांना चर्चेऐवजी संसदेबाहेर फक्त स्टंटबाजी करण्यात रस, एकनाथ शिंदेंचे टीकास्त्र

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधत म्हटले की, विरोधकांना संसदेत चर्चा करण्याऐवजी फक्त बाहेर स्टंटबाजी करण्यात रस आहे. अमित शाह यांच्या राजीनामा मागणीमागे खरी तळमळ आहे की केवळ नाटक, असा सवाल त्यांनी विचारला. सरकार चर्चेसाठी तयार असून मोदी सरकारचे काम जनतेला माहीत आहे, असेही शिंदे यांनी स्पष्ट केले.

Eknath Shinde : विरोधकांना चर्चेऐवजी संसदेबाहेर फक्त स्टंटबाजी करण्यात रस, एकनाथ शिंदेंचे टीकास्त्र
एकनाथ शिंदेंचे विरोधकांवर टीकास्त्र
| Updated on: Aug 13, 2026 | 8:13 AM

विरोधकांचं फक्त राजकारण सुरू आहे, त्यांना संसदेत चर्चा करायची नाहीये, त्यांना फक्त बाहेर स्टंटबाजी करण्यात रस आहे. विरोधकांना त्यांच्या प्रश्नाचं खरंच उत्तर हवंय की त्यांना फक्त राजीनामा मागण्याचं नाटक करायचं आहे, असा सवाल विचारत, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर निशाणा साधला.  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची एकनाथ शिंदे यांनी ‘वर्षा’वर भेट घेतली. त्यांच्यात सुमारे 20 मिनिटं विविध विषयांवर चर्चा झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी विरोधकांवर टीकास्त्र डागलं. जंतरमंतरवरील आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर, आंदोलकांवर पॅलेट गनने गोळीबार करण्यात आल्याचा आरोप असून याच मुद्यावरून संसदेतील वातावरण तापलेलं आहे. विरोधक याच मुद्यावरून आक्रमक झाले असून त्यांनी गृहमंत्री अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

जंतरमंतरवरील गोळीबाराबद्दल सरकार संसदेत भूमिका मांडायला तयार आहे, गृहमंत्री अमित शहा त्यावर बोलणार आहेत. मात्र त्यास विरोध दर्शवण्यात आल्याचं दिसून आलं. आम्हाला शाह यांचं भाषण ऐकण्यात काहीच स्वारस्य नाही, त्यांचं लेक्चर ऐकायचं नाहीये, असं म्हणत अमित शहांनी राजीनामा द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केली होती. याच पार्श्वभूमीवर बोलताना एकनाथ शिंदे यांनी हा टोला लगावला. विरोधकांना फक्त राजकारण करायचं आहे, असं म्हणत शिंदे यांनी खडेबोल सुनावले.

काय म्हणाले एकनाथ शिंदे ?

जनतेला सर्वांच काम माहीत आहे. पंतप्रधान मोदींचं काम देशाने पाहिलं, अमित शाह यांचंकामही जनतेला माहीत आहे. त्यामुळेच मी फक्त एवढंच म्हणेन की देशातील140 कोटींची जनता मोदीजींसोबत आहे. जे युवक आहेत, तरूण पिढी आहे, ते देशांचं भविष्य आहे. मोदीजींनी पटापाट निर्णय घेतले, कठोर कायद्याची तरतूद केली. 10 वर्षांची शिक्षा, 10 कोटींचा दंड, फास्ट ट्रॅकमध्ये केस अशा अनेक तरतुदी करण्यात आल्या ना. अजून काय करायला पाहिजे ? असा सवाल शिंदे यांनी विचारला. त्यामुळेच राजकारण करण्याचं विरोधकांचं दुकान बंद झालं, म्हणूनच विरोधकांनाा संसदेतील चर्चेत रस नाही, तर त्यांना बाहेर स्टंटबाजी करण्यात रस आहे, असा घणाघाती हल्ला त्यांनी चढवला.

त्यांना राजीनाम्याच्या मागणीशिवाय दुसरं काय येतं ? आधी त्यांनी धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा मागितला, आंदोलकांची ही मागणी मान्य करून शिक्षणमंत्री प्रधानांनी त्यांचा राजीनामा पंतप्रधान मोदींकडे सोपवला. पण विरोधकांना त्यांच्या प्रश्नाचं खरंच उत्तर हवंय की त्यांना फक्त राजीनामा मागण्याचं नाटक करायचं आहे, असा सवालही शिंदे यांनी विचारला.  ते ( राहुल गांधी) नेहमी परदेशात जाऊन देशांची, पंतप्रधान मोदींची बदनामी करतात. विरोधी पक्षनेत्याने अत्यंत गंभीरपणे आपली जबाबदारी निभावली पाहिजे, असं पार्ट-टाईम राजकारण करून चालत नाहीत, असा टोला शिंदे यांनी लगावला.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us