AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रुग्णालयातून एकनाथ शिंदे यांचे मोठे आवाहन, थेट घेतला निर्णय, पावसाच्या परिस्थितीमध्ये..

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती खालावली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काल त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, प्रकृती खराब असली तरीही एकनाथ शिंदे यांच्याकडून मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर अधिकाऱ्यांना सूचना दिल्या जात आहेत.

रुग्णालयातून एकनाथ शिंदे यांचे मोठे आवाहन, थेट घेतला निर्णय, पावसाच्या परिस्थितीमध्ये..
Eknath Shinde
| Updated on: Jul 04, 2026 | 3:58 PM
Share

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून एका मागून एक मोठे धक्के उद्धव ठाकरे यांना दिली जात आहेत. ठाकरे गटाचे तब्बल 6 खासदार एकनाथ शिंदे यांनी फोडली. या खासदारांनी लोकसभा अध्यक्षांना स्वतंत्र घट स्थापनेबद्दलचे पत्रही दिले. संजय राऊत, अरविंद सावंत आणि अनिल देसाई यांनी देखील लोकसभा अध्यक्षांची भेट घेत या खासदारांना व्हिप जारी केले. मात्र, या खासदारांनी व्हिप जारी करूनही पक्षाच्या बैठकीला अनुपस्थितीत राहण्याचा निर्णय घेतला. यानंतर 6 खासदार थेट एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झाले. यापैकी दोन जणांना थेट केंद्रात मंत्रिपद मिळणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार केला जाणार आहे. त्यामध्येच शिवसेना शिंदे गटाला तब्बल तीन मंत्रीपदे मिळणार आहेत. विधान परिषदेच्या उपसभापतीपदासाठी थेट ठाकरे गटाचे नेते सचिन आहिर यांनी महायुतीकडून अर्ज दाखल केला आणि एकच खळबळ उडाली. 6 खासदारांनंतर सचिन आहिर यांचा शिंदे गटातील प्रवेश उद्धव ठाकरेंसाठी दुसरा मोठा धक्का होता.

आता ठाकरे गटातील अनेक नेते पक्षाला सोडचिठ्ठी देताना दिसत आहेत. काल अचानक एकनाथ शिंदे यांनी प्रकृती खराब झाली. ठाण्यात मोठे पक्षप्रवेश होते. मात्र, प्रकृती खराब झाल्याने तिथे एकनाथ शिंदे पोहोचू शकले नाही. शुभांगी पाटील यांचा शिवसेना शिंदे गटातील प्रवेश श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत झाला. प्रकृती बरी नसल्याने आणि अस्वस्थ वाटत असल्याने एकनाथ शिंदे यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रुग्णालयात दाखल असले तरीही ते आपल्या कर्तव्य पार पाडत आहेत. एकनाथ शिंदे थेट रुग्णालयातून पावसाच्या परिस्थितीचा आढावा घेत आहेत. एकनाथ शिंदे यांनी अधिकाऱ्यांकडून पावसाच्या अडचणीबाबतही माहिती मागवली आहे. नागरिकांना तातडीने मदतकार्य राबवण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

रुग्णालयातून राज्यातील अतिमुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. प्रशासकीय अधिकारी तसेच शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून मदतकार्य करण्याचे आवाहन एकनाथ शिंदे यांनी केले. नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवून आवश्यक ती सर्व मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी संबंधित यंत्रणांना देखील दिल्या आहेत.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ