Pune Crime : कुत्रा मागे लागल्याने घाबरला, इमारतीवरून खाली पडला, इलेक्ट्रिशियनचा दुर्दैवी मृत्यू
का सोसाटीमध्ये काम करण्यासाठी आलेल्या एका इलेक्ट्रिशियनला कुत्र्यामुळे जीव गमवावा लागला. सोसायटीत काम करत असताना कुत्रा मागे लागला आणि ते वेडेवाकडे पळत असतानाच तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळले. त्यानंतर.

आयुष्य खूप क्षणभंगुर आहे. कधी काय होईल सांगता येत नाही. आज हसता खेळता असलेला माणूस उद्या तसा असेलच हे सांगता येत नाही. मृत्यू कधी येऊन कोणाला कुठे गाठेल याची काहीच शाश्वती नाही. असंच काहीस पुण्यातील (Pune News) कसबा पेठेत घडलं. तिथे एका सोसाटीमध्ये काम करण्यासाठी आलेल्या एका इलेक्ट्रिशियनला कुत्र्यामुळे जीव गमवावा लागला. सोसायटीत काम करत असताना कुत्रा मागे लागला आणि ते वेडेवाकडे पळत असतानाच तोल जाऊन तिसऱ्या मजल्यावरून खाली कोसळले. त्यात गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र अखेर तिथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. याप्रकरणी फरासखाना पोलीस ठाण्यात कुत्रा मालक सिद्धार्थ कांबळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या घटनेमुळे मोठी खळबळ माजली आहे.
नेमकं झालं तरी काय ?
मिळालेल्या माहितीनुसार, रमेश गायकवाड (वय 45) असे मृत इसमाचे नाव असून ते इलेक्ट्रिशियन म्हणून काम करत होते. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 1ऑक्टोबर रोजी रमेश गायकवाड हे त्यांचा मित्र गजानन घोडे यांच्यासोबत काम करण्यासाठी कसबा पेठेकतील एका सोसायटीत आले होते. त्यांचं तिसऱ्या मजल्यावर काम सुरूच होतं, तेवढ्यात चौथ्या मजल्यावर राहणाऱ्या सिद्धार्थ कांबळे यांच्या घरातील त्यांचा जर्न शेफर्ड कुत्रा हाँ गायकवाड यांच्या मागे लागला. त्यामुळे ते खूप घाबरले. कुत्र्यापासून वाचण्यासाठी ते इमारतीतील जिन्यावरून पळत होते, मात्र पळता पळता अचानक त्यांचा तोल गेला आणि ते त्याच इमारतीच्या डक्टमध्ये धाडकन कोसळले.
रुग्णालयात झाला मृत्यू
खाली पडल्याने ते गंभीर जखमी झाले. इमारतीमधील इतर रहिवाशांनी मदतीसाठी धाव घेत त्यांना तत्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथे त्यांच्यावर अनेक दिवस उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यानच रुग्णालयात त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला. कुत्रा पाळण्याबाबत योग्य ती खबरदारी घेतली नाही म्हणून या प्रकरणी सिद्धार्थ कांबळे याच्या विरोधात निष्काळजीपणाचा गुन्हा फरासखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू आहे.
