AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डॉ. शीतल आमटे आत्महत्या : मोबाईल, लॅपटॉपला Eye पासवर्ड; चौकशी करायची कशी?

डॉ. शीतल यांनी त्यांचा मोबाईल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचे पासवर्ड बलल्याने तपास करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. (eye password shital amte)

डॉ. शीतल आमटे आत्महत्या : मोबाईल, लॅपटॉपला Eye पासवर्ड; चौकशी करायची कशी?
| Updated on: Dec 03, 2020 | 4:30 PM
Share

चंद्रपूर : महारोगी सेवा प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी सुरु आहे. पोलिसांनी तीन दिवसांत डॉ. शीतल आमटे-करजगी यांच्या संपर्कातील 90 टक्के लोकांची चौकशी पूर्ण केली आहे. मात्र, डॉ. शीतल यांनी त्यांचा मोबाईल, लॅपटॉप आणि इतर इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचे पासवर्ड बदलल्याने तपास करण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे. विशेष म्हणजे, यातील काही गॅझेट्सना डॉ. शीतल यांनी त्यांच्या डोळ्यांचा पासवर्ड (eye password) ठेवल्याने हे गॅझेट्स चालू करण्यात अडचणी येत आहेत. परिणामी नागपूरच्या फॉरेन्सिक पथकाने डॉ. शीतल यांचे सर्व गॅझेट्स मुंबईतील आयटी (IT) तज्ज्ञांकडे पाठवले आहेत. (eye password to the electronic gadgets of shital amte)

मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. शीतल आमटे यांच्या मृत्यूप्रकरणी त्याच्या संपर्कातील 90 टक्के लोकांची चौकशी पूर्ण करण्यात आली आहे. यामध्ये त्यांचे नोकर, घरगुती मदतनीस इत्यादींची चौकशी पूर्ण करण्यात आली आहे. तसेच, डॉ. शीतल यांनी विषारी इंजेक्शन घेऊन आत्महत्या केल्याने, पोलिसांना त्याबाबतच्या रासायनिक अहवालाची प्रतीक्षा आहे. या अहवालामुळे त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समजण्यास मदत होईल.

गॅझेट्सना आय पासवर्ड, पतीलासुद्धा कल्पना नाही

दरम्यान, डॉ. शीतल आमटे यांचा लॅपटॉप, मोबाईल, टॅब तसेच इतर गॅझेट्स पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत. डॉ. शीतल यांनी त्यांच्या या गॅझेट्सचे पासवर्ड नुकतेच बदलल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे या हे बदललेल्या पासवर्डबद्दल त्यांचे पती गौतम करजगी यांनादेखील कल्पना नाही. यातील काही गॅझेट्सना सॉफ्टवेअर लॉक आहे. तर काही गॅझेट्सना त्यांनी स्वत:च्या डोळ्यांचे पासवर्ड ठेवले होते. त्यामुळे ताब्यात घेतलेला टॅब, लॅपटॉप, आणि मोबाईल उघडण्यास अडचणी निर्माण होत आहेत. परिणामी तपास करण्यास, त्यांच्या मृत्यूमागचे नेमके कारण शोधण्यास अडचणी येत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हे सर्व गॅझेट्स नागपरूच्या फॅरेन्सिक पथकाने मुंबईतील आयटी (IT) तज्ज्ञांकडे पाठवले आहेत. या गॅझेट्सच्या साहाय्याने डॉ. शीतल यांच्या आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यास मादत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आत्महत्येसाठी वापरलेले विष अत्यंत घातक

मिळालेल्या माहितीनुसार शीतल साठे यांनी आत्महत्येसाठी वापरलेली काही इंजेक्शन्स त्यांच्या कक्षात आढळून आली आहेत. तसेच, या ठिकाणाहून उलटी झालेले कापडदेखील पोलिसांनी जप्त केले आहे. डॉ. शीतल यांनी आत्महत्येसाठी नेमके कोणते विषारी रसायन वापरले याचा तपास पोलीस करत आहेत. याबाबतचा रासायनिक अहवाल आल्यानंतरच हे स्पष्ट होणार आहे. दरम्यान, डॉ. शीतल यांनी आत्महत्यासाठी वापरलेले विष हे अत्यंत घातक आणि उच्च गुणवत्तेचे असल्याची सूत्रांची माहिती आहे. हे विष त्यांनी कोठून मिळविले याचा तपास करण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे. (eye password to the electronic gadgets of shital amte)

लवकरच आमटे कुटुंबीयांची चौकशी?

दरम्यान, तपासात प्रगती होत नसल्याने पोलीस आता आमटे कुटुंबियांची चौकशी करण्याच्या बेतात आहेत. आमटे कुटुंबीयांच्या तपासातून काही धागा मिळतो का?, याची चाचपणी पोलीस करणार आहेत. (eye password to the electronic gadgets of shital amte)

संंबंधित बातम्या :

सख्ख्या मुलीला दूर का लोटले? डॉ. शीतल आमटेंच्या आत्महत्येनंतर सासू-सासऱ्यांचे आमटे कुटुंबाला प्रश्न

सख्ख्या मुलीला दूर का लोटले? डॉ. शीतल आमटेंच्या आत्महत्येनंतर सासू-सासऱ्यांचे आमटे कुटुंबाला प्रश्न

हे सगळं काही धक्कादायक, अनपेक्षित; डॉ. शीतल आमटेंच्या आत्महत्येनंतर आमटे कुटुंबाची प्रतिक्रिया

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.