AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांद्याचे बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी…

कांद्याची आवक घटली तरीही लासलगावात बाजारभावात घसरण झाली आहे. लासलगावात 400 रुपये, पिंपळगाव बसवंत 800 रुपये तर येवला बाजार समितीत कांद्याच्या दरात 605 रुपयांची घसरण झाली आहे.

कांद्याचे बाजारभाव घसरल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी...
Lasalgaon
| Edited By: | Updated on: Sep 21, 2026 | 6:52 PM
Share

कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक चित्र आहे. लासलगाव, पिंपळगाव, बसवंत, येवला बाजार समितीत कांद्याच्या दरात घसरण झाली आहे. दक्षिणेकडे नवीन लाल कांद्याची तर मध्य प्रदेश मध्ये जुन्या उन्हाळ कांद्याची आवक वाढल्याने नाशिकच्या कांद्याची मागणी घटल्याने कांद्याच्या बाजारभावावर परिणाम होत आहेत. पिंपळगाव बसवंतमध्ये कमाल दर 800 रुपयांनी घसरला आहे. पिंपळगाव बसवंतचा कांदा दर 6500 वरून 5700 रुपयांवर गेला आहे. लासलगावमध्ये सरासरी दरात 400 रुपयांची घट, लासलगावचा सरासरी कांदा दर 4500 वरून 4100 रुपयांवर गेला आहे. येवल्यात कांद्याच्या दरात 605 रुपयांची घसरण झाली आहे. येवल्यात कांदा दर 5251 वरून 4646 रुपयांवर गेला आहे.

कांद्याला चांगला बाजारभाव मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण होते. मात्र, अचानक दक्षिणेकडील नवीन लाल कांदा आणि मध्यप्रदेशातील जुन्या उन्हाळी कांद्याची आवक वाढल्याने नाशिकच्या कांद्याची मागणी घटली आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात कांद्याच्या दरात घसरण सुरू झाली आहे. कांद्याची आवक घटलेली असतानाही लासलगाव, पिंपळगाव बसवंत आणि येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत दर खाली आले आहेत. 16 सप्टेंबरच्या तुलनेत पिंपळगाव बसवंत येथे दरात प्रति क्विंटल मागे कमाल 800 रुपयांची, लासलगाव येथे सरासरी दरात 400 रुपयांची, तर येवला बाजार समितीत 605 रुपयांची,मोठी घसरण झाली आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

कांद्याचे दर घसरले….

गेल्या आठवड्यात बुधवार, 16 सप्टेंबरच्या तुलनेत पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या कमाल दरात तब्बल 800 रुपयांची घसरण झाली आहे. 16 सप्टेंबर रोजी 6 हजार 500 रुपयांपर्यंत गेलेला जास्तीतजास्त दर आज 5 हजार 700 रुपयांपर्यंत खाली आला आहे. तर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याच्या सरासरी दरात 400 रुपयांची घट झाली असून, 4 हजार 500 रुपयांपर्यंत पोहोचलेला सरासरी दर आता 4 हजार 100 रुपयांपर्यंत खाली आला आहे.येवला कृषी उत्पन्न बाजार समितीतही कांद्याच्या दरात 605 रुपयांची घसरण झाली आहे. येथे 5 हजार 251 रुपयांपर्यंत गेलेला दर आता 4 हजार 646 रुपयांपर्यंत खाली आला आहे.

Follow Us
टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा...
Sanjay Raut on Sanjay Shirsat : टीव्ही ९ मराठीच्या बाप्पाच्या दर्शनाला दोन्ही संजय एकत्र; या संजयचा मला काही त्रास नाही राऊतांचा मिश्किल टोला
गणपती विसर्जनाबाबत महापौर तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या
Ritu Tawde : गणपती विसर्जनाबाबत महापौर रितू तावडे यांचं मुंबईकरांना आवाहन; काय म्हणाल्या?
ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल
Ambadas Danve : ऑक्टोबरची वाट का पाहता? दुष्काळावर अंबादास दानवेंचा सरकारला थेट सवाल; पुढे म्हणाले...
मूळ पक्षाला डावलून फुटीर गटाला चिन्ह; राऊतांचा निवडणूक आयोगावर निशाणा
Shiv Sena Symbol : मूळ पक्षाला डावलून फुटीर गटाला चिन्ह... धनुष्यबाणाच्या वादावर संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर निशाणा, पुढे म्हणाले...
DJचा आवाज कमी अन् शाडूच्या मूर्तींना पसंती; गणेशोत्सवातील बदलांवर...
Eco Friendly Ganeshotsav : DJचा आवाज कमी अन् शाडूच्या मूर्तींना पसंती; गणेशोत्सवातील बदलांवर MPCB अध्यक्ष सिद्धेश कदम काय म्हणाले?
'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर, रोहित पवारांची नाराजी
Video : 'भावी मुख्यमंत्री' म्हणून बॅनर, रोहित पवारांची नाराजी, कार्यकर्त्यांना आवाहन करत म्हणाले...
कोस्टल रोड अपघातातल्या शयान गज्जलचा जुना व्हिडिओ व्हायरल, त्यावेळी...
Mumbai Coastal Road crash : कोस्टल रोड अपघातातल्या शयान गज्जलचा जुना व्हिडिओ व्हायरल, त्यावेळी पण त्याच्या BMW कारचा..
Video : पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार
Video : पुण्यातील हुतात्मा बाबू गेनू मंडळाचा शेतकऱ्यांसाठी पुढाकार
प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
Video : प्रवीण दरेकर यांच्या गाडीला अपघात, जाणून घ्या अपडेट समोर
TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन
Devendra Fadnavis : TV9 मराठीच्या बाप्पाचं मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतलं दर्शन, दुष्काळाचं सावट दूर करण्यासाठी गणरायाला घातलं साकडं