वीज बिल माफीसाठी शेतकरी संघटनेचा मोर्चा, वीज ग्राहकांनाही सहभागी होण्याचं राजू शेट्टींचं आवाहन

मंगळवारी इचलकरंजी इथं प्रांत कार्यालयावर स्वाभिमानीचा मोर्चा धडकणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे.

वीज बिल माफीसाठी शेतकरी संघटनेचा मोर्चा, वीज ग्राहकांनाही सहभागी होण्याचं राजू शेट्टींचं आवाहन
Follow us
| Updated on: Nov 22, 2020 | 4:46 PM

कोल्हापूर : लॉकडाउन काळातील वीज बिल (electricity bill) माफीसाठी शेतकरी संघटना आक्रमक झाली असून रस्त्यावर उतरणार आहे. मंगळवारी इचलकरंजी इथं प्रांत कार्यालयावर स्वाभिमानीचा मोर्चा धडकणार असल्याची माहिती माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिली आहे. या मोर्चामध्ये ते स्वत:देखील सहभागी होणार असल्याचं राजू शेट्टी (Raju shetti) यांनी सांगितलं आहे. (Farmers union march for electricity bill waiver Raju Shetty will participate)

या मोर्चामध्येमध्ये वीज ग्राहकांनीही सहभागी व्हावं असं आवाहन राजू शेट्टींकडून करण्यात आलं आहे. एकीकडे कोरोनाचा धोका तर दुसरीकडे आपल्या विविध मागण्यांसाठी लोक रस्त्यावर उतरत असल्यामुळे संसर्गाचा धोका आणखी वाढण्याची शक्यता असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, लॉकडाऊनच्या काळातील वीज बिलाचे पैसे आम्ही भरणार नाही. आता सरकारमध्ये दम असेल तर त्यांनी आमच्याकडून वीज बिलाची वसूली करुनच दाखवावी, असं जाहीर आव्हान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी दिलं होतं.

राज्य सरकारने वीज बिल माफ करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. वीज बिलं माफ केली नाहीत तर शेतकऱ्यांसह रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू, असा इशाराही राजू शेट्टी यांनी दिला होता. लॉकडाऊनच्या काळात राज्यातील अनेक भागांतील नागरिक आणि व्यावसायिक आस्थापनांना वीजेची भरमसाट बिले आली होती. यावरून गदारोळ झाल्यानंतर उर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीजेची बिलं कमी केली जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र, मंगळवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना नितीन राऊत यांनी आपल्या वक्तव्यावरुन घूमजाव केले होते. या पार्श्वभूमीवर राजू शेट्टी यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी बोलताना राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला होता.

लॉकडाऊनच्या काळातील घरगुती विजेचे तीन महिन्यांचे बील सरकारने माफ केलेच पाहिजे. सरकारकडे त्याशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही. लॉकडाऊनच्या काळातील वीजेचे बिल सामान्य माणूस कोणत्याही परिस्थितीत भरणार नाही, हे मी ठामपणे सांगतो. सरकारमध्ये हिंमत असेल तर त्यांनी लोकांकडून बिल वसूल करून दाखवावेच, असे राजू शेट्टी यांनी म्हटलं होतं.

इतर बातम्या – 

Raju Shetti | राज्य सरकारने बिल माफ करावं, शेतकऱ्यांना दिलासा द्यावा: राजू शेट्टी

वाढीव वीजबिलाविरोधात मनसेची पोस्टरबाजी; पोलीस, बेस्ट प्रशासनाने होर्डिंग्ज हटवले

(Farmers union march for electricity bill waiver Raju Shetty will participate)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.