AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pune : हिंजवडीत टेम्पोला आग, चौघांचा मृत्यू, दरवाजा लॉक झाल्याने एकाच कंपनीतील कर्मचारी दगावले

पिंपरी-चिंचवडजवळ एक हृदयद्रावक घटना घडली आहे. हिंजवडीत टेम्पो जळून खाक झाल्याने टेम्पोत चौघांचा होरपळून मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

Pune : हिंजवडीत टेम्पोला आग, चौघांचा मृत्यू, दरवाजा लॉक झाल्याने एकाच कंपनीतील कर्मचारी दगावले
हिंजवडीत टेम्पोला आग, चौघांचा मृत्यू
| Updated on: Mar 19, 2025 | 12:07 PM
Share

पिंपरी-चिंचवडच्या हिंजवडी येथे आग लागून एक टेम्पो जळून खाक झाला असून त्यामध्ये चौघांचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोत होते. मात्र आग लागल्यावर टेम्पोचं मागचं दार न उघडल्याने ते कर्मचारी आतमध्येच अडकले आणि त्यांचा होरपळून मृत्यू झाला, अशी माहिती समोर आली आहे. ही घटना सकाळी 8 च्या सुमारास घडली. आगीत काही जण जखमी झाले असून त्यांना उपचारांसाठी नजीकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या दुर्दैवी अपघातामुळे हळहळ व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पोत होते. त्यावेळी हिंजवडी फेज वन मध्ये चालकाच्या पायाखाली अचानक आग लागली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले.मात्र मागचे दार न उघडल्यानं चौघांचा होरपळून मृत्यू झाला. सहा जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत..

हिंजवडी पोलीस ठाणे हद्दीत फेज 1 रोडवर, व्योमा ग्राफिक्स या कंपनीच्या टेम्पो ट्रॅव्हल MH14 CW 3548 बस ला अचानक आग लागली होती. आगीत टेम्पो मधील एकूण 12 प्रवासी पैकी 04 प्रवाश्यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. व्योमा प्रिंटिंग प्रेसची बस तमन्ना सर्कल वरून रेजवानच्या दिशेने जात होती. अचानक बसला समोरून आग लागल्याने चालकाने उडी घेतली. ही घटना सकाळी आठच्या सुमारास घडली आहे. बस मध्ये एकूण 15 जण होते. त्यात पुढे बसलेल्यांनी तत्काळ खाली उडी मारली आणि ते बचावले. मागच्या बाजूस बसलेल्या लोकांनी जीव वाचवण्यासाठी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र तो लॉक झाल्यानेचार कर्मचारी आगीत होरपळले आणि मृत पावले. ते चौघेही इंजिनिअर होते अशी माहिती समोर येत आहे. जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवण्यात आलं आहे.

सुभाष भोसले, (वय 42), शंकर शिंदे ( वय 60), गुरुदास लोकरे ( वय 40) आणि राजू चव्हाण (वय 40)  अशी मृतांची नावं असून ते सर्व पुणे येथील रहिवासी आहेत.

प्रवीण निकम, चंद्रकांत मलजीत, संदीप शिंदे, विश्वनाथ झोर, जनार्दन हंबारिडकर (टेम्पो चालक) अशी जखमींची नावे आहेत.

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.