AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nanded accident : ‘माझी आई दिसली का हो साहेब’, …अन् चिमुकलीनं फोडला आर्त टाहो

नांदेडमध्ये आज भीषण अपघात झाला, ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्यानं तब्बल आठ महिलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Nanded accident : 'माझी आई दिसली का हो साहेब', ...अन् चिमुकलीनं फोडला आर्त टाहो
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 04, 2025 | 8:57 PM
Share

नांदेडमध्ये मोठा अपघात घडला आहे,  महिला मजुरांना घेऊन जाणारा एक ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, या दुर्दैवी घटनेमध्ये तब्बल  8 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार नांदेड परिसरातील आलेगावमधील कांचननगर या ठिकाणी हा अपघात घडला. हिंगोली जिल्ह्यातील काही महिला मजुरांना घेऊन हे टॅक्टर जात असताना हा अपघात घडला आहे.

या महिला हळद काढणीसाठी जात होत्या, याचदरम्यान लेगावमधील कांचननगर या ठिकाणी असलेल्या एका विहिरीमध्ये हा ट्रॅक्टर कोसळला, चालकाना विहिरीचा अंदाज न आल्यानं हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ज्या विहिरीत हा ट्रॅक्टर कोसळला त्या विहिरीत पाणी होतं. पाण्यात बुडून आठ जणींचा मृत्यू झाला आहे. या अपघातामुळे मृत महिलांच्या कुटुंबांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. साहेब माझी आई पाहिली का हो, असा आर्त टाहो या अपघातानंतर एका चिमुकलीनं फोडला आहे.  या मुलीच्या प्रश्नानं सर्वांचीच मन हेलावली.

या अपघातामध्ये कोणी आपली आई गमावली तर कोणी पत्नी, बहीण गमावली. या घटनेत ज्याच्या पत्नीचा मृत्यू झाला त्या व्यक्तीनं सांगितलं की,  माझ्या पत्नीचं आणि माझं सकाळीच बोलणं झालं होतं, मी रात्रभर हळद शिजवण्याचं काम करून घरी परतलो होतो, पत्नी मला म्हणाली होती दुपारी एक वाजता येते. मात्र माझी पत्नी परतलीच नाही, असं या व्यक्तींनं म्हटलं आहे, तर आता माझ्या तिन्ही नाताचा सांभाळ कोण करणार असा सवाल आपली सून गमावलेल्या एका आजीनं केला आहे.

तर दुसरीकडे  मला डॉक्टर बनून माझ्या आईला खुश करायचे होते, माझी आई मला नेहमी म्हणायची चांगलं राहावं, माझ्या आईचा दीडशे रुपयासाठी बळी गेला आहे. ट्रॅक्टर दुर्घटनेत आई गमावलेल्या पाचवीत शिकत असलेल्या कृष्णा राऊत या चिमुकल्यानं अशा शब्दात आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. ट्रॅक्टर चालकाला अंदाज न आल्यानं हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा