1625 उमेदवारांचं भवितव्य EVM मध्ये बंद, मतदान कमी झाल्याने उमेदवारांमध्ये धाकधूक

देशातील १०२ जागांवर आज पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. पहिल्या टप्प्यात महाराष्ट्रातील पाच जागांचा समावेश होता. पण तापमानामुळे मतदानाला फटका बसल्याने काही ठिकाणी मतदान कमी झालंय. त्यामुळे याचा फटका कोणाला बसणार यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे.

1625 उमेदवारांचं भवितव्य EVM मध्ये बंद, मतदान कमी झाल्याने उमेदवारांमध्ये धाकधूक
voting
Follow us
| Updated on: Apr 19, 2024 | 8:58 PM

Loksabha election : नागपूर, चंद्रपूरसह पूर्व विदर्भातल्या 5 जागांवर आज मतदान पार पडलं. पण मतदानाची टक्केवारी फक्त 55 टक्के इतकी राहिली. त्यामुळं कमी मतदानाचा फटका कोणाला बसेल, यावरुन आता उमेदवारांमध्ये धाकधूक असेल. पूर्व विदर्भातल्या 5 जागांसह देशातल्या एकूण 102 जागांवर आज मतदान पार पडलं. महाराष्ट्रात जवळपास 5 जागांवर 55.29 टक्के मतदान झालंय. सर्वात कमी मतदान नागपुरात झालंय. 49.07% मतदानाची नागपुरात नोंद झालीये. चंद्रपुरात 55.11%, रामटेकमध्ये 52.38% , भंडारा-गोंदियामध्ये 56.87%, आणि गडचिरोली-चिमूरमध्ये 65.97% मतदान झालंय.

महाराष्ट्रात पाच जागांवर मतदान

पहिल्या टप्प्यातल्या मतदानात महाराष्ट्राचा विचार केला तर नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा गोंदिया आणि गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान झालं. नागपुरात भाजपचे उमेदवार नितीन गडकरी, काँग्रेसचे उमेदवार विकास ठाकरेंसह देवेंद्र फडणवीसांनीही आई आणि पत्नीसह मतदान केलं. नागपूरमध्ये सरसंघचालक मोहन भागवत, भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी मतदान केलं. आपआपल्या मतदारसंघात उमेदवारांसह काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भंडाऱ्यात तर वडेट्टीवारांनी चंद्रपुरात मतदानाचा हक्क बजावला.

या 5 जागांपैकी हाय प्रोफाईल सीट नागपूर इथं भाजपच्या नितीन गडकरींचा सामना काँग्रेस विकास ठाकरेंशी आहे. गडकरींनी 5 लाख मतांसह रेकॉर्डब्रेक मतांनी विजयाचा दावा केलाय. विकास ठाकरेंनी नागपूरच्या जनतेनं सरकार विरोधात मतदान केल्याचं म्हटलंय.

कोणामध्ये थेट लढत

नागपूरनंतर दुसरा मतदारसंघ आहे चंद्रपूर. इथं भाजपचे मंत्री सुधीर मुनगंटीवारांची लढत, काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकरांशी आहे. मुनगंटीवारांसाठी चंद्रपूरची जागा प्रतिष्ठेची आहे. रामटेकमध्येही मतदान पार पडलं. इथं शिंदेंच्या शिवसेनेचे राजू पारवे आणि काँग्रेसच्या श्यामकुमार बर्वेंमध्ये मुख्य फाईट आहे. भंडारा गोंदियात भाजपचे विद्यमान खासदार सुनील मेंढे आणि काँग्रेसच्या प्रशांत पडोळेमध्ये सामना आहे. इथं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भंडारा हा नाना पटोलेंचा गृहजिल्हा आहे. पूर्व विदर्भातली 5 वी जागा म्हणजे, गडचिरोली चिमूर. इथं भाजपचे विद्यमान खासदार अशोक नेते आणि काँग्रेसचे नामदेव किरसान आमने-सामने आहेत.

महाराष्ट्रातल्या 5 जागांसह एकूण 21 राज्यात 102 जागांवर मतदान पार पडलंय. ज्यात तामिळनाडूच्या सर्व 39 जागांचा समावेश आहे. उत्तराखंडच्या सर्व 5 जागांवरही मतदान झालं. त्याचबरोबरच राजस्थानच्या 12 जागा, अरुणाचल प्रदेश-2, बिहार-4 आसाम-5 छत्तीसगड-1 मध्य प्रदेशची-6 महाराष्ट्र-5 मणिपुर-2 मेघालय-2 मिजोरम-1 नागालँड-1 सिक्किम-1 त्रिपुरा-1 उत्तर प्रदेश-8 पश्चिम बंगाल-3 अंदमान-निकोबार-1 जम्मू-कश्मीर1 लक्षद्वीप-1 पुडुचेरीच्या एका जागेवर मतदान झालं.

2019च्या तुलनेत विचार केला तर याच 102 जागांवर 2019 ला भाजपनं 60, काँग्रेसनं 65 जागांवर उमेदवार दिले होते. तामिळनाडूत डीएमकेनं 24 जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यापैकी भाजपनं 40 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेसला 15 जागांवर विजय मिळाला होता. तर डीएमकेनं पहिल्या टप्प्यातील 24 पैकी 24 जागा जिंकल्या होत्या. बसपानं 3 आणि समाजवादी पार्टीनं 2 जागा जिंकल्या होत्या.

102 जागांवर तब्बल 1625 उमेदवारांचं भवितव्य EVM मध्ये बंद झालंय. आता दुसऱ्या टप्प्याचं मतदान 26 तारखेला आहे. ज्यात महाराष्ट्रातील 8 जागांचा समावेश आहे.

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.