‘दाखवलं जातंय तसं काहीही नाही’, पूजाच्या वडिलांनी सांगितले आत्महत्येचे कारण, म्हणाले…

prajwal dhage

prajwal dhage |

Updated on: Feb 14, 2021 | 9:27 PM

पूजा चव्हाण (Pooja Chavan)आत्महत्या प्रकरणात रोज नवनव्या गोष्टी समोर येत असताना आता तिच्या कुटुंबीयांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. (Pooja Chavan suicide case)

'दाखवलं जातंय तसं काहीही नाही', पूजाच्या वडिलांनी सांगितले आत्महत्येचे कारण, म्हणाले...
पूजा चव्हाण

बीड : पूजा चव्हाण (Pooja Chavan)आत्महत्या प्रकरणात रोज नवनव्या गोष्टी समोर येत असताना तिचे वडील लहूदास चव्हाण (Lahudas Chavan) यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. “मी अरुण राठोड याला ओळखत नाही. पण विलास चव्हाण हा नेहमी राखी बांधायला यायचा. तिला कर्जाचे टेन्शन असू शकते त्यामुळे तिने आत्महत्या केली असावी,” असं पूजाच्या वडिलांनी म्हटलंय. तसेच या प्रकरणी पोलिसांकडून चौकशी सुरु आहे, त्यामुळे मुलीची आणि आमची बदनामी करू नका असे आवाहनसुद्धा त्यांनी केले आहे. (father of Pooja Chavan told cause of her suicide said she may have tension of loan)

अरुण राठोडचा 2 वाजता फोन आला

यावेळी बोलताना पूजाचे वडील लहूदास चव्हाण यांच्या प्रतिक्रियेमुळे अनेक नव्या गोष्टी समोर आल्या आहेत. “पूजाने ज्या दिवशी आत्महत्या केली, त्या दिवशी मी दुपारी पूजा सोबत फोनवर बोललो होतो. मात्र, अरुण राठोडचा रात्री 2 वाजता फोन आला. त्याने पूजा चक्कर येऊन पडल्याचे सांगितले. अरुण राठोडला मी ओळखत नाही, पण विलास चव्हाण नेहमी राखी बांधण्यासाठी यायचा. तिला कर्जाचे टेन्शन असू शकते त्यामुळे तिने आत्महत्या केली असावी,” असे पूजा चव्हाणचे वडील म्हणाले.

आम्हाला बदनाम करु नका

यावेळी बोलताना त्यांनी पूजा चव्हाण तसेच तिच्या कुटुंबीयांची बदनामी करु नका असे आवाहन केले आहे. “मला बीपीचा त्रास आहे. म्हणून आतापर्यंत बोलू कलो नाही. पण आता बोलणे गरजेचे आहे म्हणून बोलतोय. पूजाला कर्जाचे टेन्शन असू शकते. माझ्या मुलीची आणि आमची बदनामी करु नका. सध्या चौकशी सुरु आहे. जस दाखवलं जात आहे तसं काहीही नाही. ती शिकण्यासाठी पुण्यात गेली होती,” असे पूजाचे वडील यांनी म्हटलंय. तसेच अरुण राठोड आणि विलास चव्हाण हे आधीच पुण्यात होते, असेही त्यांनी सांगितलं.

दरम्यान, या प्रकरणात वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्यानंतर राज्यात खळबळ उडाली आहे. राठोड यांचे नाव आल्यामुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार अडचणीत आल्याचे म्हटले जात आहे.

संबंधित बातम्या :

पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी मंत्री संजय राठोड यांच्यावर थेट आरोप, चित्रा वाघांना धमकीचे फोन

पूजाच्या आत्महत्येची CID सारख्या संस्थेकडून चौकशी करा, आजोबांची मागणी

एका मुलीची आत्महत्या, कथित मंत्र्याचं नाव, 11 ऑडिओ क्लिप, ऐका प्रत्येक क्लीप; वाचा शब्द न् शब्द जशास तसा!

(father of Pooja Chavan told cause of her suicide said she may have tension of loan)

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI