AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

श्वेता महाले यांनी पुन्हा संजय गायकवाड यांना डिवचलं, आमच्या..

आमदार श्वेता महाले आणि संजय गायकवाड यांच्यातील वाद काही थांबण्याचे नाव घेत नाही. त्यातच श्वेता महाले यांनी पुन्हा मोठा टोला गायकवाड यांना लगावला. दोन्ही नेत्यांमधील वाद महायुतीसाठी डोकेदुखी ठरलीये.

श्वेता महाले यांनी पुन्हा संजय गायकवाड यांना डिवचलं, आमच्या..
Sanjay Gaikwad Shweta Mahale
| Updated on: Sep 29, 2026 | 9:16 AM
Share

आमदार संजय गायकवाड आणि आमदार श्वेता महाले यांच्यातील वाद काही कमी होण्याचे नाव घेत नाहीये. त्यातच आता पुन्हा एकदा संजय गायकवाड यांना श्वेता महाले यांनी जोरदार टोला लगावला. बाप तो बाप रहेगा, विषय वाढताना दिसला. आमदार महाले बाप तो बाप रहेगा, या गाण्यावर थिरकल्या. यावर आमदार संजय गायकवाड माध्यमांशी बोलताना म्हटले होते की, बाप तो बाप रहेगा हे माणसाने बोललेले बरं. पण एखाद्या बाईने म्हटले की, बाप आहे… तर बाई बापासारखे शरीर कुठून आणणार आहे. गायकवाड आणि महाले यांच्यातील वाद कमी व्हायचा तर हा वाद वाढताना दिसत आहे. पुन्हा आमदार श्वेता महाले यांनी संजय गायकवाड यांना डिवचल्याचे बघायला मिळाले. यासोबतच यावेळी त्यांनी राहुल बोंद्रेवरही टीका केली.

आमदार श्वेता महाले म्हणाल्या की, बुलढाण्याचा बिहार झालेला आहे. आपल्याला पुन्हा बिहारचा आपला शांत बुलढाणा करायचा आहे. यापुढे बुलढाणा मतदारसंघात कुठेही हुकूमशाही दडपशाही अजिबात चालणार नाही.विजुभाऊंच्या (सत्कार कार्यक्रमाचे आयोजक ) पत्नीलाही उचलून नेण्याची व गायब करण्याची भाषा झाली, असल्याचा गंभीर आरोप श्वेता महाले यांनी यादरम्यान केला.

बुलढाणा मतदार संघातील गावात सत्कार स्वीकारताना चिखलीच्या भाजप आमदार श्वेता महाले यांनी पुन्हा आमदार संजय गायकवाडांना डिवचलं. त्यांनी बुलढाण्याचा बिहार झाल्याचे म्हटले. यादरम्यान त्यांनी माजी आमदार राहुल बोंद्रेंवर टीका केली. यावेळी थेट म्हटले की, आमच्या चिखली मतदारसंघातही एक नटरंग आहे… नाव न घेता त्यांनी ही टीका केली.

भाजपा आमदार महाले आणि शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांच्यातील वाद काही कमी होत नाहीये. दोन्ही बाजूंनी आरोप केली जात आहेत. राहुल ब्रोंद्रे हे काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करणार होते, त्याची सर्व जबाबदारी ही श्वेता महाले यांच्यावर होती. मात्र, ऐनवेळी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा फोन राहुल ब्रोंद्रेंना आला आणि त्यांनी आपला निर्णय बदलला. हा मोठा धक्का आमदार महालेंसाठी होता.

Follow Us
धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून..
Chhatrapati Sambhajinagar : धक्कादायक! अवघ्या 1 महिन्याच्या बाळाची विक्री; 48 तासांत चार हातातून...., नेमकं काय घडलं?
एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...
Mahayuti : एकनाथ शिंदे यांनी भाजपाला जिवंत केलं, शिंदेंमुळेच भाजपा सत्तेत...; शिवसेना आमदाराने सगळंच सांगून टाकलं
उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न!
Thakurli : उड्डाणपुलासाठी 86 कुटुंबांचे स्थलांतर, पण पर्यायी घरांचा मोठा प्रश्न! वाळवी, पाणी अन्.... रहिवाशांचा संताप
अंगारक चतुर्थीनिमित्त सिद्धिविनायक, दगडूशेठ मंदिराबाहेर भक्तांची गर्दी
Angarki Chaturthi : अंगारक संकष्टी चतुर्थीनिमित्त दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी; सिद्धिविनायक अन् दगडूशेठ मंदिराबाहेर लांबच लांब रांगा
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?