कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागपूरमधील 2 पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत

नागपूर पोलीस दलातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला अखेर मदत मिळाली आहे (Financial help to Police Family after corona death).

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या नागपूरमधील 2 पोलीस कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत

नागपूर : नागपूर पोलीस दलातील कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला अखेर मदत मिळाली आहे (Financial help to Police Family after corona death). कर्तव्यावर असताना कोरोनाची लागण होऊन मृत्यू झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला सानुग्रह अनुदान म्हणून 50 लाख रुपयांची मदत करण्यात आली आहे. नागपूर पोलीस मुख्यालयातील सहायक फौजदर भगवान शेजुळ आणि धंतोली पोलीस स्टेशनमधील हवालदार सिद्धार्थ सहारे अशी या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते दोन्ही कुटुंबाना आर्थिक मदतीचा चेक देण्यात आला.

नागपूरमधील कोरोना रुग्णांच्या संख्येने 50 हजारांचा आकडा गाठला आहे. सध्या नागपूरमध्ये एकूण 50 हजार 128 कोरोना रुग्ण आहेत. मागील 24 तासात नागपूरमध्ये नव्याने 1578 नवीन रुग्णांची नोंद झाली. तर 24 तासात 1633 रुग्णांनी कोरोनावर मात केली. आतापर्यंत कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 37 हजार 371 वर पोहचली आहे. नागपुरात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 11 हजार 444 आहे. त्यापैकी 6 हजार 262 रुग्ण गृह विलगीकरणात आहेत. नागपूरमध्ये आतापर्यंत 1613 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. यामळे आरोग्य प्रशासनाची चिंता वाढली आहे.

मास्क न घालता फिरणाऱ्यांवर जोरदार कारवाई

वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर नागपुरात मास्क न घालता फिरणाऱ्यांवर जोरदार कारवाई सुरु आहे. काल (शनिवार, 12 सप्टेंबर) 2026 जणांवर कारवाई करण्यात आल. पोलिसांनी केलेल्या या धडक कारवाईने प्रवाशांमध्ये मास्क घालण्याबाबत थेट संदेश गेला आहे. शनिवारी झालेल्या या कारवाईत 4 लाख 11 हजार 400 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलाय. पोलीस स्टेशन, वाहतूक विभाग आणि उपद्रव शोध पथक संयुक्तपणे ही कारवाई करत आहे.

दरम्यान, पोलीस स्टेशन अंतर्गत 787 जणांवर कारवाई करण्यात आली असून त्यांच्याकडून 1 लाख 63 हजार 600 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. वाहतूक विभागाने 1239 जणांवर कारवाई करत 2 लाख 74 हजार 800 रुपयांचा दंड वसूल केला. तर महापालिका उपद्रव शोध पथकाने 465 जणांवर कारवाई करत 93 हजार रुपयांचा दंड वसूल केला.

संबंधित बातम्या :

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह पुन्हा ‘एम्स’मध्ये अ‍ॅडमिट

कोरोनामुक्त झाल्यानंतर प्रणिती शिंदे पुन्हा सक्रीय, विविध विकास कामांचा शुभारंभ

कोरोना काळात लिक्विड ऑक्सिजनची टंचाई, उल्हासनगर ते बदलापूरपर्यंत सर्वत्र तुटवडा

Financial help to Police Family after corona death

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *