Pune Fire | पुण्यात भीषण आग, तब्बल 2 कोटींचे नुकसान, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न

| Updated on: Oct 25, 2021 | 11:04 PM

पुण्यातील गंगाधाम,आई माता मंदिराजवळ, श्री जी लॉन्स येथे एका गोडाऊनला भीषण आग लागली आहे. या आगीत सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Pune Fire | पुण्यात भीषण आग, तब्बल 2 कोटींचे नुकसान, आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न
गर्भवती पत्नीला पतीने जिवंत जाळले
Follow us on

पुणे : पुण्यातील गंगाधाम,आई माता मंदिराजवळ, श्री जी लॉन्स येथे एका गोडाऊनला भीषण आग लागली आहे. या आगीत सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या दुर्घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. सध्या या ठिकाणी अग्निशमन दलाच्या 14 गाड्या दाखल झाल्या आहेत.(fire broke out in pune shreeJI Lawns area fire brigade trying to control fire)

नेमकं काय घडलं ?

मिळालेल्या माहितीनुसार पुणे शहरातील श्री. जी. लॉन्स परिसरात भीषण आग लागली. ही आग एवढी भीषण आहे की आतापर्यंत येथे दोन कोटींचे नुकसान झालेय. या घटनेची माहिती होताच अग्निशमन दलाच्या तब्बल 14 गाड्या तसेच जान दाखल झाले. सध्या आगीवर काही प्रमाणात नियमंत्रण मिळवता आले आहे. मात्र अजूनही येथे काही ठिकाणी आग धुमसत आहे. अग्निशमन दलाचे जवान वेळीच घटनास्थळी पोहोचल्यामुळे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टळले आहे.

आग नेमकी का लागली ?

गंगाधाम, आई माता मंदिराजवळ श्री जी लॉन्स येथे ही आग लागली आहे. फर्निचरच्या गोदामाला ही आग लागल्यामुळे काही क्षणात येथे ज्वाळा आकाशात झेपावत होत्या. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

मुंबईतही बहुमजली इमारतीला भीषण आग

दरम्यान दोन दिवसांपूर्वी मुंबईतील करी रोड स्टेशनजवळ भीषण आग लागल्याची घटना घडली होती. आग लागलेल्या इमारतीचे नाव वन अविघ्न पार्क होते. ही इमारत 60 मजली होती.  या आगीमध्ये एका व्यक्तीला जीव गमवावा लागला होता.

इतर बातम्या :

Sameer Wankhede Photo: पहिलं लग्न ते धर्मांतर, खंडणी, अपहरण ते चौकशी… समीर वानखेडेंवरील आरोप आणि प्रत्यारोप!

IPL New Team Auction 2021: 7 हजार कोटींना संघ घेणारे संजीव गोएन्का आहेत तरी कोण?, याआधीही विकत घेतली होती IPL Team

इथे ओशाळली माया, 12 वर्षाच्या लेकीने वडिलांसोबत असं का केलं? संपूर्ण जग हळहळलं

 

(fire broke out in pune shreeji lawns area fire brigade trying to control fire)