नागपूर : महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजनची मोठ्या प्रमाणात कमतरता भासत आहे. त्यामुळेच आता इतर राज्यांमधून ऑक्सिजन आणण्यासाठी रेल्वे विभागाने खास ऑक्सिजन एक्स्प्रेस सुरु केली. त्यातील पहिली ऑक्सिजन एक्स्प्रेस महाराष्ट्रात दाखल झालीय. विशाखापट्टणम स्टील प्लॅट सायडींगमधून लिक्विड मेडिकल ऑक्सिजनचे 7 (एलएमओ) टँकर्स घेऊन ही रेल्वे रो-रो सेवेद्वारे आज सायंकाळी 8.10 वाजता नागपूर स्थानकात दाखल झाली (First Oxygen express train reach to Maharashtra with 7 Oxygen tankers).