Gadchiroli : गडचिरोली जिल्ह्यात पूरस्थिती गंभीर, 19 मार्ग पुर्णपणे बंद
गडचिरोली जिल्ह्यातील 12 मोठे मार्ग व 7 छोटे मार्ग असे एकूण 19 मार्ग पुरामुळे बंद आहेत. तिसर्यांदा गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती उद्भवेल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील 12 मोठे मार्ग व 7 छोटे मार्ग असे एकूण 19 मार्ग पुरामुळे बंद आहेत.
गडचिरोली :गडचिरोली (Gadchiroli) जिल्ह्यातील अनेक भागात गंभीरपुर परिस्थिती निर्माण झालेली आहे. गोसीखुर्द धरणाचे (Gosikhurd Dam) 33 दरवाजे सोडल्यामुळे वैनगंगा, प्राणहिता, गोदावरी, इंद्रावती या चार नदींनी धोक्याची पातळी गाठली आहे. भामरागड सिरोंचा एटापल्ली मुलचेरा चामोर्शी देसाईगंज या तालुक्यातील संपर्क जिल्हा मुख्यालयाचे पूर्णपणे तुटलेला आहे. भामरागड (Bhamragad) तालुक्यातील जवळपास दीडशे घरे पाण्याखाली गेल्याने तिथून 193 लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचे काम प्रशासनाने केले आहे. त्यामुळे सध्यातरी धोका टळला आहे.
19 मार्ग पुरामुळे बंद आहेत
गडचिरोली जिल्ह्यातील 12 मोठे मार्ग व 7 छोटे मार्ग असे एकूण 19 मार्ग पुरामुळे बंद आहेत. तिसर्यांदा गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती उद्भवेल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक घरे पाण्याखाली आहेत. त्याचबरोबर पीक देणारे सुपीक जमीन पुराच्या पाण्याखाली गेले. यावर्षी मोठा फटका पुराच्या गडचिरोली जिल्ह्याला बसला असून शेतकऱ्यांचे यात खूप मोठे नुकसान झाले आहे.