AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

प्रसाद म्हणून एरंडाच्या बिया खाल्ल्या; 13 मुलांना विषबाधा, रुग्णालयात दाखल

एरंडाच्या बियांमुळे मुलांना त्रास झाल्यानंतर कुटुंबीयांनी वेळ न दवडता त्यांना रुग्णालयात नेलं. त्यामुळे त्यांच्यावर वेळीच उपचार सुरू करता आले. सध्या सर्व 13 मुलांची प्रकृती स्थिर असल्याने कुटुंबीयांसह गावकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

प्रसाद म्हणून एरंडाच्या बिया खाल्ल्या; 13 मुलांना विषबाधा, रुग्णालयात दाखल
Castor seedsImage Credit source: Instagram
| Updated on: Sep 18, 2026 | 1:26 PM
Share

गणेशोत्सवाच्या उत्साहात गणपतीची आरती केल्यानंतर प्रसाद म्हणून एरंडाच्या बिया खाल्ल्याने 13 मुलांना विषबाधा झाल्याची घटना समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यात असलेल्या कापूस वडगाव इथं ही घटना घडली. विषबाधेची लक्षणं जाणवू लागल्यानंतर सर्व मुलांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या सर्वांची प्रकृती स्थिर असून, सर्वजण सुखरूप असल्याची माहिती मिळत आहे. मिळालेल्या माहितीनुसार 17 सप्टेंबर रोजी शाळेला सुट्टी असल्याने गावातील काही मुलांनी परिसरात एकत्र येत मातीचा गणपती बसवला. त्यानंतर मुलांनी गणपतीची आरती केली. आरतीनंतर मुलांकडे प्रसादासाठी कोणताही खाद्यपदार्थ उपलब्ध नव्हता. त्यामुळे त्यांनी परिसरात उपलब्ध असलेल्या एरंडाच्या बिया प्रसाद म्हणून खाल्ल्या.

एरंडाच्या बिया खाल्ल्यानंतर काही वेळातच मुलांना त्रास जाणवू लागला. त्यांना उलट्या होण्यास सुरुवात झाली, तसंच अस्वस्थताही जाणवू लागली. एकाच वेळी अनेक मुलांची प्रकृती बिघडल्याने परिसरात चिंता निर्माण झाली. त्यानंतर कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी तातडीने सर्व मुलांना वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केलं. रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांकडून मुलांवर उपचार सुरू करण्यात आले. एकाच घटनेत 13 मुलांना त्रास झाल्याने वैद्यकीय यंत्रणेकडूनही आवश्यक काळजी घेतली जात आहे. सुदैवाने उपचारानंतर सर्व मुलांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.

या घटनेमुळे गणेशोत्सवाच्या काळात लहान मुलांनी परिसरात उपलब्ध असलेल्या कोणत्याही बिया, फळे किंवा इतर पदार्थ प्रसाद म्हणून खाण्यापूर्वी काळजी घेण्याची गरज अधोरेखित झाली आहे. विशेषतः लहान मुलांना कोणतीही अनोळखी वनस्पती, बिया किंवा फळे खाण्यास देऊ नयेत, अशी काळजी घेणं महत्त्वाचं आहे. अनोळखी बिया किंवा वनस्पतींचे भाग खाद्य आहेत की नाहीत, याची माहिती नसताना ते खाणं धोकादायक ठरू शकतं. गणपतीची आरती आणि त्यानंतर प्रसाद म्हणून एरंडाच्या बिया खाल्ल्याने 13 मुलांना विषबाधा झाल्याची ही घटना परिसरात चर्चेचा विषय ठरली आहे. सध्या सर्व मुलांवर वैजापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याने कुटुंबीयांना काहीसा दिलासा मिळाला आहे.

Follow Us
संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय?
Rahul Gandhi | संपूर्ण पक्षच चोरला जाऊ शकतो, तर लाखो मतं चोरली जाण्यात आश्चर्य काय? राहुल गांधींचा भाजप आणि निवडणूक आयोगावर घणाघात
मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला...
iPhone 18 Pro Max | मुंबईच्या Apple Store बाहेर ग्राहकांची तुफान गर्दी; पनवेलहून आलेला ग्राहक पहाटे 4 वाजल्यापासून रांगेत
शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा
Sanjay Raut | शिवसेना आणि धनुष्यबाण फुटीर गटाला देणं हा शतकातील सर्वात मोठा घोटाळा; संजय राऊतांचा निवडणूक आयोगावर घणाघात
महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा...
Rain Update | महाराष्ट्रात या तारखेला होणार पावसाची एन्ट्री, शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी
ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का?
Sanjay Raut | ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांची मालकी आमदार फुटल्याने बदलते का? तृणमूल-राष्ट्रवादीचा दाखला देत राऊतांनी आयोगाला सुनावलं
शरद पवारांचं फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
Sharad Pawar | शरद पवारांचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र; राज्याच्या राजकारणात घडामोडींना वेग
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक
विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ की... गडचिरोलीतील डुम्मे शाळेची धक्कादायक अवस्था अभिजीत दीपकेकडून उघड
भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया,
Narendra Pawar : भाजप नेते नरेंद्र पवारांची अत्याचाराच्या आरोपांवर पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्याच्या दरे गावी जाणार, नेमकं
उपमुख्यमंत्री शिंदे अहमदाबादहून थेट साताऱ्यातील दरे'गावी जाणार, नेमकं कारण काय?
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध...
PM Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त देशातील विविध राज्यांमध्ये दीपोत्सव, विशेष प्रार्थना